दिवाळी सण का सर्वसामान्यांच निघालेलं दिवाळ!



दिवाळी हा सण पुर्ण देशात अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा करण्यात येतो,  दिवाळीच्या आगमणाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद उत्साह हर्ष पहावयास मिळतो,  मुख्य शहरातील बाजारपेठेत तर गर्दी मावत नसतेच पण गावखेड्यातील छोटे मोठे व्यवसायिक बऱ्यापैकी कमावतात , दिवाळी हा सण प्रत्येकांसाठी एक पर्वणीच असते, 
तशी दिवाळी दरवर्षी येते पण यावर्षी दिवाळी आधीच लोकांचं दिवाळ निघाल्याच जिवंत चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे, त्याला कारणही रास्त आहे, या पाच सहा वर्षात वाढत जाणारी महागाई , सरकारच्या खाजगीकरण धोरणामुळे अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्या, बेकारी वाढली, आणि त्यातच हा अचानक आलेला कोरोणा अशा एका मागून एक येणाऱ्या संकटांचा सामना करता करता सामान्य जनता पार मेटाकुटीला आली आहे, कोरोणा काळात जिवितहानी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याचे स्पष्ट चित्र आपण पाहत आहोत, सामान्य माणूस आप्तेष्टांना वाचविण्यासाठी आयुष्याची जमापुंजी त्या गडगंज संपत्ती असलेल्या डॉक्टर्स, मेडिकल वाले यांच्या तिजोरीत जमा केला, कुणाही राजकीय , वैद्यकीय, स्वयंघोषित समाजसेवक यांना सामान्य जनतेचे होणारे हाल , त्यांच्या अडचणी त्यांचे दुःख दिसले नाही, सर्व सामान्यापाशी  होता न्हवता पैसा सारा गोठला आणि आता त्यातच दिवाळी हा उत्साहाचा सण तोंडावर आला आहे, बाजारपेठांत चैतन्य पसरले आहे. शहरातील दुकाने फुलली आहेत. रेडिमेड कापडासह फराळाच्या साहित्याला लोकांची मागणी वाढली आहे.कोरोनाचे सावट कायम असताना नवरात्रोत्सव व व लगेच,  दिवाळी  आली आहे .वाढत्या महागाईमुळे प्रत्येक वस्तूंचे भाव वाढल्याची प्रतिक्रिया सामान्य वर्गातून मिळत आहे.खासकरून महिला वर्गाला लागणाऱ्या पूजासाहित्यांचे भावसुध्दा वाढल्याची चर्चा ऐकायला मिळताहेत
 एकुण सद्य परिस्थिती पाहता कसा होईल सर्व सामान्य व्यक्ती , सर्व सामान्य शेतकरी उत्साही ,  कशी करेल खरेदि , साखरे पासून मिठापर्यंत , डाळी पासून तेलापर्यंत , कपडे, किंवा दिवाली सणात लावण्यात येणाऱ्या रोषणाई, आकाश कंदील, काही आणि काही सर्वच वस्तुंच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत, यातच भरीस भर म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कमालीची होत असलेली वाढ, मग कसा करणार गरीब सामान्य कष्टकरी,जनता ,दिवसभर शेतात राबणारा  शेतकरी, एकुण परीस्थिती पाहता दिवाळी सण कमी पण .. सामान्यांचे  दिवाळ निघाल्याच चित्र  ज्यादा दिसते आहे.

सचिन झेंडे
मो.९५६१६८२१५७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule