पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

● ️महामानव : डाॅ. भिमराव रामजी आंबेडकर (भाग : ५०) लेखक : डॉ. ज्ञानराज गायकवाड

इमेज
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬   ● ️महामानव : डाॅ. भिमराव रामजी आंबेडकर                          (भाग : ५०)           लेखक : डॉ. ज्ञानराज गायकवाड  ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆                          तृतीय खंड :    कर्तबगार मंत्री, राज्य घटनेचे श्रेष्ठ शिल्पकार,                 जागृत राज्य सभा सदस्य ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆                          प्रकरण : २२         सतत राष्ट्रहित चिंतणारे थोर राष्ट्रभक्त ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆             स्वाभिमानी डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी कायदा खात्याच्या मंत्री पदाला चिकटून राहण्याचा मोह आपल्या मनात येऊ दिला नाही. म्हणूनच त्यांनी अगदी बाणेदारपणे मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि एक लेखी निवेदन पत्रकारांना प्रसिद्धीसाठ...

विज्ञानयुगातील विश्वकर्मा भारतरत्न विश्वेश्वरय्या यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

इमेज
शशिकांत हेगडे (जत)          विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिनांक १५ सप्टेंबर १८६१ या दिवशी झाला. आजच्या कर्नाटकात आणि पूर्वीच्या म्हैसूर राज्यात असणारे मदनहळ्ळी नावाच्या खेडे गावात झाला. वडील पंडित श्रीनिवास शास्त्री हे एक विद्वान ब्राह्मण होते. आयुर्विद्या पारंगत असे ते वैद्य होते .त्यांच्या आई ह्या धर्मपरायण होत्या .आचारविचारांची सुचिता हे या कुटुंबाचे वेगळेपण होते. घरच्या गरिबीला मनाच्या श्रीमंतीची सोबत होती.      १८८० मध्ये विश्वेश्वरय्या पदवीधर झाले. त्याकाळी शिकणारे थोडे होते. अभ्यासक्रमही भिन्न आणि संमिश्र होते .पदवीपरीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणाऱा विद्यार्थी एखाद्या तांत्रिक विषयाची पदवी संपादन करू शकत असे .विश्वेश्वरय्यांना असाच एक अभ्यासक्रम अभिप्रेत होता. त्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. त्यांना म्हैसूर सरकारने एक शिष्यवृत्ती मंजूर केली. पुणे शहरात तेव्हा सायन्स कॉलेज नावाचे एक महाविद्यालय होते. त्यात सिव्हिल इंजीनियरिंगसारखे विषयसुद्धा शिकवले जात .विश्वेश्वरय्यांनी स्थापत्यशास्त्राचे विषय निवडले. परीक्षेचा निकाल जाहीर ह...

अखेर रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) जत तालुका अध्यक्ष मा श्रीकांत हुवाळे व सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचा आर पी आय (A) आंबेडकर पक्षात जाहीर प्रवेश....जिहाध्यक्ष, मा.महादेव होवाळ.

इमेज
========================== सांगली :- आज दि. ११/०९/२०२१ रोजी सांगली जिल्ह्यातील जत तालुका अध्यक्ष मा.श्रीकांत हुवाळे (सर) व सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए-आंबेडकर) या पक्षामध्ये सांगली जिल्हा अध्यक्ष मा.महादेव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला त्यांच्याबरोबर सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा. संजय देवनाळकर, तालुका सरचिटणीस (माजी सरपंच) मा. बिरुदेव बाबर, युवक तालुका अध्यक्ष मा. नारायण कामत, मुस्लिम आघाडी तालुका अध्यक्ष, मा. शब्बीर भाई नदाफ, मराठा आघाडी अध्यक्ष, मा. महेश  कोडग, जत विधानसभा अध्यक्ष, मा. राकेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष, मा.  इराप्पा केंगार, व इ. कार्यकर्ते यांनी जाहीर प्रवेश केला...   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्यातील संघटनेमध्ये उभी फूट पडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षातील मोठा गट जिल्हा कार्यकारिणीच्या मनमानी कारभाराला आणि एकाधिकारी शाहीला कंटाळून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)आंबेडकर गटांमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव ...

बहुजन समाज पार्टी जत माडग्याळ सेक्टर चे संघटन वाढीसाठी प्रचार,प्रसाराची सुरुवात

इमेज
अंकलगी ता.जत येथुन  बहुजन समाज पार्टी जत माडग्याळ सेक्टर  चे  पदाधिकारी कार्यकर्ते संघटन वाढीसाठी प्रचार,प्रसाराची सुरुवात करण्यात आली.  यावेळी संख सेक्टर सचिव आयु.दिलीप कांबळे यांच्या घरी मिटिंग घेण्यात आली.व उपस्थित कार्यकर्त्यांना पक्षाचे राजकीय व सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली.. तसेच पुढिल काळात बसपा हिच एकमेव पार्टी लक्षात घेऊन पार्टीच्या विचारधारेने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी बसपा माडग्याळ सेक्टर महासचिव प्रज्वल ऐवळे, माडग्याळ सेक्टर संयोजक (BVF) विकास नाटेकर, संख सेक्टर सचिव दिलीप कांबळे, तसेच अंकलगीचे वयस्क,  बसपा विचारधारा माहिती असलेले  मा तुकाराम कांबळे आजोबा , सचिन झेंडे माडग्याळ सेक्टर अध्यक्ष व इतर  कार्यकर्ते  , राकेश कांबळे अंकलगी, सुखदेव कांबळे अंकलगी, युवराज बसाप्पा कांबळे अंकलगी आदी उपस्थित होते.

मोरबगी ता जत येथे रहाते घराला आग, पंचनामा झाला पण अजुन मदत पोहोचली नाही.. आर पी आय ,जत

इमेज
प्रतिनिधी माडग्याळ/ मोरबगी ता जत येथे रहाते घराला आग, पंचनामा झाला पण अजुन मदत पोहोचली नसल्याने  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका कार्यकारिणीने पुढाकार घेत सदर कुटुंबास नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली. सदर कुटुंब प्रमुख सदाशिव खरात मू पो मोरबगी ता जत हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका कार्यकारिणीने चे सदस्य आहेत,  यांचें रहाते घराला आग लागून चार जनावरे संसारातील प्रत्येक वस्तू जळाली आहे शासनाने फक्त पंचनामा केला पण अजून कसलिही मदत मिळाली नाही म्हणून आर पी आय  जत तालुका अध्यक्ष श्रीकांत हूवाळे सर यांनी तलाठी सर्कल तहसीलदार व प्रांताधिकारी यांना फोन करून ताबडतोब मदत देणे विषयी चर्चा केली आणि ताबडतोब मदत मिळावी अशी भूमिका घेतली या वेळी आर पी आय जत तालुका उपाध्यक्ष इराप्पा केंगार निरिक्षक भिमराव कांबळे व कार्यकर्ते हजर होते. संपादक शशिकांत हेगडे मो.90110 19031

विद्यार्थ्याना संघर्ष शिवाय पर्याय नाही - डॉ.नानासाहेब थोरात,

जत/PSK NEWS NETWORK जगा मध्ये ज्या ज्या व्यक्तीनी मोठे नाव कमावले आहे त्यांनी अतोनात संघर्ष केला आहे तरी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता सतत संघर्ष करत राहा. एक ना एक दिवस तुमच्या कष्टाला फळ येईल असे प्रतिपादन ऑक्स्फर्ड विद्यापिठातील वरीष्ठ संशोधक डॉ.नानासाहेब थोरात यानी केले.  युथ फॉर जत या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.  जगातल्या शंभर उत्क्रुष्ठ विद्यापिठा मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे. तंत्रज्ञानाने जगणे सुकर होत असले तरी या तंत्रज्ञानाचे  संशोधन भारतात होणे गरजेचे आहे. यासाठी शासन व्यवस्थेने ही पुढाकार घेणे आवश्यक आहे, स्पर्धेच्या युगात नोकरीच्या पाठीमागे न धावता व्यावसायिकतेवर भर देणे काळाची गरज आहे. जगाच्या पाठीवर कुठेही कार्यरत असताना आपल्या मात्रुभुमिचे पांग फेडण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे याच भावनेने युथ फॉर जत ने जत मधील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेले वाचनालय आणि संगणक प्रयोगशाळा ग्रामिण भागातील विद्द्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आ...

ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम शाळेत शिक्षक दिन साजरा

इमेज
जत/PSK NEWS NETWORK ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधुन  शिक्षक दिन साजरा करण्यात आला.  यावेळी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन जगन्नाथ वायदंडे,वरिष्ठ मुख्याध्यापक खैराव तर  प्रमुख पाहुणे म्हणून सुखदेव शिंदे,भारत क्षिरसागर  जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संस्थेचे सचिव तथा ग्रां.पं.सदस्य संतोष पाटील हे उपस्थित होते.       प्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांनीनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर शाळेतील शिक्षक शिक्षक श्री. दत्तात्रय चौगुले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शाळेतील सहशिक्षिका सौ.प्रियांका काशीद (मॅडम) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .तसेच प्रमुख पाहुणे म्हणून असलेले येळवी शाळेचे मुख्याध्यापक भारत क्षीरसागर (सर) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत पूर्वीचे शिक्षण आणि आताचे शिक्षण यात असणारा बदल सांगितला हा...

Mahatma Phule

इमेज
शिक्षक दिन भारतातील पहिले आणि कदाचित शेवटचे शिक्षक ज्यांनी ज्ञानाची गंगा अज्ञानांपर्यंत पोहचवताना निशुल्क काम केले, मनुवादी भारतात मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी स्वतः, स्वतःच्या पत्नीला शिक्षित करून स्वखर्चाने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, भारतातील पहिले शिक्षक ज्यांनी शिकविताना जातीभेद केला नाही, भारतातील पहिले महामानव ज्यांनी शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या कैफती खुद्द इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांच्या दरबारा पुढे मांडल्या...... असे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हेच खरे शिक्षक दिनाचे मानकरी.....! राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 देशभरात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.हा उत्सव लोकाभिमुखाने साजरा होत नसला तरी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त हा अधिकृत पणे शासकीय पातळीवर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. खरे तर महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हेच खरे समाजसुधारणेचे शिक्षक होते. ‘प्राथमिक शिक्षणाचा पाया महात्मा फुले यांनी रचला. मुलींच्यासाठी मोफत शाळा सुरु केल्या. डॉ. राधाकृष्णन यांच्या जन्मापूर्वी चाळीस वर्...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका अध्यक्ष श्रीकांत हूवाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न ...

इमेज
जत/PSK NEWS NETWORK रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका अध्यक्ष श्रीकांत हूवाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका सरचिटणीस बिरूदेव बाबर माजी सरपंच आसंगी जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर यूवा आघाडी अध्यक्ष नारायण कामत मुस्लिम आघाडीचे तालुकाध्यक्ष शब्बिर नदाफ विधानसभा यूवा आघाडी क्षेत्र अध्यक्ष राकेश कांबळे उपाध्यक्ष इराप्पा केंगार निरीक्षक भिमा कांबळे उपाध्यक्ष मूत्यापा कांबळे सूसलाद व अनेक पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्यात तालूका पदाधिकारी यांना कशा पद्धतीने वागवले जाते आणि तालुक्यातील विविध कामे करत असताना त्याचे विनाकारण पेपर बाजी करून श्रेय कोण घेते या विषयावर चर्चा झाली आणि पूढे गेल्यावर कशा पद्धतीने काम करायचे या विषयी चर्चा झाली... एकूण चर्चेवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चा नाराज गट बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे...

जत तालुक्यात युवकांची पसंती बहुजन समाज पार्टी ला .....तालुक्यातील विविध कार्यकर्त्यांनी केला पक्षात प्रवेश

इमेज
जत/PSK NEWS NETWORK  बहुजन समाज पार्टी जत विधानसभेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मा. अतुल दादा कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये जत तालुक्यातील विविध पदाधिकारी यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला.  यावेळी अस्लम शेख यांची माडग्याळ सेक्टर विधानसभा सचिव, विकास नाटेकर यांची माडग्याळ सेक्टर बी.व्ही.एफ. संयोजक, संजय धोडमनी यांची उमराणी बुथ अध्यक्ष, मांतेश कुरणे यांची मेंढेगिरी बुथ प्रभारी, सागर केंगार यांची मेंढेगिरी बुथ अध्यक्ष, सागर कांबळे यांची देवनाळ बुथ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मा अतुल दादा कांबळे यांनी पक्षाची ध्येयधोरणे सर्व बहुजन महापुरुषांच्या इतिहास व कार्य तसेच फुले शाहू आंबेडकरांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य व कांशीराम साहेब व बहन कु. मायावती जी यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक शहराध्यक्ष सुनिल क्यातन यांनी केले, आभार शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांनी मानले.   यावेळी जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, विधानसभा महासचिव शरद शिवशरण, सेक्टर अ...

विद्यार्थ्याना संघर्ष शिवाय पर्याय नाही - डॉ.नानासाहेब थोरात

इमेज
सांगली!दि१जगा मध्ये ज्या ज्या व्यक्तीनी मोठे नाव कमावले आहे त्यांनी अतोनात संघर्ष केला आहे तरी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता सतत संघर्ष करत राहा. एक ना एक दिवस तुमच्या कष्टाला फळ येईल असे प्रतिपादन ऑक्स्फर्ड विद्यापिठातील वरीष्ठ संशोधक डॉ.नानासाहेब थोरात यानी केले.  युथ फॉर जत या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.  जगातल्या शंभर उत्क्रुष्ठ विद्यापिठा मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे. तंत्रज्ञानाने जगणे सुकर होत असले तरी या तंत्रज्ञानाचे  संशोधन भारतात होणे गरजेचे आहे. यासाठी शासन व्यवस्थेने ही पुढाकार घेणे आवश्यक आहे, स्पर्धेच्या युगात नोकरीच्या पाठीमागे न धावता व्यावसायिकतेवर भर देणे काळाची गरज आहे. जगाच्या पाठीवर कुठेही कार्यरत असताना आपल्या मात्रुभुमिचे पांग फेडण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे याच भावनेने युथ फॉर जत ने जत मधील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेले वाचनालय आणि संगणक प्रयोगशाळा ग्रामिण भागातील विद्द्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहेत. यातुन...