करजगी येथे मागासवर्गीयांवर अन्याय राशन दुकानचे लायसन्स् रद्द करून संबंधितावर कारवाई करा ...अन्यथा तालुकाभर आंदोलन छेडु. - बसप ,जत
प्रतिनिधी जत करजगी ता. जत येथील सरकार मान्य् स्वस्त् धान्य् दुकान श्री. अशोक रेवणसिध्द् जेऊर हे चालवित असून सदर रेशन दुकानामध्ये गावातील मागासवर्गीय व इतर समाजातील लोक रेशन आणणेसाठी गेलेनंतर सदर दुकानदार धान्याचे वाटप नियमानुसार न करता तसेच अडाणी लोकांचा गैरफायदा घेऊन कमी माल देतात. धान्य् कमी का दिले याचा जाब विचारल्यास महिला व जेष्ठ् नागरिकांना एकेरी भाषेत व उध्दटपणे बोलतात. तसेच शिवीगाळ व दमदाटी करतात व माझे विरुध्द् कोठेही तक्रार करा असे बोलतात व पुढच्या महिन्यापासून दुसऱ्या गावातील रेशन दुकानातून धान्य् घेऊन जाणेस सांगतात. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या गहू, तांदूळ, डाळी या व्यक्तीरिक्त् इतर लोकल मार्केट मधील चहापूड, खाद्यतेल, खोबरेल तेल, कपड्याचे साबण, अंगाला लावयचा साबण, कपडे धुण्याचे पावडर व अन्य् वस्तू सक्तीने विकत घ्यायला लावतात व त्याशिवाय स्वस्त् धान्य् दुकानातील माल मिळत नाही. सदरच्या वस्तू बाजार भावापेक्षा जास्त् दराने लोकांना विक्री करतात. कोविड 19 काळामधील शासनाकडून मिळणारे मोफत धान्य् वाटप नियमानुसार झालेले नसून याची सखोल चौकशी करावी. संबंधित कर...