पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दि.१९ जानेवारी २०२५,

मामा,  तुमचा एकुलता एक मुलगा चि.समर्थ याला त्याच्या वैवाहिक जीवनाच्या खुप खुप शुभेच्छा...🌹 त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाचा, सुखाचा समाधानाचा जावो, उत्तरोत्तर त्याची प्रगती होत राहो.👍 मामा, मी या आनंदी क्षणांचा भागिदार नाही राहिलो याच शल्य कायम मला बोचत राहिल. मागील दोन ते अडीच वर्षे आपण एकमेकांच्या सुख दुःखात एकत्र होतो. तुमचा सर्वांचा सहवास मला समाजातील / माझ्या जवळचे लोक आपल्या सोबत नसल्याचे जाणीव न करुन देणारा होता. हे खरं आहे. पण जिवनात एखादी अनपेक्षीत निर्णय घ्यायची वेळ प्रत्येकावर येते,ती आमच्या वरही आली. समाजापासून बाहेर राहणे (वाळीत)काय प्रकार असतो तो पहिल्यांदाच मी अनुभवलो , माझ्या आयुष्यातील वाईट दिवस कुठले असतील तर हे.... आणि याला कारणीभूत वैयक्तिक मी स्वतः आहे अस मी मानतो . सर्वात अगोदर कुणी बंड केल असेल तर तो मी होतो. मला त्यावेळी सुचना मिळाल्या असतानाही माझ्या मतावर ठाम राहिलो , कुणाच्याही सपोर्ट ची अपेक्षा न करता, मी एकटा बाहेर पडलेलो हे साऱ्या गावाला माहिती आहे. त्यानंतर या इतर मंडळींनी एकवार एक निर्णय घेतला आणि आपण एकत्र आलो, माझ्यसह आपल्या प्रत्येक...