पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वडिलांच्या स्मरणार्थ यादव परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी

इमेज
जत:प्रतिनिधी PSK NEWS NETWORK कै.श्री.मधुकर रामराव यादव बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने जत येथिल मुलींचे बालगृह असणारे भगिनी निवेदिता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने एक उपक्रम राबविण्यात आला त्यासाठी जत येथील प्रसिद्ध डॉ.विवेकानंद राऊत यांच्या हस्ते  जीवनावश्यक वस्तूंचे (कपडे, चप्पल, डाळी तसेच मेहंदी कोन, नेलपेंट)वाटप करण्यात आले.यावेळी डॉ.राऊत यांनी मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी खूप मोलाचे मार्गदर्शन केले तसेच प्रास्ताविक भगिनी निवेदिताच्या सौ.रेखा मुळे यांनी केले तर आभार विक्रम स्वामी यांनी मानले. यावेळी संचालक मंडळ तसेच सर्व सभासद सौ. गायत्री यादव, सौ. अनिता देशमुख, सौ. वैशाली कांबळे, श्रीमती सुजाता भोसले, विक्रम स्वामी, समीर हैद्राबादे, श्री. रमेश कदम, आशिष यादव, अनिकेत देशमुख, सागर इरकर, राहुल सौदागर, ऋषि जाधव, तोफिक आवटी, शैलेश चव्हाण, स्वप्नील शिंदे, युवराज रुपनुर आणि काही ज्ञात अज्ञात व्यक्तींकडून खूप मदत आणि सहकार्य लाभले.

गर्भवती महिलेचा शेत तळ्यात बुडून मृत्यू

इमेज
जत:PSK NEWS NETWORK माडग्याळ सनमडी रोडलगत असणाऱ्या तीन डोंगराजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेततलाव सकाळच्या सुमारास पाणी आणण्यासाठी गेलेल्या  मनीषा तानाजी कोळेकर वय वर्षे २० या गरोदर महिलेचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने तिचा मृत्यू झाला.  अधिक माहिती अशी की,जत तालुक्यातील कुणीकोणूर येथे गुरुवारी कर्नाटक राज्यातील अलीबादी जि.विजयपूर येथील मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी सांगोला भागात गेले होते परत गावाकडे येत असताना कुणीकोणूर येथे प्रकाश चव्हाण यांच्या शेतामध्ये मेंढ्या शिरल्या होत्या या कारणावरून प्रकाश चव्हाण याने मेंढ्या आमच्या शेतात का सोडल्या म्हणून राघू पांडू गोरड,जायाप्पा रामू गोरड व येराप्पा बाजू सुळ यांना काठी व दगडाने मारहाण केली होती व दोघांना गंभीर जखमी केले होते.त्यांना माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मिरजेला पाठवण्यात आले होते.  सदरच्या घटनेमुळे भयभीत झालेले मेढपाळ कुटुंब रात्रीच माडग्याळ सनमडी रोडलगत असणाऱ्या तीन डोंगराजवळ येवून थांबले होते.तेथे रस्त्याच्या बाजूला एक शेततलाव आहे. त्या शेततलावातील प...

दिवाळी सण का सर्वसामान्यांच निघालेलं दिवाळ!

दिवाळी हा सण पुर्ण देशात अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा करण्यात येतो,  दिवाळीच्या आगमणाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद उत्साह हर्ष पहावयास मिळतो,  मुख्य शहरातील बाजारपेठेत तर गर्दी मावत नसतेच पण गावखेड्यातील छोटे मोठे व्यवसायिक बऱ्यापैकी कमावतात , दिवाळी हा सण प्रत्येकांसाठी एक पर्वणीच असते,  तशी दिवाळी दरवर्षी येते पण यावर्षी दिवाळी आधीच लोकांचं दिवाळ निघाल्याच जिवंत चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे, त्याला कारणही रास्त आहे, या पाच सहा वर्षात वाढत जाणारी महागाई , सरकारच्या खाजगीकरण धोरणामुळे अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्या, बेकारी वाढली, आणि त्यातच हा अचानक आलेला कोरोणा अशा एका मागून एक येणाऱ्या संकटांचा सामना करता करता सामान्य जनता पार मेटाकुटीला आली आहे, कोरोणा काळात जिवितहानी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याचे स्पष्ट चित्र आपण पाहत आहोत, सामान्य माणूस आप्तेष्टांना वाचविण्यासाठी आयुष्याची जमापुंजी त्या गडगंज संपत्ती असलेल्या डॉक्टर्स, मेडिकल वाले यांच्या तिजोरीत जमा केला, कुणाही राजकीय , वैद्यकीय, स्वयंघोषित समाजसेवक यांना सामान्य जनतेचे होणारे हाल , त्यांच्या अ...