पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाळेखिंडी ता.जत येथे, वंचित बहुजन आघाडी महिला शाखेचे ओपनिंग

इमेज
प्रतिनिधी जत  वाळेखिंडी ता.जत या गावी वंचित बहुजन आघाडी महिला शाखेचे ओपनिंग मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त बोलताना वंचित चे ता.अध्यक्ष अमोल साबळे म्हणाले कि, महिला वरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्यांना सक्षम बनविण्यााठी वंचित बहुजन आघाडी जत तालुक्यातील प्रत्येक गावी महिला आघाडीच्या  शाखा  काढण्यात  येईल प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्याचा निर्धार केला असुन पुर्ण तालुक्यातील महिला या वंचित आघाडीच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीत सक्रीय होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.  या शाखा उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष अमोल भैय्या साबळे सह, भारिप महिला जिल्हा अध्यक्ष अपर्णाताई वाघमारे, भारिप जिल्हा उपाध्यक्ष बापू शेसवरे ,भारिप तालुका अध्यक्ष संजय बंडू कांबळे, वंचित महिला तालुका द.उपाध्यक्ष रेखाताई, वंचित तालुका द. उपाध्यक्ष भास्कर माने, वंचित शहर अध्यक्ष श्रीकांत सोनवणे, वंचित संख गट अध्यक्ष विक्रम गिरगावकर, वंचित शाखा अध्यक्ष सुरेखा ताई ,व सर्व सन्माननीय पदाधिकारी व वाळेखिंडी ग्रामस्थ उपस्थित होते. ...

जत : उपविभागीय अधिकारी यांना हाथरस येथील अनुसुचीत जाती समाजातील मुलीवर सामुहिक बलात्कार व खून घटनेचाा जाहिर निषेधाचे निवेदन ऑक्टोबर ०५, २०२०

इमेज
जत प्रतिनिधी :  या ठीकाणी  उपविभागीय अधिकारीसो,यांना उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील अनुसुचीत जाती (SC) समाजातील मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिचा खून केलेबाबत.  आरोपींच्यावर कठोर कारवाई होऊन योगी सरकार बरखास्त होणेबाबत,निवेदन देणेत आले.उत्तर प्रदेश येथील हाथरस या गावातील मनीषा वाल्मीकी या मुलीवर गावातील सवर्ण ठाकूर समाज्यातील तरुणांनी सामुहिक बलात्कार करुन तिची अमानुषपणे हत्या केली आहे.  तसेच जेंव्हा पासून उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार बनून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले आहेत तेंव्हापासून अनुसुचित जाती/जमाती तसेच इतर मागासवर्गींय समाजावर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत.  जातीवादी मानसिकतेतून त्याठिकाणी कारभार चालला असून मागासवर्गीय लोक दहशतीखाली त्याठिकाणी जगत आहेत.   तरी आम्ही या निवेदनाद्वारे आपल्याला कळवू इच्छितो की ज्या जातीवादी ठाकूर समाजातील लोकांनी मनीषा वाल्मीकी हिचा बलात्कार करुन खून केला आहे.  त्या सर्व प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या निगराणीखाली सखोल चौकशी होऊन दोषींना 6 महिन्याच्या आत ...

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन चळवळ जिवंत होणे काळाची गरज...

इमेज
संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपुले चेहरे हजार झाले, तु पाहिलेली स्वप्ने पूर्ण झालीत कारे, बाबा तुझ्या मताची माणसं मेलीत कारे  बाबा तुझ्या मताची माणसं मेलीत कारे .....वामन दादा कर्डक     उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील एका मागासवर्गीय भगिनीचा नालायक मनूवादी विचारसरणीच्या चार सवर्णांनी तिच्यावर बलात्कार करून तिचा मणका मोडून तिची जीभ कापली.व खून केला.आणि विशेष म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली.अशा मग्रुर  हुकुमशाही सरकारचा , जाहीर निषेध.असे अमानवी कृत्य  करणाऱ्या त्या नराधम तरुणांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजेत.      संबंध देशात आजही दलीत समाजावर अत्याचाराच्या घटना या होतच आहेत, आपल्या माय बहिणी सुरक्षित नाहीत, आजही आपला भाऊ ताट मानेनं जगत नाही, आजही आपला बाप पाटलाच्या  , कुलकर्णी ,ठाकूर , अश्या सवर्ण समजल्या जाणाऱ्या  लोकांची चाकरी करण्यात धन्यता मानतो आहे. हे का? ....कारण  बहुजन  समाज आजही एक झाला नाही. याला कारण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर  एकही ...

धनगर आरक्षण आणि जिथे तिथे विखुरलेला समाज....

इमेज
हातात काठी,खांद्यावर घोंगड़ी,पिवळा पटका,पीळदार मिशा,"धनगर,होय "धनगर".दिवसभर मेंढ्यां राखने आणि त्याच्या केसा पासून ऊब दार घोंगड़ी बनवने हा धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय.. डोंगरदरीत,रानावनात,भटकत फिरनारा हा समाज बघितला कि लक्षात येत की जन्मोजन्मीची उपेक्षा यांच्याच नाशिबाला आली आहे.करोंनात सगळे जग थांबले असले तरी धनगर मात्र मेंढ़रा मागेच आहे. त्याना अजुनही lockdown चा अर्थ माहित नसेल.पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त हा समाज आढळतो.धनगरी मटन आणि ढोल त्यावर पारंपरिक नृत्य करत "जय अहिल्या" तर कधी "जय बा  लूमामा"असा जयघोष करणारा हा समाज अजूनही शैक्षणिक विकासा पासून कोसो दूर आहे.जेंव्हा हा समाज हातातील काठी टाकून पेन घेऊन शैक्षणिक भरारी घेईल तेंव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भरारी घेईल,. परवा पंढरपुर मधे धनगर आरक्षण संदर्भात आ. गोपीचंद पडलकर ह्यांनी ढोल बजाओ आंदोलन करून ह्या सरकारला जाग यावी म्हणून विट्ठलाला सा कड़ घातल,त्यानंतर आमचे मित्र क्रियाशील कार्यकर्ते श्री. विक्रमजी ढोने साहेब ह्यांनी त्या वर तिखट प्रतिक्रिया दिली,प्रतिक्रिया थोड़ी तिखट होती पन त्यात थोड़...