न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनि कॉलेज कुंभारी दहावीचा निकाल ९८.४० टक्के
कोसारी/प्रतिनिधी:
कुंभारी येथील न्यू इंग्लिश स्कूल & ज्युनि कॉलेज यांचा यावर्षीचा माध्यमिक शालांत परिक्षा एस एस सी बोर्ड परिक्षा २०१९-२० निकाल १o वी मध्ये 90 टक्के च्या वरती सात विद्यार्थी उल्लेखनीय गुणासह पास झाले.तर शाळेचा एकूण निकाल 94.11% लागला आहे.
यामध्ये कोळी सात्विक ज्ञानेश्वर 98.40 टक्के, कु.स्वप्नाली गोविंद जाधव 97.20टक्के,भंडारी पवन राजू 96.60टक्के,
, कु.जाधव सानिका अशोक:91.80 टक्के गुण मिळाले.
या सर्वांना प्रशालेच्या आदर्श मुख्याध्यापिका सौ.सुर्यवंशी एम. एम. ,शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन व संस्थेचे संचालक मा.बिज्जरगी साहेब, संस्थेचे संचालक मा. एस. व्ही. माळी साहेब, संस्थेचे सदस्य मा. डी. बी. माळी साहेब व प्राध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कुंभारी व कुंभारी परिसरातून प्रशालेच्या आदर्श मुख्याध्यापिका सौ.सुर्यवंशी एम. एम.व यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापक यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी सात्विक ज्ञानेश्वर कोळी चा सत्कार करताना प्रशालेच्या आदर्श मुख्याध्यापिका सौ.सुर्यवंशी एम. एम.,शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन व संस्थेचे संचालक बिज्जरगी , संस्थेचे संचालक एस. व्ही. माळी, संस्थेचे सदस्य डी. बी. माळी,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा