जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज
जत/प्रतिनिधी:-
जत तालुक्यातील शेगाव येथे चिंचेच्या झाडाचा पहिला , दुसरा नव्हे तर २१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. दुष्काळी जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसाव्याच्या ठिकाणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, जागर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांच्या उपस्थित हा वाढदिवस सोहळा रंगला.
शेगाव येथील प्रल्हाद बोराडे हे सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. मूळचे शेगाव येथील प्रल्हाद बोराडे व त्यांच्या पत्नी उज्जवला बोराडे यांनी ने २१ वर्षांपूर्वी पहिले चिंचेचे झाड शेगाव येथे लावले. राजाराम शिंदे यांनी नियोजनबध्द झाडांची लागण केली तर त्याचे पालनपोषण संभाजी बोराडे यांनी केले. २१ वर्षात नुसते झाडेच त्यांनी लावली नाहीत तर ती जोपासलीही आहेत. २१ वर्षात लावण्यात आलेल्या या झाडांमुळे हा भाग आता चिंच विसावा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
जिकडे पहावे तिकडे चिंचेची झाडे आहेत. प्रत्येक झाडाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. झाडांना नद्यांची नावे देण्यात आली आहेत. चिंच विसाव्याला थांबले की तेथील वेगळेपण दिसून येते.
चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, जागर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी स्वातंत्रदिनी शेगाव येथील या चिंच विसाव्याला आवर्जुन भेट दिली. या भेटीदरम्यान बोराडे दांपत्याच्या उपस्थिती २१ वर्षांपूर्वी लावलेल्या चिंचेच्या झाडाचे पूजन करून केक कापून त्याचा २१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, जागर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांच्या हस्ते चिंच विसावा येथे वृक्षारोपण करण्यात आले. जागर फौंडेशचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनीही प्रल्हाद बोराडे यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजू वाघमारे, अविनाश सर, ग्रामसेवक बिभीषण सावंत,डॉ.नाना हालगुंडे, डॉ.बाळासाहेब मागाडे, बंडू वाघमोडे,जॉकेश अदाटे, अनिल मदने, गोपाल पाथरूट, भागवत काटकर आवर्जून उपस्थित होते.
■ चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा
झाडांसाठी रडणारे हे प्रल्हाद बोराडे
झाडावर जिवापार प्रेम करणारे वृक्षप्रेमी म्हणून प्रल्हाद बोराडे यांना भविष्यात ओळखले जाईल. माणसासाठी रडणारे हजारजण पाहिले पण झाडांना काही झाले तर आहेत पण झाडांसाठी रडणारे हे प्रल्हाद बोराडे आहेत. या शब्दात चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
एखादे झाड लावणे व सांभाळणे ही साधी व सोपी गोष्ट नाही. आज अनेक ठिकाणी वृक्षारोपण होते पण तेथे दुसऱ्या वर्षी वृक्ष गायब व खड्डा तेवढा राहिलेला असतो पण याला अपवाद ठरले आहेत ते प्रल्हाद बोराडे. २१ वर्ष झाडे लावली, झाडे जगवली व आज हे ठिकाण चिंच विसावा म्हणून ओळखले जात आहे. जत तालुक्याच्या वैभवात, वेगळेपणात त्यांनी भर घातली असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.
संपादक
शशिकांत हेगडे
मो.90110 19031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा