वळसंग ग्रामपंचायत सरपंचपदी सौ चंद्रभागा कांबळे यांची निवड


जत/प्रतिनिधी:
वळसंग ता जत येथे अँड एम के पुजारी गटाच्या सौ चंद्रभागा कांबळे यांची निवड झाली.

२९ मे रोजी शासन जी आर नुसार रिक्त पदे भरण्याचा आदेश आला आणि अँड एम के पुजारी गटाच्या सौ चंद्रभागा कांबळे यांची सरपंच पदि निवड करण्यात आली.

या निवडीमुळे गावातील एकंदर सत्ता ही अँड एम के पुजारी गटाकडे आली आहे.गावातील रखडलेल्या कामाचा निपटारा करणे हाच आमचा उद्देश असून पुजारी गटाने ग्रामदेवता श्री केंचराय मंदिरात श्रीफळ अर्पण करून ग्रामस्थाना वचन दिले.

या कार्यक्रमाला जत नागरपरिषदेचे माझी बांधकाम सभापती व विद्यमान नगरसेवक भुपेंद्र दादा कांबळे यांनी उपस्थित राहून नूतन सरपंच व अँड एम के पुजारी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

यावेळी गावातील पुजारी गटातील सदाशिव कांबळे, नागप्पा कोळी, कार्यप्पा गावडे, रामचंद्र बिराजदार, सायप्पा कांबळे, नागेंद्र पुजारी, विश्वनाथ माळी, महादेव बंडगर, महादेव सायर, महाराज पाटील, गुंडप्पा सरगर, चनाप्पा तनगी, सोमनाथ कुलंगी, सहदेव डोंबळे,विठ्ठल मुचंडी आदी उपस्थित होते.

सहा महिन्यांपूर्वी काँग्रेस ग्रामपंचायत सदस्य सौ चंद्रभागा सायप्पा कांबळे व नकुसा उमेश बंडगर यांनी
अँड एम के पुजारी यांच्या गटात प्रवेश करून खासदार संजय (काका)पाटील यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश होता.त्यानंतर लगेच सरपंच पदाची निवड लावून सौ चंद्रभागा सायप्पा कांबळे यांचा सरपंच पदासाठी अर्ज भरला असता त्यावेळच्या जीआर नुसार जात वैधात प्रमाण पत्र नसल्यामुळे त्यावेळी त्यांची निवड झाली नाही.
त्यानंतर २४ मार्च रोजी पुन्हा सरपंच पदाची निवड लावली परंतु कोरोनामुळे २३ मार्चला संचार बंदी लागू झाली आणि पुन्हा एकदा सरपंच पदासाठीची निवड रद्द झाली.अखेर २९ मे रोजी शासन जी आर नुसार रिक्त पदे भरण्याचा आदेश आला आणि अँड एम के पुजारी गटाच्या सौ चंद्रभागा कांबळे यांची सरपंच पदि निवड करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule