पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आज पुन्हा ती दिसली

* आज पुन्हा ती दिसली .* .. बघताच समोर तिला माझे मलाच मी हरवून गेलो... बावरलो,गोंधळलो विसरून गेलो मी स्वतःला... पुन्हा एकदा बुडालो त्याच तिच्या बोलक्या डोळ्यात .... कधी काळी दिवाना होतो ज्या नजरेचा... ज्या नजरेनेच व्हायचो घायाळ, तीच नजर आज पुन्हा पडली नजरेस .. आणि झालो घायाळ पुन्हा एकदा... तिच्या नजरेचा बाण निघाला तो थेट घुसला हृदयात ... आणि पाडलं भोक आरपारं ... आली जोराची सणक वाटलं रक्तबंबाळ झालो, आणि मनाशीच म्हणालो सगळं संपलं आता.... पण आलो लगेच भानावर , आठवला तो नियतीन खेळलेला खेळ... पाहुन तिच्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्राकडे.. विचारता झालो सहज पाहुन त्याच डोळ्यात, कधी काळी होतो मी ज्याचा दिवाना... काय ओळखलंत का मॅडम ... पाहुन ती हसली उत्तरादाखल... अन् उगाचच मी विचार करत बसलो... ती हसली...मला प्रतिसाद म्हणून .. का? उगाचच हसली माझ्या परिस्थितीवर... हल्लकल्लोळ माजला माझ्या मनात.... खरंच होतो का मी तिच्याही हृदयात... आज पुन्हा एकदा आठवणी ताज्या झाल्या... ती दिसताच माझ्या नजरेसमोर... आणि पुन्हा एकदा घायाळ झालो त्याच नजरेने... कधी काळी होतो  मी ज्याचा दिवाना... ❤️❤️❤️❤️❤️ ...

उटगी येथील विजयालक्ष्मी पतसंस्थेचे काम आदर्शवत- तुकाराम बाबा महाराज★ अपघातग्रस्त कुटूंबियांच्या वारसाला दोन लाखाचा दिला धनादेश

इमेज
जत:प्रतिनिधी जतसारख्या दुष्काळी व ग्रामीण भागात उटगी येथील विजयालक्ष्मी सहकारी पतसंस्थेने अपघातात मयत झालेल्या सभासदाच्या वारसाला दोन लाखाचा धनादेश दिला तसेच गुणवतांचा सन्मान व कोव्हीड योद्धाचा केलेल्या सत्काराचे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यानी केले. उटगी येथील पिराप्पा हत्तळी यांचे अपघातात दुर्देवी निधन झाले होते. या निधनाने त्यांच्या कुटूंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. मयत पिराप्पा हत्तळी हे गावातीलच विजयालक्ष्मी पतसंस्थेचे सभासद होते. पिराप्पा हत्तळी यांच्या निधनानंतर त्यांचा वारसदारांना दोन लाख रुपये पतसंस्थेच्या वतीने देण्यात आले. कार्यक्रमास चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज,माजी सभापती बसवराज बिराजदार ,प्रगतशील शेतकरी हणमंत दुधगी,सरपंच सविता महादेव कांबळे ,एम एस पाटील ,पतसंस्थेचे संस्थापक महांतेश पाटील ,अध्यक्ष डॉ शिवानंद पाटील ,डॉ सोमशेखर मेत्री ,डॉ वैशाली अचकनळी,काडप्पा काराजनगी आदी उपस्...

जिल्हा परिषद शाळा खैराव येथे वरिष्ठ मुख्याध्यापकपदी जगन्नाथ वायदंडे

इमेज
  जत:प्रतिनिधी जत तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष व काराजनगी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जग,न्नाथ वायदंडे (बापू)हे जि प शाळा खैराव येथे वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून हजर  झाले. त्या निमित्ताने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यातआला. तसेच जि प शाळा खैरावचे माजी विद्यार्थी विष्णू टोणे यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जगन्नाथ वायदंडे सर म्हणाले,शाळेचा भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेन.पीएसआय टोणे म्हणाले,शाळेसाठी लागणाऱ्या मदतीसाठी केव्हाही हाक मारा आम्ही मदत करण्यास तयार आहोत. यावेळी सरपंच राजाराम घुटुकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी करांडे,  केंद्रप्रमुख संजय काशीद, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर,उपाध्यक्ष मनोहर येऊल,भालचंद्र गडदे,  दत्तात्रय साळे,संजय  साळे, प. सदस्य बिराप्पा करांडे व गणेश जिपटे  उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार मनोहर येऊल यांनी केले.

राजे रामराव महाविद्यालय, जतची कु. प्रतीक्षा पाटील हिची जपान विद्यापीठात पीएच.डी. साठी निवड

इमेज
जत: राजे रामराव महाविद्यालय, जतची कु. प्रतीक्षा बाबगोंडा पाटील हिची जपान विद्यापीठात पीएच.डी. साठी निवड झाली आहे. कु. प्रतीक्षा बाबगोंडा पाटील हिने राजे रामराव महाविद्यालयात एम. एस्सी. पदार्थविज्ञान हि पदवी २०२० मध्ये प्रथम क्रमांकाने संपादन केली. तिची नुकतीच टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रीकल्चर अँड टेकनॉलॉजी, टोकियो, जपान येथे पीएच.डी. साठी निवड झाली आहे. डॉ. संजय लठ्ठे यांचे जपान मधील सहकारी प्रोफ. काझूया नकाता यांच्या मार्गदर्शनाखाली ती पीएच.डी. चे संशोधन पूर्ण करेल. कु. प्रतीक्षा पाटील हिने याआधीही  डिसेंबर २०१९ मध्ये साकुरा एक्सचेंज प्रोग्रॅम मार्फत डॉ. संजय लठ्ठे यांच्याबरोबर जपान मधील विद्यापीठाला २ आठवड्यांसाठी भेट दिली आहे. राजे रामराव महाविद्यालय, जत मध्ये उच्चशिक्षण घेतलेली व पीएच. डी. साठी जपानला जाणारी ती या कॉलेज ची पहिली विद्यार्थिनी आहे. तिला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, संस्थेच्या सचिवा प्राचार्य शुभांगी गावडे, राजे रामराव महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश एस. पाटील, पदार्थविज्ञान विभा...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मोर्चे काढाच पण माळशिरस तालुक्यात घडलेल्या जातीयवादी घटनेला ही न्याय द्या. - सचिन झेंडे (बसपा माडग्याळ सेक्टर अध्यक्ष)

इमेज
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मा.मुख्यमंत्री यांच्या वर केलेल्या बेताल वक्तव्यावर पुर्ण महाराष्ट्र भरातुन निषेध व्यक्त केला जात आहे. आणि ते योग्य ही आहे. पण या ठिकाणी आणखी एक नींदनिय , माणुसकी ला लाजवणारी , जातीभेदाच समर्थन करणारी अतिशय वाईट घटना या पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. पण याकडे सोईस्करपणे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात माळेवाडी या गावच्या सरपंच जो गावचा प्रथम नागरिक म्हणून पाहतो, त्या सरपंचाच्या भावाचा अंतिम विधी सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यास तेथील जातीयवादी, विखारी मनुवादी विचारसरणीचे लोक मज्जाव करतात, अडवतात कारण तो मातंग समाजातील आहे,  व शेवटी प्रशासनाचे डोळे उघडावेत हा एकमेव उद्देश ठेवून त्या मयताचा अंत्यविधी माळेवाडी ग्रामपंचायतीच्या दारात केला जातो,या घटनेने पुर्ण महाराष्ट्र भरातुन निषेध व्यक्त होत असताना , महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, ग्रहखातं आपल्या डोळ्यासमोर कोणती काळी पट्टी बांधून घेतले आहे..हा प्रश्न महाराष्ट्रातील या तमाम आजही दलित ...

गुरुदेव कार्यकर्त्यांनी बापूजींच्या विचाराचा ज्ञानदीप कायम ठेवावा:- प्राचार्य अभयकुमार साळुंखे

इमेज
जत:प्रतिनिधी       श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या बापूजींच्या ध्येयाने प्रेरित होऊन शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी बापूजींच्या विचारांचा ज्ञानदीप कायम ठेवावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी राजे रामराव महाविद्यालय जत येथे आयोजित सेवा गौरव व गुणवंत प्राध्यापक सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एस. पाटील हे होते .    प्राचार्य अभयकुमार साळुंखे बोलताना म्हणाले की, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञानाची विज्ञानाची सांगड घालून सुसंस्कारी विद्यार्थी घडवण्याचे जे कार्य केले आहे ते आपण सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पुढे चालवावे. ऐतिहासिक उदाहरणांचा दाखला देऊन त्यांनी गुरू-शिष्याचे महत्त्व पटवून दिले. राजे रामराव महाविद्यालयातील  स्मृतींना उजाळा देऊन सर्वांना प्रेरित केले. सेवानिवृत्त प्...

जत नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी मा. महेश वाघमोडे साहेब यांचा बहुजन समाज पार्टी, जत च्या वतीने सत्कार

इमेज
जत नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी मा. महेश वाघमोडे साहेब यांचा बहुजन समाज पार्टी, जत च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीकांत सोनवणे यांनी प्रभाग क्रं 8 मधील समस्यांची माहिती दिली, संतोष भैय्या साबळे यांनी प्रभाग क्रं 4 मधील समस्यांची माहिती दिली व शहराध्यक्ष सुनिल क्यातन यांनी सत्ताधारी व विरोधक असा भेदभाव न करता जत शहराचा विकास करावा असे म्हटले. यावेळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे, युवा नेते संतोष साबळे, शहराध्यक्ष सुनिल क्यातन, शहर महासचिव दिपक कांबळे उपस्थित होते. संपादक शशिकांत हेगडे मो.90110 19031

महादेव बुरुटे यांच्या 'पिंपळवन डॉट कॉम' या बालकादंबरीसह पाच पुस्तकांचे रविवारी प्रकाशन

इमेज
जत:प्रतिनिधी शेगाव येथील जेष्ठ साहित्यिक, कवी महादेव बी. बुरुटे यांच्या पिंपळवन डॉट कॉम या बालकादंबरीचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक मा. डॉ. संपतराव जाधव यांच्या हस्ते व तरुण भारत चे मा. शिवराज काटकर, लोकसत्ता चे मा. दिगंबर शिंदे व महाराष्ट्र टाइम्स चे मा. नामदेव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या रविवारी शेगाव येथे होणार आहे.  मराठी साहित्य सेवा मंच, शेगांव चे २४ ग्रामीण साहित्य संमेलन रविवारी २९ आॅगष्ट रोजी चिंच विसावा, शेगांव येथे दुपारी ३ ते ६ या वेळेत होत आहे. या संमेलनात, संमेलनाध्यक्ष डॉ. जाधव यांच्या हस्ते या बहुचर्चित व बालवाचकप्रिय ठरलेल्या बालकादंबरीचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. याच वेळी बुरुटे यांच्या 'गुलमोहोर आणि इतर बालकविता', 'मुले फुले शब्दझुले', 'भुताचं झाड' या तीन बालसाहित्य पुस्तकांचे व शेतीविषयक 'शेतकळा' या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. कवी महादेव बुरुटे हे दोन्ही पायांनी पुर्णतः दिव्यांग असून त्यांची अकरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत...

जतला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करासंघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी घेतली आ. विक्रमसिंह सावंत यांची भेट

इमेज
फोटो जत- आ. विक्रमसिंह सावंत यांना निवेदन देताना संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर जत/प्रतिनिधी:- जत तालुक्याला पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी केली आहे. संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी आ. विक्रमसिंह सावंत यांची जत येथे भेट घेवून निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सरदार पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग उपस्थित होते. जत तालुका हा विस्ताराने मोठा तालुका आहे. तालुक्यात प्राथमिक शाळेची संख्या जास्त आहे. तालुक्याचा विस्तार पाहता जत पंचायत समितीमध्ये पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी असणे गरजेचे आहे तेव्हा जतला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नियुक्त करावा. सध्या गटशिक्षणाधिकारी असलेले दिनकर खरात यांच्याकडे गट विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे.  तालुक्याला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी यांची नियुक्ती करावी, केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भराव्यात जत शहरामध्ये शिक्षक भवनला जागा उपलब्ध करून द्यावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण कल्याण समितीमध्ये शिक्षकांचा समावेश करावा या मागण्यांचे...

जत तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची रिपाइं ची मागणी

इमेज
जत:प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब तालुक्याच्या  दौऱ्यावर आले असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला. म्हैसाळ योजनेच्या विस्तारित योजनेस मंजुरी देऊन 6 टी. एम. सी. पाणी तालुक्यातील 65 गावांसाठी विशेष  प्रयत्न   करून दिल्याबद्दल रिपाइंच्या शिष्टमंडळाने मा. जयंत पाटील साहेब यांना भेटून त्यांचा सत्कार व अभिनंदन  केले.व सदरची योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी विनंती करण्यात आली.  त्याचबरोबर जत शहरानजीक महाराष्ट्र शासनाचे खिलार कॅटल फार्मची चारशे  एकर जमीन आहे.  महाराष्ट्रात विस्ताराने सर्वात मोठा असणारा तालुका कायमस्वरूपी दुष्काळ असून या तालुक्यात तरुण व सुशिक्षित लोकांना रोजगार निर्मितीसाठी उदरनिर्वाहासाठी लांब पल्ल्याच्या पुणे मुंबई शहराकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.  त्यातच कोरोनासारख्या महाभयंकर आजारामुळे मोठ्या शहरातील खाजगी व निमसरकारी कंपन्या बंद झाल्यामुळे  तालुक्यातील युवक वर्गावर उपासमारीची वेळ आलेली आहे.जत तालुक्यात कोण...

जीवनात संघर्ष अटळ : उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले

इमेज
*दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलेल्या लायन्सच्या विद्यार्थ्यांचा केला सत्कार* जत /प्रतिनिधी : आयुष्यामध्ये सहज आणि सोप्या रितीने कधीच काही मिळत नाही. युवकांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. छोटी स्वप्ने पाहणे हाच गुन्हा आहे. कित्तेक नावारुपाला आलेली माणसे ही संघर्पातुनच मोठी झालेली आहेत. आपण संघर्षाची तयारी ठेवली तर यश निश्चितच मिळते, असे प्रतिपादन जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी केले. ते लायन्स इंग्लिश मीडियम स्कुलच्या वतीने आयोजित दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बोलत केले.              अध्यक्षस्थानी जतमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व उमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रविंद्र आरळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, इच्छा असेल तर मार्ग निश्चितच निघत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात जय पराजय येतच असतो. हे आपण स्विकारलेच पाहिजे. तसेच भूतकाळात न जाता वर्तमानकाळात जगले पाहिजे. अशा प्रसंगी आपण आई वडील, गुरुजण यांच्या मार्गदर्शनाखाली व...

होलार समाजाला सत्तेमध्ये समाविष्ट करुन घेऊन चर्मकार अर्थिक विकास महामंडळामध्ये स्थान देऊन समाजाला अध्यक्ष व दोन संचालकपदी राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात यावे

इमेज
जत:प्रतिनिधी  होलार समाजाला सत्तेमध्ये समाविष्ट करुन घेऊन चर्मकार अर्थिक विकास महामंडळामध्ये स्थान देऊन समाजाला अध्यक्ष व दोन संचालकपदी राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय होलार समाज संघटना (ए) गटाचे आबासाहेब ऐवळे यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.  महाराष्ट्र राज्यामध्ये होलार समाजाची लोकसंख्या पंचवीस लाख असून या होलार समाजाला स्वातंत्र्या पासुन आज अखेर कोणत्याही पक्षाने राजकीय स्थान दिले नाही. तरी हा समाज नेहमी सांगली जिल्हयामध्ये व महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षासोबत कायम राहिला असुन ना. जयंत पाटील हेच व त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच होलार समाजाला न्याय देऊ शकतो. ना. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने लक्ष घालून होलार समाजाला चर्मकार अर्थिक विकास महामंडळामध्ये स्थान देऊन समाजाला अध्यक्ष व दोन संचालक पदी आपल्या पक्षाकडून देण्यात यावे. होलार समाजाला स्वातंत्र्यापासुन न्याय कोणीही देऊ शकले नाहीत ते आपण देऊन समाजाला न्याय दयावा, असे निवेदनात म्हटले आहे. या मागण्याचे निवेदन देताना आबासाहेब ऐवळे, अविनाश वाघमारे कुंभारीचे ...

जत पंचायत समितीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करावेत - प्राथमिक शिक्षक संघाची मागणी.

इमेज
जत:प्रतिनिधी          जत पंचायत समिती शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करावेत अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघानी केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकाने गेली दोन वर्षे कोरोनासारख्या महामारीत  ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणाची अंमलबजावणी, ज्या ठिकाणी साधी मोबाईलला रेंज नव्हती अशा वाड्या वस्तीवर मुलांना ऑफलाईन शिकता  यावे, मनोरंजक अध्ययन करता यावे, यासाठी काही शिक्षकांनी  ऑफलाईन अँप्सची निर्मिती केली आहे. मुलांच्या साहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयंअध्ययनाच्या संधी उपलब्ध करून देण्यात मुलांना त्यांच्याच बोली भाषेतील पुस्तक  डिजिटल स्वरूपात साहित्य निर्माण केले.शिक्षणातील नव-नवीन उपक्रमांचा अवलंब करून आपल्या शाळेत महत्वपूर्ण बदल घडविले आहेत. विविध अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले. विद्यार्थ्यांना 'योगा' सारख्या अन्य शारिरीक...

अंधश्रद्धा निर्मूलन समिती जत च्यावतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन

इमेज
जत:प्रतिनिधी/PSK NEWS NETWORK 20 ऑगस्ट या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना गोळ्या घालून हत्या करण्यात आली हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो या घटनेला आठ वर्ष होऊन गेली तरीही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी सापडत नाहीत अंधश्रद्धा निर्मूलन समिति च्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. नरेंद्र दाभोळकर यांना जत येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्तंभा जवळ महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अमर रहे शहीद दिनाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या नरेंद्र दाभोळकरांचे कार्य अतुलनीय होते . त्यांनी समाजातील कर्मकांड अंधश्रद्धा वाईट रूढी परंपरा प्रथा यावर प्रखर टीका करून समाजाला वैज्ञानिक दृष्टीकोन देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.असे मत सुनील सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. त्यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन. या कार्यक्रमाला उपस्थित अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सुनील सूर्यवंशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक इब्राहीम नदाफ महिला आघाडीच्या प्रमुख डॉ.श्रद्धा सनमड...

काष्ट्राईब महासंघ वाहन चालक शाखेचे उद्घाटन अमजदखान मिरजकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

इमेज
  जत:प्रतिनिधी/PSK NEWS NETWORK सांगली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ कास्ट्राईब शासकीय संलग्न व निमशासकीय वाहन चालक संघटना शाखेच्या उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.अमजदखान मिरजकर यांची सांगली जिल्हाध्यक्षपदी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, प्रमुख उपस्थिती महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमासाठी, मार्गदर्शक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, प्रमुख पाहुणे राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जे.के. महाडिक, कार्याध्यक्ष डी. जी. मुलाणी, चतुर्थ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय व्हनमाने, सॅलरी सोसायटीचे चेअरमन व्हा. चेअरमन राजेंद्र कांबळे, बावधनकर, पाटबंधारे पतसंस्था चेअरमन प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.  यावेळी नुतून कार्यकारणी जाहीर करण्यात आले.निवड झालेले कार्यकरणी याप्रमाणे आहे. ज...

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं श्रेय जोतिरावांचंच!'

पोवाडारुपी ‘शिवचरित्र’ लिहून आणि प्रकाशित करून महाराजांचा पराक्रमी वारसा घराघरांत पोहोचवण्याचं खरं श्रेय जातं ते महात्मा फुले यांनाच. जोतिरावांच्या या महान कार्यावर प्रकाश टाकलाय, प्रा. हरि नरके (Prof. Hari Narke)... यांनी  शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिलं जातं. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला. ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तथापि त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली पुण्याचे महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. १८६९ साली म. जोतिराव फुलेंनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. जोतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जोतिरावांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायां...

बाळकृष्ण गॅस सर्व्हिसेस जत कडून ग्राहकांची लूट, घेतलेले जादा पैसे ताबडतोब परत करा ः श्रीकांत हुवाळे सर

इमेज
जत /PSK NEWS NETWORK  जत शहर आणि तालुक्याताल ग्र्रामीण भागातील लोकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यासाठी अधिकृत बाळकृष्ण गॅस सर्व्हिसेस या डीलरची नेमणूक केलेली आहे. परंतु ग्रामिण भागात गॅस सिलेंडर पुरवठा करणार्या वाहनधारकांकडून जादा पैसे घेऊन गॅस सिलेंडर दिल्याचे निदर्शनास आल्याने ज्यांचे जादा पैसे घेतलेले आहेत त्यांना तत्काळ परत करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष श्रीकांत हुवाळे यांनी दिला आहे.   याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 16 ऑगस्ट पूर्वी ज्या ज्या गॅस ग्राहकांनी गॅस बुकींग केलेला आहे. त्यांना पावती प्रमाणे 842.50 रुपयेे घेणे आवश्यक होते. परंतु 16 ऑगस्टच्या मध्यरात्री पासून गॅस सिलेंडरची किमंत 867.50 रुपयांने वाढल्याने जत तालुक्याच्या ग्रामिण भागात सिलेंडर पुरवठा करणार्या वाहनधारकांनी आज मध्यरात्री पासून गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत असे सांगून प्रत्येक ग्राहकांकडून 870/- ते 880/- रुपये घेतले आहेत.   म्हणजेच प्रत्येक गॅस ग्राहकांकडून सिलेंडर टाकीमागे जादा 30 ते 40 रुपये घेतलेले आहेत. ज्या गॅस धारकांनी 842.50 रु.च...

युवा नेते संतोष साबळे यांचा बहुजन समाज पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

इमेज
जत:प्रतिनिधी जत शहरातील जनतेच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी कायम अग्रेसर असणारे संतोष (भैय्या)साबळे यांचा बहुजन समाज पार्टी मध्ये सांगली जिल्हा प्रभारी अतुल (दादा)कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुमधडाक्यात इन्ट्री.  कोरोना महामारीच्या कठीण काळात जत शहरातील गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जात भक्कम अशी मदत केली आहे.गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची जत शहरात ओळख आहे.तसेच त्यांनी जनतेच्या मनात त्यांची एक वेगळीच आपुलकी आणि छाप निर्माण केली आहे.बहुजन समाज पार्टी च्या माध्यमातून व अतुल (दादा) कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या पुढे मोठ्या ताकतीने जत शहरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतील.त्यांनी बहुजन समाज पार्टी मध्ये प्रवेश केल्याने जत शहरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संपादक शशिकांत हेगडे मो.90110 19031

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

इमेज
जत/प्रतिनिधी:-  जत तालुक्यातील शेगाव येथे चिंचेच्या झाडाचा पहिला , दुसरा नव्हे तर २१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.  दुष्काळी जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसाव्याच्या ठिकाणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, जागर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांच्या उपस्थित हा वाढदिवस सोहळा रंगला.  शेगाव येथील प्रल्हाद बोराडे हे सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. मूळचे शेगाव येथील प्रल्हाद बोराडे व त्यांच्या पत्नी उज्जवला बोराडे यांनी ने २१ वर्षांपूर्वी पहिले चिंचेचे झाड शेगाव येथे लावले. राजाराम शिंदे यांनी नियोजनबध्द झाडांची लागण केली तर त्याचे पालनपोषण संभाजी बोराडे यांनी केले. २१ वर्षात नुसते झाडेच त्यांनी लावली नाहीत तर ती जोपासलीही आहेत. २१ वर्षात लावण्यात आलेल्या या झाडांमुळे हा भाग आता चिंच विसावा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.  जिकडे पहावे तिकडे चिंचेची झाडे आहेत. प्रत्येक झाडाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. झाडांना नद्यांची नावे देण्यात आली आहेत. चिंच विसाव्याला थांबले की तेथील वेगळेपण ...

धानेश्वरी उद्यानाच्या सुशोभीकरण करू आम.विक्रमसिंह सावंत यांचे आश्वासन

इमेज
  जत:प्रतिनिधी/PSK NEWS NETWORK जत शहरातील धानेश्वरी उद्यानाच्या विकास निधी साठी आमदार विक्रमसिंह सावंत यांना निवेदन देण्यात आले. जत शहरातील धानेश्वरी उद्यान शुशोभीकरण करणे, कंपाऊंड,पेविंग ब्लॉक बसविणे, लहान मुलांचे खेळांचे साहित्य, व्यायाम शाळा हे सर्व धानेश्वरी उद्यानाचे काम येत्या दीड ते दोन महिन्यात करून देण्याचे आश्वासन आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी येथील नागरिकांना दिले.यावेळी अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमोल भैय्या साबळे, सुनील अंकलगी, मेजर महेशकुमार जगताप, मेजर विजय पवार, बाळासाहेब सूर्यवंशी, मेजर रामचंद्र साळुंखे, सचिन संतिकर, प्रदीप कत्ती, फिरोज नदाफ, प्रमोद चव्हाण आदी उपस्थित होते. संपादक शशिकांत हेगडे मो. 90110 19031

*"शासनकर्ती जमात" व्हायला आकडेवारी नव्हे तर प्रचंड "ईच्छा-शक्ती" ही लागते....*

*"शासनकर्ती जमात" व्हायला आकडेवारी नव्हे तर प्रचंड "ईच्छा-शक्ती" ही लागते....* 🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅 *१९९३ ला जेव्हा सुरुवातीला मुलायम मुख्यमंत्री असलेली* *#सपा_बसपा युती तुटली* *#भाजपकडे_१७७,* *#सपाकडे_१०९ आणि* *#बसपाकडे_६७ जागा होत्या.* *#अटलबिहारीना वाटलं* *#कांशीराम फोन करेल आणि म्हणेल* *"#अटल_आप_सरकार_बनाओ मैं समर्थन देता हूं!"* *आणि* *#अटलबिहारीचा फोन वाजला. फोन* *#कांशीरामचा होता.* *अटलबिहारी खुश झाले. #कांशीराम_म्हणाले," अटल मैं #सरकार_बना रहा हूं #समर्थन_दोगे क्या ?"* *#अटलबिहारी_शॉक मध्ये. भाजपचे १७७ आणि बसपाचे ६७ आमदार आणि हा माणूस बोलतोय,"मैं* *#सरकार बना रहा हूं* *#समर्थन दोगे क्या ?"* *कांशीराम* *म्हणाले,"पुन्हा निवडणूक व्हाव्या आणि जनतेचा पैसा खर्च व्हावा ही माझी इच्छा नाही, तुम्हाला सरकार बनवायचे असेल तर माझा पाठिंबा लागेल आणि तो मी देणार नाही. जर माझ्या सरकारला तुम्ही पाठिंबा देत असाल तर मला हरकत नाही. हजारो वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या आमच्या समाजाला "#हुकमरान" #बनवायची ही* *#संधी_मी_सोडण...

प्रभागामध्ये श्रीकांत सोनवणे यांनी केले मुरुमीकरण जतच्या प्रभाग ८ मध्ये रस्त्याचे मुरुमीकरण, डागडुजी

इमेज
  जत (प्रतिनिधी) : /PSK NEWS NETWORK जत शहरातील प्रभाग आठमधील सर्व वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांवर जेथे पावसाचे पाणी साचले आहे, त्याठिकाणी बहुजन समाज पक्षाचे उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांनी स्वखर्चातून मुरूम टाकून रस्ते दुरुस्त करून घेतले.  प्रभाग क्रमांक आठमध्ये बऱ्याच दिवसांपासून छत्रीबाग रोड, पठाणसाब मंदिर, पाटील गल्ली, रामराव नगर व इतर काही परिसरामध्ये गटारीचे घाण पाणी आणि पावसाचे पाणी थांबून राहत असल्यामुळे येथील लहान मुले व नागरिकांना बऱ्याच रोगराईला व आजारांना सामोरे जावे लागत होते. तसेच रोड वरती चिखल होत असल्यामुळे वाहनांचे छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांना त्रास होत होता. नागरिकांनी हा होणार त्रास बहुजन समाज पार्टीचे उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांना सांगितला. त्यावर उपाय काढत श्रीकांत सोनवणे यांनी त्या परिसरातील रोडवरती समोर थांबून मुरुमीकरण करून घेत जेसीबी मशीनच्या साह्याने ठीक ठिकाणी साचणारे गटारीचे घाण सांड पाण्याचे खड्डे मुजवून घेतले व गटारीच्या घाण पाण्याला वाट करून दिली.यावेळी श्रीकांत सोनवणे, तानाजी वाघमारे, अब्दुल शेख, सागर माळी, शशिकांत शिनगारे, विश्वज...

कवी लवकुमार मुळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सेवा मंचच्यावतीने सत्कार

इमेज
जत:प्रतिनिधी जत तालुक्यातील शेगाव येथील कवी लवकुमार मुळे यांच्या कवितासंग्रहांना पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सेवा मंच,जतच्यावतीने चिंच विसावा येथे सत्कार करण्यात आला. मुळे यांच्या 'कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे' व 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' या कवितासंग्रहांना शब्दांगन संस्था, चंद्रपूरचे यांचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार  मिळाला आहे. साहित्य सेवा मंचचे अध्यक्ष व पत्रकार किरण जाधव, साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, प्रा, कुमार इंगळे, 'चिंच विसावा'चे व्यवस्थापक  प्रल्हाद बोराडे, सौ,बोराडे. अनिकेत ऐनापुरे आदी उपस्थित होते. लवकुमार मुळे शेगाव यांचे आतापर्यंत 'गुलमोहर' , 'भावमुद्रा', 'काळीजवेणा', 'अर्ध वेलांटी', 'कोणत्याही शक्यतेच्या पलीकडे', 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' आदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत. 'कोलाहल' व 'आत्म संवादाचे पांढर पक्षी' हे संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या कवितासंग्रहांना शब्दांगण पुरस्कार( मिरज), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा विशेष पुरस्कार ,कै सुरेश कुलकर...

प्रा.निर्मला मोरे यांना पी.एचडी. मिळाल्याबद्दल सत्कार

इमेज
जत:प्रतिनिधी जत येथील राजे रामराव महाविद्यालयातील प्रा.निर्मला वसंत मोरे यांना पी. एचडी. मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे, मराठा सेवा संघाचे अरुण शिंदे व प्रा.कुमार इंगळे उपस्थित होते. प्रा.निर्मला मोरे यांना शिवाजी विद्यापीठाची 'समकालीन मराठी ग्रामीण कथेतील स्त्री जीवन' या विषयावर पी. एचडी. मिळाली आहे. याबद्दल साहित्य सेवा मंचच्यावतीने साहित्यिक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.निर्मला मोरे या नववी पास होत्या. लग्नानंतर शिक्षण घेऊन त्या प्राध्यापक झाल्या.त्यांनी ग्रामीण स्त्री जीवन जवळून पाहिले असून साहित्यातील स्त्री जीवनाचा अभ्यास केला आहे. संपादक शशिकांत हेगडे मो.90110 19031

ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना शासनाने मोबाईल किंवा टॅब मोफत द्यावा: श्रीशैल बिराजदार

इमेज
जत:प्रतिनिधी राज्यातील शाळा अद्यापही बंद आहेत. शाळा, महाविद्यालये केव्हा सुरू होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना शासनाने मोबाईल किंवा टॅब मोफत द्यावा, अशी मागणी राजसपा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार (सावकार) यांनी केली आहे.  करोना व्हायरसमुळे मार्च २०२०च्या मध्यावर शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर झाला. शिक्षक आणि विद्यार्थी घरात अडकून पडले तरी शिक्षण दिले व घेतले जाऊ शकते आणि तेसुद्धा रोज वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही कल्पना जोर धरू लागली. प्राथमिक ते अगदी पदव्युत्तर स्तरावरील अध्ययन व अध्यापन ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले. साधनांच्या साहाय्याने मिटिंग्ज आयोजित करून दैनंदिन ऑनलाईन अध्यापन सुरू झाले. लॉकडाउनमुळे मुलांच्या अभ्यासाचे होणारे नुकसान टळले. वेळापत्रक लावून शाळेप्रमाणेच शिक्षकांचे अध्यापन सुरू झाले. केवळ यावरच न थांबता विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी प्रश्न देणे, वेगवेगळे उपक्रम देणे, त्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेणे, विव...

उमदीच्या सुरेखा लोणी ठरल्या मिसेस इंडिया कर्नाटक गडीनाडू भागाच्या सौंदर्यवती*

इमेज
(जत प्रतिनिधी) : कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथे प्रतिभा संशीमठ यांच्या नेतृत्वाखाली रमदा पंचतारांकित हॉटेलमध्ये मिसेस इंडिया कर्नाटक या फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उमदीच्या सुरेखा वैभव लोणी या गडीनाडू कन्नड भागातून पहिल्या विवाहित महिला स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या व मिसेस इंडिया कर्नाटक - ग्लोविंग ब्युटी व मिसेस इंडिया कर्नाटक गडीनाडू हा मुकुट पटकावून पहिल्या सौंदर्यवती ठरल्या. त्यामुळे महाराष्ट्राचा सीमाभाग व उत्तर कर्नाटकातील गडीनाडू ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.           सुरेखा या कै. तम्माराया शिवप्पा लोणी (सेवा निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, मुंबई) यांच्या सून व वैभव लोणी यांची पत्नी आहेत. त्यांना काव्या व रुही या दोन मुली आहेत. उमदीसारख्या दुष्काळी व ग्रामीण भागातील फॅशनच्या दुनियेपासून कोसो दूर असणाऱ्या भागावर व परीस्थितीवर मात करत त्या यशाचा शिखर गाठून जिद्दी सौंदर्यवती ठरल्या, त्यामुळे सगळीकडे आनंदाची व अभिमानाची भावना निर्माण...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जतची मासिक बैठक संपन्न

  जत प्रतिनिधी: उदय गर्जना न्यूज महाराष्ट्र  अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जत ची आज मासिक बैठक संपन्न झाली. या मासिक बैठकीत जत तालुक्याची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. यामध्ये जत तालुका अध्यक्ष म्हणून मच्छिंद्र ऐनापुरे, उपाध्यक्ष  भूपेंद्र कांबळे, कार्याध्यक्ष  सुनील सूर्यवंशी,प्रधान सचिव दत्तात्रेय शिंदे, प्रशिक्षण विभाग प्रमुख सय्यद सर, बुवाबाजी संघर्ष विभाग पदी अर्जुन कुकडे महिला विभाग प्रमुख डॉ श्रद्धा सनमडीकर, विविध उपक्रम या पदी नवनाथ संकपाळ सर आदी मान्यवरांची या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली दिनांक 20 ऑगस्ट रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा शहीद दिन साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच तालुक्यातील अंधश्रद्धा वाढत असल्याने यावर काय उपाय योजना करण्यात येतील यावर चर्चा करण्यात आली. कॉलेज च्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या सामाजिक संघटनेत यावे म्हणून विवेक वाहिनी अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्याचे एकमताने ठरले. जादूटोणाविरोधी कायद्याचे यावेळी  सांगली जिल्हा युवा अध्यक्ष रवि सांगोलकर यांनी मार्गदर्शन केले. सांगली जिल्हा उपाध्यक्ष इब्राहीम नदाफ यांनी कार्य...

सिंदूर येथे सोसायटी इमारतीचे उद्घाटन

इमेज
  जत:प्रतिनिधी सिंदूर येथे सिंदूर सर्व सेवा सह सोसायटी लि, सिंदूर या संस्थेची इमारतीचे उदघाटन मा.आमदार विक्रमसिंह(दादा)सावंत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी माजी पं.स.सभापती बाबासाहेब तात्या कोडग,माजी पं.स.सदस्य मलेश अण्णा कत्ती,माजी सरपंच श्रीशैल मगदूम,सरपंच गंगाप्पा हरोगीरी,चेअरमन शिवानंद हारुगेरी,भींगोंडा रंगोंडा पाटील ग्रा.प.सदस्य श्रीशैल पाटील,इन्स्पेक्टर अब्बास मंगळवेढे,तालुका अधिकारी नाटेकर साहेब,सो.सा.सदस्य भैरप्पा मसाळ,सो.सा. सचिव सिदराय मगदूम,मल्लिकार्जुन घेज्जी, बसर्गी पोलीस पाटील बाबा पाटील,विठ्ठल धोडमनी,व बिळूर जिल्हा परिषद गाटामधील पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. संपादक शशिकांत हेगडे मो.90110 19031

लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

इमेज
जत:प्रतिनिधी/PSKNEWS NETWORK जत येथील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि नर्सिंग कॉलेज,जत येथे 74 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ध्वजारोहण लायन्स क्लबच्या अध्यक्षा लायन सौ सुरेखा पतंगे तसेच प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त श्री आर डी शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.  यावेळी लायन्स क्लब चे कॅबिनेट ऑफिसर दिनकर पतंगे कॅबिनेट ऑफिसर लायन राजेंद्र आरळी,माजी अध्यक्ष ला सचिन संख,किरण पाटील,इंग्लिश मीडियम स्कूल चे इन्स्ट्रक्टर लायन डॉक्टर विद्याधर किट्टद, मुख्याध्यापिका सौ राठोड,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य  माळी व  सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. संपादक शशिकांत हेगडे मो.+91 90110 19031

महाराष्ट्र कलाकार सेनेच्या अध्यक्षपदी दिनकर पतंगे यांची निवड कारमपुरी महाराज

इमेज
        जत:प्रतिनिधी PSK NEWS NETWORK शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र कलाकार सेना पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्षम्हणून दिनकर पतंगे यांची निवड करण्यात आल्याचे  कारमपुरी महाराज प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र कामगार सेना यांनी घोषित केले.दिनकर पतंगे यांचे महाराष्ट्र कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून या पदाचे काम चांगले उत्कृष्ट पद्धतीने चालू असल्याचे सांगितले. आणि हे त्यांचे काम दिसून पण आलेले आहे. त्यामुळे मी त्यांचे वरती महाराष्ट्र कलाकार सेना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष या पदाची जबाबदारी सोपवत आहे मला खात्री आहे ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करू शकतील. महाराष्ट्र कामगार सेनेने त्यांना चांगल्या प्रकारचे सहकार्य व ताकद दिलेली आहे. याचा वापर करून *ते कलाकार सेना तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष या पदाची जबाबदारी निश्चितपणे पार पाडू शकतील यात शंका नाही, असे प्रतिपादन कारमपुरी महाराज सोलापूर यांनी आपल्या कार्यालयात अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र दिनकर पतंगे यांना देत असताना त्यांनी केले.या नवीन क्षेत्रात त्यांना काम करण्याची  खूपच चा...

सांगली जिल्ह्यात कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता: दुकाने, मॉल, उपारगृहे, जिम्नॅशिअम, योग सेंटर, सलून स्पा " या वेळे" पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी : "हे" राहणार बंद

इमेज
सांगली : राज्य शासनाकडील दिनांक 11 ऑगस्ट 2021 च्या मार्गदर्शक सूचनांनूसार जिल्ह्यातील विविध घटकांना शिथिलता देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.  जिल्ह्यात दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून ज्या विविध घटकांना देण्यात आलेली शिथिलतादेण्यात आली आहे. यामध्ये खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 % क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देणेत येत आहे. उपहारगृह / बार मध्ये प्रवेश करताना, प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील. उपहारगृह, बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह, बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री 09.00 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मच...

एकुंडी ते अनंतपूर रस्ता डांबरीकरणासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे निधीची मागणी! सरपंच बसवराज पाटील यांनी दिले निवेदन.

इमेज
जत:प्रतिनिधी PSK NEWS NETWORK सांगली जिल्हा पालकमंत्री जयंत पाटील यांचे ओ.एस.डी.अमोल डफळे यांना एकुंडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बसवराज पाटील यांनी निवेदन दिले. यावेळी उमराणीचे नेते आप्पासाहेब नामद, राहुलसिंह डफळे सरकार, पत्रकार राजु ऐवळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.  एकुंडीहुन कर्नाटकातील अनंतपूरकडे जाणाऱ्या सुमारे दीड किलोमीटरच्या मुख्य रस्त्यावरील खडी पूर्ण उखडून गेल्याने हा रस्ता वाहतूकीस बंद झाला होता. सदर रस्त्यावर सरपंच बसवराज पाटील यांनी स्वखर्चातून मुरूम टाकून तात्पुरती दुरूस्ती केला. सदरच्या रस्त्यावरून खिळेगाव येथील प्रसिध्द देवस्थान बसवेश्वरला जाणाऱ्या भक्तांची ये-जा असल्याने एकुंडी, वज्रवाड, बिळूर, जिरग्याळ, मिरवाड या गावांतील नागरिक याचं रस्त्याने खिळेगावकडे जात असल्यामुळे हा रस्ता डांबरीकरण करणे महत्त्वाचे आहे. जत जांबोटी या महामार्गाला जोडणारा हा या भागातील मुख्य ग्रामीण मार्ग आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्याने हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 1.20 कोटी निधी मंजूर करण्याची मागणी एकुंडी ग्रामपंचायतचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवर...

एकुंडी येथे कोविड लसीकरण मोहीम

इमेज
  जत:प्रतिनिधी PSK NEWS NETWORK आरोग्यवर्धिनी उपकेंद्र जिरग्याळ व ग्रामपंचायत एकुंडी यांच्या सहकार्याने जत तालुक्यातील एकुंडी येथे शनिवारी (दि.३१) रोजी नागरिकांनी कोरोना लसीकरणाला उदंड प्रतिसाद दिला. गत अनेक दिवसांपासून आरोग्य विभाग नागरिकांना प्रबोधन, समुपदेशन करीत होते. तरीही नागरिक कोरोना लसीकरण घेण्यास पुढे येत नव्हते. ऐकीव अफवा, गैरसमज, चुकीच्या माहितीमुळे नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते. अखेर आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीबाबत समस्या -अडचणी समजून त्याप्रमाणे समुपदेशन केले असता लाभार्थी लस घेण्यास तयार झाले. यावेळी गावातील १८ वर्षांवरील अनेक नागरिकांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.यावेळी एकुंडीचे लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील,जिरग्याळ उपकेंद्राचे सि.एच.ओ श्री पी.डी.मोरे, आरोग्य सेवक बी.एस.माने, आरोग्य सेविका ए.ए.वाघमोडे, आशा वर्कर एस.आर.माने, एच.एम.ऐवळे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. संपादक शशिकांत हेगडे मो. 90110 19031

कुंभारी येथे सवोॅदय व्यापारी पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन

इमेज
जत:/ PSK NEWS NETWORK कुंभारी ता.जत येथे सवोॅदय व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ह भ प तुकाराम बाबा महाराज,शंकर नाना जाधव,युवा नेते नाथा पाटील,डॉ. मनोहर मोदी,ॲङ.प्रभाकर जाधव,माजी जि प सदस्य प्रकाश भोसले, माजी सरपंच प्रकाश पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच राजाराम जावीर, उपसरपंच प्रदीप जाधव,माजी सरपंच धोंडीराम कोल्हापुरे,माणिक वाघमोडे,आप्पासाहेब मसाळ,राम खांडेकर,मधुकर भोसले,मधुकर सूर्यवंशी,बाळासाहेब जाधव,सुनील शिंदे,हिम्मत देवकते,अशोक जाधव,पंडा कोळी,कमलाबाई पाटील,श्रीमती संगीता अरबळी,संस्थेचे संस्थापक चेअरमन अशोकराव पाटील ,चेअरमन मनोहर पवार,शिवाप्पा बुद्धीहाळ,अंकुश काशीद,बसाप्पा बेङगे, अण्णाप्पा माळी,रामचंद्र मदने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना मनोहर मोदी म्हणाले,सर्वोदय व्यापारी पतसंस्थेने जत, मुचंडी,कुंभारी येथे शाखा सुरू करून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा दिला आहे.तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये शाखा काढून सभासदांची चांगली सेवा करावी असे आवाहन केले. तुकाराम...

जत नगरपरिषदेने पूर्ण झालेल्या शौचालयाची बिले त्वरित द्या - विजय ताड

इमेज
जत:प्रतिनिधी जत नगरपरिषदेकडील पूर्ण झालेल्या शौचालयाचे अनुदान अदा करणे विषयी वारंवार नगरपरिषदेकडे लेखी पत्र व्यवहार करूनही नगरपरिषद शौचालयाचे अनुदान देण्यास टाळाटाळ करीत आहे.शासनाचा शौचालयचा निधी नगर परिषदेकडे उपलब्ध असूनही जाणून बुजून अनुदान विषयी नगरपरिषद उदासीन असल्याचे दिसून येत आहे.नगरपरिषदेने तात्काळ अनुदान अदा न केलेस जनतेसाठी रस्त्यावर आंदोलन आंदोलन करण्याचा इशारा पत्रकारांशी बोलताना नगरसेवक विजय ताड यांनी दिला.  ताड पुढे म्हणाले,शहरातील जनतेने कर्जे काढून,सोने मोडून शौचालय पूर्ण केले आहे.मी अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार केला आहे.तरीही शौचालयाचे अनुदान दिले जात नाही.याविषयी लाभार्थी त्रस्त झाले आहेत.तसेच जत नगरपरिषदेच्या अकार्यक्षमते बाबत आत्महत्या करावी की काय असे जनतेला वाटत आहे. तरी त्वरित लाभार्थीच्या शौचालयाचे अनुदान अदा करावे.अनुदान अदा न केल्यास जत शहरातील गोरगरीब जनतेस घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करु याची नगरपरिषदेने नोंद घ्यावी.  ..                                   ...

जखमी हंस : सिद्धार्थ आणि देवदत्त यांच्यातील वाद (बुद्ध कथा

इमेज
) ---------------------------------------------------------- अनेक वर्षांपासून या कथेबद्दल आपण ऐकत आलो. बुद्धपदी पोहोचण्यापूर्वीच सिद्धार्थला सजीवांबद्दल असलेली करूणा या कथेतुन स्पष्ट होते. नेमका हा प्रसंग काय होता हे या गोष्टीतुन जाणून घ्या. सिध्दार्थ एकदा आपल्या पित्याच्या शेतावर गेला होता. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसुन तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता.     इतक्यात आकाशातुन एक पक्षी त्याच्यासमोर पडतो, त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता.   सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला, त्याने त्याच्या अंगातील बाण उपटुन काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले.  त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुडांळले आणि उब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले.  सिद्धार्थला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे.  थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिका...

नक्की वाचा अभिमान होईल बौध्द आसल्याचा.. 🔹"मी संपूर्ण भारत बुध्दमय करीन"-: डाँ.बाबासाहेब आंबेडकर

नक्की वाचा अभिमान होईल बौध्द आसल्याचा..  🔹"मी संपूर्ण भारत बुध्दमय करीन"-: डाँ.बाबासाहेब आंबेडकर,      -:१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. २६ जानेवारी,१९५० रोजी देशाचे बारसे करण्यात आले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून, बुद्धांच्या देशाला सम्राट अशोकाच्या देशाला नव्या रुपात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगासमोर मांडले. भारताची जी ओळख जगाला ठाऊक होती, तीच ओळख भारतीय संविधानाने जगासमोर पुनर्स्थापित केली. आपल्या देशाची संपूर्ण ओळख, बुद्ध धम्माची ओळख झाली. उदा... 🔵*बुद्ध धम्माचे प्रतिक आकाशी निळ्या रंगाला राष्ट्रीय रंगाची मान्यता देण्यात आली, 🌷*धम्माचे प्रतिक कमळाचे फूल आपले राष्ट्रीय फूल झाले, 🌳*बोधीवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला राष्ट्रीय वृक्षाची मान्यता मिळाली. *बुद्धधम्माच्या धम्मचकाला राष्ट्रीय चिन्ह घोषित करुन राष्ट्रीय ध्वजावर अंकीत करण्यात आले. *सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ येथील चारसिंह ही राजमुद्रा, भारताची राजमुद्रा घोषित झाली. *समता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुत्व हे बुद्ध धम्माचे तत्त्व भारतीय संविधानाचे तत्त्व म्हणून स्विकारण्यात ...

महानायक अण्णाभाऊ साठे

महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. याच प्रबोधनाच्या परिवर्तनवादी चळवळीत काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ यांचे काम फक्त प्रबोधन पर्यंतच मर्यादित न राहता अण्णाभाऊ हे एक कुशल संघटक ही होते. आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज देशभर साजरी होत आहे याच पार्श्वभूमीवर हा लेख लिहिण्याचा प्रयत्न *अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव तालुका-वाळवा जिल्हा-सांगली या ठिकाणी झाला.* महाराष्ट्राला प्रबोधनाची चळवळ आहे, तसेच महाराष्ट्र आणि देशात जातीव्यवस्था ही तितकीच मजबूत होती.जाती व्यवस्थेमध्ये अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या मांग जातीत या महानायकाचा जन्म झाला.  त्या काळात महाराष्ट्रामध्ये जातीच्या बाबतीमध्ये परिस्थिती काय असू शकते याचा अंदाज आपणास आला असावा. तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णाभाऊ हे अतिशय गरीब कुटुंबातले होते.त्यांच्या वडिलांची इच्छा होती की अण्णाभाऊंनी शाळा शिकावी आणि वडिलांच्या आग्रहाखातर अण्णाभाऊ यांनी शाळेत प्रवेश घेतला. शाळेत गेल्यावर प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यांची वेगळी लाईन तिथे होती, त्याच पद्धतीने मांग जातीच्या लाईन मध्ये अण्णाभाऊंन...