पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संजय राऊत यांना पाठवलेला हा लेख सर्व बहुजन

*संजय राऊत यांना पाठवलेला हा लेख सर्व बहुजन बांधवांनी काळजीपूर्वक वाचावा व त्यातून बोध घेऊन हिंदू उर्फ ब्राह्मणी धर्माचा त्वरित त्याग करून लोक कल्याणकारी साऱ्या जगातील महान विचारवंतांनी गौरविलेला तसेच मान्यवर भारतीय  महान विचारवंत  कृष्णाजी अर्जुन  केळुसकर गुरूजी, महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे,  विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे साहेब, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,  प्रकांड पंडित डाॅ. आ.ह.साळुंखे सर, प्रा. मा.म. देशमुख सर यांच्यासारख्या महान दिग्गज नेत्यांनी गौरविलेला बुद्ध धम्म  स्वीकारावा ही आग्रहपूर्वक - प्रेमपूर्वक  कळकळीची नम्र विनंती ! धन्यवाद.*💐👍✌🙏 *संजय राऊतजी, आपले अभिनंदन !कालच्या 'सामना' मध्ये ब्राह्मण्यावर आपण केलेला हल्ला खूपच महत्त्वाचा आहे. प्रबोधनकारांच्या  लेखणीची आठवण करून देणारा हा लेख आहे. केवळ हिंदुंचेच नव्हे तर सर्वच धर्माच्या देवांनी भक्तांना करोना वर सोडले आहे. त्यात नवीन काहीच नाही. जेव्हा जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा तेव्हा देव गायबच असतो.*           ...

संख येथील वयोवृद्ध महिला अत्याचार प्रकरणी आरोपीस तात्काळ अटक करा..वंचित बहुजन आघाडी जत

इमेज
प्रतिनिधी जत संख येथील वयोवृद्ध महिला अत्याचार प्रकरणात आरोपी असलेला टोनाप्पा मायाप्पा हुबणुर या इसमावर  उमदि पोलीस ठाणेत गुन्हा नोंद असला तरी, गुन्हा झाले पासुन आजपर्यंत तो फरार आहे. या आरोपी कडून पिडीत वयोवृद्ध महिला व तिच्या कुटुंबीयाच्या जिवतास धोका आहे , तेंव्हा या  नराधम आरोपीचा शोध घेऊन  तात्काळ अटक करा.. अन्यथा  वंचित बहुजन आघाडी जिल्हाभर आंदोलन करेल असा इशारा वंचित आघाडी जत ने प्रशासनास निवेदनाद्वारे दिला. यावेळी  वंचित बहुजन आघाडी ता.अध्यक्ष अमोलसाबळे ,सुभाष,सव्वाखंडे, अवान्ना कांबळे,संभाजी चंदनशिवे,श्रीकांत सोनवणे, संजय कांबळे(जत ता.अध्यक्ष भारीप )आदी उपस्थित होते.

संख येथील एका वयोवृद्ध मागासवर्गीय महिला अत्याचार प्रकरणी न्याय मिळेल का?

इमेज
प्रतिनिधी माडग्याळ  संख येथील एका वयोवृद्ध मागासवर्गीय महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी ला तात्काळ अटक व्हावी म्हणून  सोमवार दि. २४.ऑगस्ट २०२०  रोजी संख त. जत येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका व दलित पँथर जत या संघटनांनी संख बंद आणि मोर्चा चे नियोजन करत त्यांनी तो यशस्वी केला. संख येथील या वयोवृद्ध मागासवर्गीय महिलेवर  ज्या नराधमाने बलात्कार सारखा अक्षम्य गुन्हा केला आहे त्या     आरोपी ला तात्काळ अटक व्हावी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत  व  दलित पँथर ने  तालुक्याच्या वतीने संख बंद करून आंदोलन केले.या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका  अध्यक्ष श्रीकांत हूवाळे सर. दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक भूपेंद्र कांबळे  जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर.सचिव चित्रसेन कनमडी.विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राकेश कांबळे.रो.आघाडी अध्यक्ष राजेश वर्मा.संघटक इरापा केंगार.उपाध्यक्ष सूरेश कांबळे.निरीक्षक भिमराव कांबळे.उपाध्यक्ष.मलिकार्जून कांबळे.उपाध्यक्ष सर्जेराव उबाळे.संख शाखाध्यक्ष.मच्छिन्द्र धाबे...

व्हसपेठ येथील रेंज फॉरेस्ट ऑफिस पूर्ववत सुरू करावे....मनोहर हुवाळे

इमेज
प्रतिनिधी माडग्याळ सांगली जिल्ह्यातील व्हसपेट, ता. जत हे, जत पुर्व भागातील सर्वात मोठे गाव असुन  व्हसपेट ह्या गावचे वन विभागाचे क्षेत्र हे जत तालुक्यात सर्वात मोठे  क्षेत्र आहे, येथे 20/22 वर्षापुर्वी व्हसपेट येथे रेंज फॉरेस्ट ऑफिस कार्यरत होते. परंतु नंतरच्या काळात शासनाच्या , वनविभागाच्या दुर्लक्षा मुळे,सदर कार्यालय बंद करण्यात आले. व पुढील काळात या इमारतीची पडझड झाली.दि.16.07.2018 रोजी.माजी कँबिनेट मंत्री जगन्नाथ पाटील यांची स्वीय सचिव तथा   समाजसेवक मनोहर हुवाळे यांनी याबाबत उपवनसंरक्षक सांगली कडे लेखी तक्रार दिली होती,त्या अनुषंगाने  सदर कार्यालयाने या साठी 2019-20 या आर्थिक वर्षात तरतुद करण्याचे आश्वासित केले होते. पण आजतागायत कामास सुरुवात हि झाली नसल्याने, मनोहर यांनी जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की, येत्या सप्टेंबर 2020 मध्ये होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा मांडुन सदर विषयास न्याय मिळवुन द्यावा अशी विनंती केली असल्याचे सांगितले. तसेच वनविभागाच्या उत्तर्रात आलेल्या पत्रात तालुक्याच्या ठिकाणी जत येथे एकच रेंज फॉरेस्ट...

जत तालुक्यातील संख येथील ६५ वर्षीय वृद्ध मागासवर्गीय समाजातील महिलेवर ३४ वर्षाच्या नराधम तरूणाचा बलात्कार उमदी पोलीसात अॅट्राॅसिटीचा अॅक्ट कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल*

जत .13.08.20 *जत दि.१३- संख ता. जत येथील एका मागासवर्गीय समाजातील ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर त्याच गावातील टोपन्ना मायाप्पा हुळणूर वय ३४ वर्षे या नराधमांने रात्रीच्यावेळी तिच्या असहायतेचा गैर फायदा घेत पाशवी बलात्कार केला.*       *घटना अशी की दि. ११/८/२०२० रोजी पिडीत ६५ वर्षीय वृद्ध महिला ही संख गावाशेजारील असलेल्या तलावाजवळ शेतातील वस्तीवर  बर्‍याच वर्षापासून वास्तव्यास आहे. तर संख गावात तिचे भाऊ व इतर नातेवाईक राहणेस आहेत दि. ११/८/२०२० रोजी रात्री ८ वाजता पिडीत महिलेची प्रकृती बरी नसल्याने औषध गोळ्या खाऊन रात्री झोपी गेली होती. त्याच रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास तिला जाग आल्याने उठून प्रकृती बरी नसल्याने पिडीत महिला तिच्या घराच्या अंगणात असणाऱ्या चुलीवर चहा करून पिण्यासाठी बसली होती. इतक्यात तिच्या घराशेजारीच राहणारा टोपन्ना मायाप्पा हुळणूर वय ३४ वर्षे हा नराधम संख गावाकडून येणाऱ्या दिशेने आपल्या मोटारसायकलवरून तिथे आला. त्याने पिडीत ६५ वर्षीय वृद्ध महिलेला विचारले की, आजी ऐवढ्या रात्री चहा का करून पित आहेस, त्यावर पिडीत महिला म्हणाली की, माझी तब्येत बरी नाही. आता ...

HAPPY INDEPENDENCE DAY

इमेज
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्व  ... नागरिकांना हार्दिक शुभेच्छा🌹🌹 अखिल भारतीय होलार समाज संघटना सांगली जिल्हा

कंटेमेन्ट झोन मधील अटी शिथिल करा अन्यथा आंदोलन करु....प्रशांत झेंडे

इमेज
प्रतिनिधी जत संपूर्ण  देशात कोरोना  सारख्या रोगाने थैमान घातले असता आज संपूर्ण  देश  लाॅकडाऊन करण्यात  आला आहे, या पार्श्वभूमीवर जत जि. सांगली येथे शहरातील काही ठिकाणे कंटेमेन्ट झोन घोषित केले असल्याने या परीसरात राहणारे लोकांचे हाल होत असल्याने चित्र पहावयास मिळत आहे.   कंटेमेन्ट  झोनचा कालावधी  14 दिवसाचा  असल्याने त्या झोनमधील  काही गरीब  व्यापारी तसेच गरीब कंटुबाचे खुप हाल होत  आहे त्यांच्या परिवाराला उपासमारीची वेळ  आली आहे म्हणून सरकारने कंटेमेन्ट झोनमधील जाचक अटी शिथिल कराव्यात किंवा  या झोनमधील कुठुंबाना मदत जाहीर करावी नाहीतर  येणार्या  काळात गरीब  व्यापारी  किंवा कुटुंब यांच्यावर उपासमारीची वेळ आली तर कंटेमेन्ट झोनच्या अटी  मान्य न करता तो झोन मोडला  जाईल  म्हणून सरकारने लवकरात लवकर कंटेमेन्ट झोनमधील अटी शिथिल कराव्यात नाही  तर  वंचित बहुजन आघाडी जत तालुका च्या वतीने सरकारच्या  विरोधात  आंदोलन छेडले  जाईल असा इशारा प्रशांत झेंडे जत ...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका मूस्लिम आघाडी तालुकाध्यक्ष शब्बिर नदाफ यांना बकरी ईद च्या दिल्या शूभेच्छा

इमेज
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका मूस्लिम आघाडी तालुकाध्यक्ष शब्बिर नदाफ यांना बकरी ईद च्या शूभेच्छा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर तालुका अध्यक्ष हूवाळे सर सरचिटणीस श्री बिरूदेव बाबर सचिव चित्रसेन कनमडी उपाध्यक्ष मूत्यापा कांबळे.पक्षप्रतोद भगवान जावीर.संघटक.इरापा केगांर.यूवा आघाडी अध्यक्ष नारायण कामत.विधान सभा यूवा आघाडी अध्यक्ष राकेश कांबळे.अरूण हिदूस्तानी.संजय वाघमारे.संख शाखा अध्यक्ष दांडेकर.जत तालुका उपाध्यक्ष राहुल चंदनशिवे.व कार्यकर्तेही हजर होते.

कोसारीत विहिरीत पडल्याने तरुणाचा म्रुत्यु

इमेज
    जत/01,Aug.20 जत तालुक्यातील कोसारी येथे शंकर संभाजी भजनावळे रा.कडलास, ता.सांगोला (वय 22) या तरूणाचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या दरम्यान उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांनी मृत्तदेह विहिरीबाहेर काढत शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.  मयत शंकर  भजनावळे कोसारी येथे मामाकडे कामासाठी राहत होता. मात्र  गेल्या तीन दिवसांपासून तो बेपत्ता होता. याबाबतची फिर्याद मामा रावसाहेब हेगडे यांनी जत पोलिस ठाण्यात दिली होती. शोधाशोध केली असता शनिवारी कोसारी गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हेगडेवस्ती येथील विहिरीत भजनावळे याचा मृतदेह आढळून आला.याबाबतचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब हाक्के करत आहेत.

व्हसपेट ता.जत येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

इमेज
प्रतिनिधी माडग्याळ व्हसपेट ता.जत येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती साजरी करण्यात आली. बुद्ध विहार व्हसपेट येथे काही प्रतिष्ठित एकत्र येत , सोशल डिस्टंसिंग ,मास्क या गोष्टी चे पालन करत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी सुभाष हुवाळे सर, सुरेश किर्तिकर सर (बिल्डर्स & डेव्हलपर), दिगंबर सावंत सर यांनी आपले विचार मांडले, यावेळी  इतर सहकारी उपस्थित होते.

तुकाराम बाबा महाराज यांनी ग्रामीण विकास संस्थेला दिली भेट

कोसारी येथे श्री संत सयाजी बागडे बाबा चॅरिटेबल ट्रस्ट गोधंळेवाडी संचलित श्री  संत बागडे बाबा मानव मित्र संघटना चे संस्थापक अध्यक्ष तुकाराम बाबा महाराज यांनी ग्रामीण विकास संस्थेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी मानव मित्र संघटनेची संकल्पना सांगुन संस्थेच्या कार्यकर्त्यांना मानवतेची प्रेरणा दिली.        संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.विवेक टेंगले यांनी त्यांचा सत्कार करून या संघटनेतुन आपण मोठ काम उभ करू अस आश्वासन दिले आहे. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

राजकीय पक्षांच्या सोयीसाठी धनगर आरक्षणाचा वापर होवू देणार नाही: विक्रम ढोणे

इमेज
जत : धनगर आरक्षणाचा प्रश्न राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय सोयीनुसार आता हाताळू शकणार नाहीत तर समाजाच्या सोयीनुसार त्यांना चालावे लागेल. आम्ही हा प्रश्न विसरणार नाही आणि त्यांनाही विसरू देणार नाही, हा निर्धार समाजाने केल्याचे धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे. सहा वर्षापुर्वी ( 2014 साली) देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला येवून धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते.  तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आपल्या प्रचारसभांत घेतला होता. त्यामुळे भाजपच्या नेत्यांवर  धनगर समाजाने विश्वास ठेवला, मात्र प्रत्यक्षात समाजाचा विश्वासघात झाला. नियोजनबद्धरित्या फसवणूक करण्यात आली. म्हणून  फडणवीस यांनी बारामतीत आश्वासन दिलेला 29 जुलै हा दिवस 'आत्मचिंतन दिवस' म्हणून पाळण्याचे आवाहन धनगर विवेक जाग्रती  अभियानाच्यावतीने करण्यात आले होते.  धनगर आरक्षणाच्या नावाखाली फक्त व्होटबँक पॉलिटिक्स सुरू आहे. भाजपने तर पंधरा वर्षापासून फसवणुकीची मालिका सुरू ठेवली आहे.  अटलबिहारी वाजपेयी ते नरेंद्...

न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनि कॉलेज कुंभारी दहावीचा निकाल ९८.४० टक्के

इमेज
कोसारी/प्रतिनिधी: कुंभारी येथील न्यू इंग्लिश स्कूल & ज्युनि कॉलेज यांचा यावर्षीचा माध्यमिक शालांत परिक्षा एस एस सी बोर्ड परिक्षा २०१९-२० निकाल १o वी मध्ये 90 टक्के च्या वरती सात विद्यार्थी उल्लेखनीय गुणासह पास झाले.तर शाळेचा एकूण निकाल 94.11% लागला आहे. यामध्ये कोळी सात्विक ज्ञानेश्वर 98.40 टक्के, कु.स्वप्नाली गोविंद जाधव 97.20टक्के,भंडारी पवन राजू 96.60टक्के, , कु.जाधव सानिका अशोक:91.80 टक्के गुण मिळाले. या सर्वांना प्रशालेच्या आदर्श मुख्याध्यापिका सौ.सुर्यवंशी एम. एम. ,शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन व संस्थेचे संचालक मा.बिज्जरगी साहेब, संस्थेचे संचालक मा. एस. व्ही. माळी साहेब, संस्थेचे सदस्य मा. डी. बी. माळी साहेब व प्राध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कुंभारी व कुंभारी परिसरातून प्रशालेच्या आदर्श मुख्याध्यापिका सौ.सुर्यवंशी एम. एम.व यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी सात्विक ज्ञानेश्वर कोळी चा सत्कार करताना प्रशालेच्या आदर्श मुख्याध्यापिका सौ.सुर्यवंशी एम. एम.,शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन व संस्थेचे संचालक बिज्जरगी , संस्थेचे संचालक...