पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संख अप्पर तहसीलदार सह मांडग्याळ चे तलाठी विशाल उदगीरे यांच्या वर लाच प्रतिबंधक विभागाने केली कारवाई...

   जत: PSK NEWS NETWORK  माती वाहतूक करताना पकडलेल्या वाहनांन वर कारवाई न करता सोडून देण्यासाठी 2 लाख‌ 30 हजार रूपयाची लाच घेताना संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे सह  मांडग्याळ चे तलाठी विशाल विष्णू उदगीरे  यांच्यावर. सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.यात हे वरील अधिकारी  रंगेहाथ जाळ्यात सापडले आहेत.  अधिक माहिती अशी,वळसंग येथील तक्रारदार हे त्यांचे वाहनामधून मातीवाहतूक करीत असताना त्यांची वाहने अप्पर तहसील  हणमंत म्हेत्रे व तलाठी विशाल उदगीरे यांनी अडवून कारवाई कामी अपर‌ तहसीदार कार्यालय संख या ठिकाणी लावली होती. सदर वाहनांवर कारवाई न करण्याकरीता वाहने सोडण्याकरीता अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे,तलाठी विशाल उदगीरे यांनी तक्रारदार यांचेकडे 2,50,000/- रूपये लाचेची मागणी केली , असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.5 जून 2021 रोजी अँन्टी करप्शन ब्युरो सांगली कार्यालयात दिला होता.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 9जून,11जून,16 जून तसेच आज 22 जून रोजी ब्युरोच्या कार्यप्रणाली प्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार...

मी वादळ वारा

कवी : वामन दादा कर्डक मी वादळ वारा खोपी कुपी सोडून साऱ्या माळ्या लोळवणाऱ्या मी वादळ वारा, मी वादळ वारा मी तथागताची वाणी,मी जोतीबाची गाणी मी क्रांतीचा नारा नारा मी क्रांतीचा नारा ------ २ मी वादळ वारा.... मी भिम युगाचा बेटा मी भिम युगाचा रेटा विषमतेला खारा तिथे जातो माझा भारा मी वादळ वारा..... मी वामन वाणी गातो मी वामन वाणी गातो जातो तिथे पेरीत जातो चिल्या पिल्याच्या चारा मी वादळ वारा.....

वामनदादा कर्डक कविता संग्रह

वामन तबाजी कर्डक* जन्म:- १५ ऑगस्ट, इ.स. १९२२ मुळ गाव:- देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक मृत्यू:- 15मे, इ.स. २००४, राष्ट्रीयत्व :-भारतीय टोपणनाव:- दादा नागरिकत्व :- भारतीय धर्म :- बौद्ध पत्नी :- शांताबाई वामन कर्डक अपत्ये :- मीरा (जगु शकली नाही) दत्तक पुत्र :- रविंद्र कर्डक वडील :- तबाजी कर्डक आई :-सईबाई तबाजी कर्डक नातेवाईक :- सदाशीव (भाऊ) सावित्राबाई (धाकटीबहीण) - वामनदादा कर्डक आपली कविता घेऊन दलितांच्या झोपड्याझोपड्यातून गेले . आपल्या कविता मागची भूमिका स्पष्ट करतांना ते म्हणतात " मी जेथे जन्मलो, ज्या मातीत वाढलो आणि ज्या अन्यायाखाली भरडला गेलो त्याची मला आठवण आहे. ती कैफियत मी शब्दात मांडतो . त्याला तुम्ही कविता म्हणा किंवा म्हणू नका . मला जे प्रामाणिकपणे जाणवले ते मांडले ". त्यांची बाबासाहेबांच्या विचारावर असीम श्रद्धा आहे . त्यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे . त्यांनी या दलितांच्या मनात जळजळीत अंगार पेटविला . ते म्हणतात - तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानवारा पाऊसधारा मूळी न आम्हा शिवे क्रांतीचे गीते उच्च स्वरात गाणारा वामन कर्डक सारखा कवी बाबासाहेबांच्या नि...