जत नगरपरिषदेने पूर्ण झालेल्या शौचालयाची बिले त्वरित द्या - विजय ताड
जत:प्रतिनिधी
जत नगरपरिषदेकडील पूर्ण झालेल्या शौचालयाचे अनुदान अदा करणे विषयी वारंवार नगरपरिषदेकडे लेखी पत्र व्यवहार करूनही नगरपरिषद शौचालयाचे अनुदान देण्यास टाळाटाळ करीत आहे.शासनाचा शौचालयचा निधी नगर परिषदेकडे उपलब्ध असूनही जाणून बुजून अनुदान विषयी नगरपरिषद उदासीन असल्याचे दिसून येत आहे.नगरपरिषदेने तात्काळ अनुदान अदा न केलेस जनतेसाठी रस्त्यावर आंदोलन आंदोलन करण्याचा इशारा पत्रकारांशी बोलताना नगरसेवक विजय ताड यांनी दिला.
ताड पुढे म्हणाले,शहरातील जनतेने कर्जे काढून,सोने मोडून शौचालय पूर्ण केले आहे.मी अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार केला आहे.तरीही शौचालयाचे अनुदान दिले जात नाही.याविषयी लाभार्थी त्रस्त झाले आहेत.तसेच जत नगरपरिषदेच्या अकार्यक्षमते बाबत आत्महत्या करावी की काय असे जनतेला वाटत आहे.
तरी त्वरित लाभार्थीच्या शौचालयाचे अनुदान अदा करावे.अनुदान अदा न केल्यास जत शहरातील गोरगरीब जनतेस घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करु याची नगरपरिषदेने नोंद घ्यावी.
..
नुकताच सांगली,मिरज,कुपवाड महानगरपालिकेत घरकुल अनुदान विषयी महापालिकेत हेलपाटे मारून लाभार्थी महिला मरण पावली त्यानंतर तिच्या अनुदानाचा चेक काढण्यात आला हा विषय सध्या जिल्हाभर गाजत आहे.अशी वेळ जत नगरपरिषदेवर येऊ नये.तरी त्वरित लाभार्थी हयात असे पर्यंत अनुदान अदा करण्यात यावे.
संपादक
शशिकांत हेगडे
मो. 90110 19031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा