पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वळसंग ग्रामपंचायत सरपंचपदी सौ चंद्रभागा कांबळे यांची निवड

इमेज
जत/प्रतिनिधी: वळसंग ता जत येथे अँड एम के पुजारी गटाच्या सौ चंद्रभागा कांबळे यांची निवड झाली. २९ मे रोजी शासन जी आर नुसार रिक्त पदे भरण्याचा आदेश आला आणि अँड एम के पुजारी गटाच्या सौ चंद्रभागा कांबळे यांची सरपंच पदि निवड करण्यात आली. या निवडीमुळे गावातील एकंदर सत्ता ही अँड एम के पुजारी गटाकडे आली आहे.गावातील रखडलेल्या कामाचा निपटारा करणे हाच आमचा उद्देश असून पुजारी गटाने ग्रामदेवता श्री केंचराय मंदिरात श्रीफळ अर्पण करून ग्रामस्थाना वचन दिले. या कार्यक्रमाला जत नागरपरिषदेचे माझी बांधकाम सभापती व विद्यमान नगरसेवक भुपेंद्र दादा कांबळे यांनी उपस्थित राहून नूतन सरपंच व अँड एम के पुजारी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  यावेळी गावातील पुजारी गटातील सदाशिव कांबळे, नागप्पा कोळी, कार्यप्पा गावडे, रामचंद्र बिराजदार, सायप्पा कांबळे, नागेंद्र पुजारी, विश्वनाथ माळी, महादेव बंडगर, महादेव सायर, महाराज पाटील, गुंडप्पा सरगर, चनाप्पा तनगी, सोमनाथ कुलंगी, सहदेव डोंबळे,विठ्ठल मुचंडी आदी उपस्थित होते. सहा महिन्यांपूर्वी काँग्रेस ग्रामपंचायत सदस्य सौ चंद्रभागा सायप्पा कांबळ...

रुपेश शिंदे यांची माहिती सेवाभावी संस्था तालुका अध्यक्षपदी निवड

इमेज
जत/प्रतिनिधी: माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप (भाऊ)लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र संघटक महेंद्र (भाऊ)साठे यांच्या नेतृत्वाखाली २९ मे २०२० रोजी रुपेश शिंदे (R D सरकार) यांची जत तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.सामाजिक कार्य म्हणून R D Sarkar यांची अशी वेगळीच ओळख असलेले समाजसेवक गोरगरीबांसाठी सतत काम करत आहे. आपण सर्व सामाजिक क्षेत्रात सामान्य व गोरगरीबन्याय देण्यासाठी व सांगली जिल्ह्यात संस्था वाढवण्यासाठी काम करत राहू असे निवड झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

जागर फाऊंडेशन मुंबईत राबवतेय सामाजिक उपक्रम सॅनिटाइझर फवारणी, मास्क,जीवनावश्यक किट वाटप

इमेज
जत प्रतिनिधी: जत तालुक्यातील जागर फाउंडेशनचे मुंबई शाखेचे अध्यक्ष समाजसेवक हेमंत आयवळे यांनी मुंबईतील झोपडपट्टी परिसरात स्वखर्चाने मास्क,सॅनिटाइझर फवारणी तसेच ५०० जीवनावश्यक किटचे केले वाटप. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे वास्तवास असलेले हेमंत आयवळे हे स्वतः सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या सहकार्यसोबत कोरोनाची मुंबईमध्ये शिरकाव झाल्यापासून झोपडपट्टी परिसरात स्वखर्चाने सॅनिटायझर फवारणी करून जनतेला कोरोनविषयी जनजागृती करीत आहेत.त्यांनी आत्तापर्यंत ५०० जीवनावश्यक किट चे वाटप केले आहे.तसेच लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी मास्क चे वाटप केले. सध्या कोरोनाचा मुंबईतील धरावी झोपडपट्टी तसेच अनेक झोपडपट्टी परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे यात प्रशासना बरोबर समाजसेवक हेमंत आयवळे हे आपल्या कुटुंब व सहकार्या सोबत जिथे दुर्लक्षित भाग आहे अशा सर्व ठिकाणी जाऊन सॅनिटाइझर फवारणी करून कोरीना पासून स्वतःचा कसा बचाव करायचा याविषयी जनजागृती व जिथे जीवनावश्यक किट ची आवश्यकता असेल तिथे जाऊन वाटप करतात. या त्...