पोस्ट्स

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

इमेज
जत /14 एप्रिल 2020 जत शहरात सोशल डिस्टंसिग पाळत , विश्वरतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जत चे तहसीलदार सचिन पाटील ,जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके, वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे,आर पी आय (आ.)जि.अध्यक्ष संजय कांबळे, अशोक नाना कांबळे,हणमंत कांबळे गुरुजी,शरण जाविर ,पदम उमराणी,प्रशांत झेंडे, शिराज शेख,  आदी उपस्थित होते. यावेळी पो.निरिक्षक रामदास शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व या कठीण परिस्थितीत प्रशासनाच्या सर्व सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.   जगभरात कोरोणा विषाणू ने थैमान  घातले असुन , भारतात सुद्धा तितक्याच वेगाने हि साथ पसरत असताना दिसते आहे , कोरोणा विषाणू रोखण्यासाठी संपूर्ण भारतात अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन आहे, त्यामुळे देशातील सण उत्सवावर बंधन आल्यचे दिसते आहे, यातच संपूर्ण जगभरात आनंदाने वाजत गाजत होणारा सण म्हणजे 14 एप्रिल, विश्वरतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , पण यावेळी महाभयानक संकट जगभर पसरल्याने,  देशातील सर्व भीमबांधवानी प्रशासनाने केलेल्या आवाहनास ओ देत महामानव ...

For Ankush Huwale शिवसेना ता.प्रमुख जत

इमेज
बाबासाहेबांच्या उपकारांची जाणीव ही सर्वांना असायला पाहिजे, जी खुप कमी प्रमाणात पहायला मिळते, त्यांच्या मुळे आपण माणसात आहोत ही भावना... आणि मनाचा मोठेपणा सगळ्यांच्या कडे असतो अस नाही.... *पैसा काय कमावता येईल... माणसं कमावता आली पाहिजेत* ... आपल्या कमाईतला हिस्सा सामाजिक कार्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता खर्च करणे ही भावनाच मुळात लोकांना आणखी मोठ करून जाते. *Hat's of you ! श्री अंकुश हुवाळे साहेब.*                   आणि   *श्री. श्रीकांत हुवाळे सर व श्री मनोहर हुवाळे साहेब* आपलंही मनापासून अभिनंदन आणि आभार, आपण या नेक कामात अंकुश हुवाळे साहेब यांचे सोबत तळमळीने काम करत आहात.  ही त्रिमूर्ती अशीच कायम राहो , असेच सामाजिक आणि राजकीय चळवळीत तुम्ही एकत्र काम कराल ही अपेक्षा ... Thank you  Sachin Zende 🙏

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक

इमेज
संघटना ‌हजार झाल्या, नेते हजार झाले. कोणा म्हणावे आपुले. चेहरे हजार झाले. तु पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत कारे. भीमा तुझ्या मताचे माणसं मेलीत कारे ...! महाकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक  यांनी चळवळीतील कार्यकर्त्यां प्रती छान वर्णन केले आहे. 🙏 चालु असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती  निवडणुक 2026, (12 जिल्हा परिषद आणि 125पंचायत समिती) संपूर्ण जिल्हा भर पाहीले असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की गेली पाच दहा वर्षे वेगवेगळ्या संघटना पक्ष सामाजिक  संस्था या माध्यमातून चळवळीत असणारे कार्यकर्ते प्रामुख्याने यामध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात असणारे, जातीय वादी विखारी संघटना यांच्या विरोधात दंड थोपटुन काम करणारे नेते आणि कार्यकर्ते, आणि स्वतः ला  बहुजन चळवळीतील कार्यकर्ता मानणारे नेते आणि पदाधिकारी नेमके या अशा वेळी नेहमी प्रमाणे शांत. पाहुन असा काही फार मोठा धक्का बसला नाही. चळवळीतल्या कार्यकर्त्यां कडुन हे अपेक्षित होतंच.  दुसरी गोष्ट बहुजन चळवळीतील कार्यकर्ते शांत बसले नाहीत ते आपल्याच समुदायातील लोकांना सोबत घेऊन जे लोक इतर वेळी आपला तिरस्कार करतात, सर्व साम...

मुंबई ला ..!!

इमेज
मुंबई ला ..!! बँकेच्या ट्रेनिंग साठी मुंबई ला जात असताना,माझ्या आईला आणि बायकोला सांगून घरातून बाहेर पडलो.. जस जशी बस तालुक्याच्या दिशेने धावु लागली... तेंव्हा...................... मला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहीली हे गाणं आपोआपच माझ्या ओठात घोळु लागलं .. खरंच कवींनी त्या कवितेतील नायकाच्या मनातील खेळ, त्याच्या भावना,त्याची होणारी घालमेल यांच अगदी हृदयस्पर्शी वर्णन केलय... अगदी ... माझ्या मनाची ...... माझी मैना गावावर राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || ओतीव बांधा | रंग गव्हाळ | कोर चंद्राची | उदात्त गुणांची | मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची | हसून बोलायची | मंद चालायची | सुगंध केतकी | सतेज कांती | घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची | काडी दवन्याची | रेखीव भुवया | कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हि-याची | काठी आंधळ्याची | तशी ती माझी गरीबाची | मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण | नसे सुखाला वाण | तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || धन्य ते शाहीर... लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला कोटी कोटी प्...

दि.१९ जानेवारी २०२५,

मामा,  तुमचा एकुलता एक मुलगा चि.समर्थ याला त्याच्या वैवाहिक जीवनाच्या खुप खुप शुभेच्छा...🌹 त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाचा, सुखाचा समाधानाचा जावो, उत्तरोत्तर त्याची प्रगती होत राहो.👍 मामा, मी या आनंदी क्षणांचा भागिदार नाही राहिलो याच शल्य कायम मला बोचत राहिल. मागील दोन ते अडीच वर्षे आपण एकमेकांच्या सुख दुःखात एकत्र होतो. तुमचा सर्वांचा सहवास मला समाजातील / माझ्या जवळचे लोक आपल्या सोबत नसल्याचे जाणीव न करुन देणारा होता. हे खरं आहे. पण जिवनात एखादी अनपेक्षीत निर्णय घ्यायची वेळ प्रत्येकावर येते,ती आमच्या वरही आली. समाजापासून बाहेर राहणे (वाळीत)काय प्रकार असतो तो पहिल्यांदाच मी अनुभवलो , माझ्या आयुष्यातील वाईट दिवस कुठले असतील तर हे.... आणि याला कारणीभूत वैयक्तिक मी स्वतः आहे अस मी मानतो . सर्वात अगोदर कुणी बंड केल असेल तर तो मी होतो. मला त्यावेळी सुचना मिळाल्या असतानाही माझ्या मतावर ठाम राहिलो , कुणाच्याही सपोर्ट ची अपेक्षा न करता, मी एकटा बाहेर पडलेलो हे साऱ्या गावाला माहिती आहे. त्यानंतर या इतर मंडळींनी एकवार एक निर्णय घेतला आणि आपण एकत्र आलो, माझ्यसह आपल्या प्रत्येक...

INDIA that is 'BHARAT ' .विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधान दिवस चिरायू होवो! Jay Bhim. 🙏

इमेज
INDIA that is 'BHARAT ' ....   विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर. Tribute to Dr. Babasaheb Ambedkar 🙏Creater of Bhartiya Sanvidhan'    Toaday 26th Nov 2023 all Indians celebrates Indian Constitution Day / Sanvidhan Diwas. As Indian its proud moment for us because from the 26 Nov 1950. Each Indian got freedom from all bludy activities of Sanatan sanskruti which was depends on 'Manusmriti Granth'. Indian Great leader Dr. B.R Ambedkar wrote a book of 397 articles its called 'Bhartiya Sanvidhan'. The Preamble of the Indian Constitution defines the character of the state. The list of the keywords in the preamble of Indian constitution includes, secular, socialist, sovereign, democratic, fraternity, republic, justice, liberty, equality.   From the Day we all got real freedom. ... So, for the Day we called 'Republic Day'.  On the occasion of this great day every Indian Tribute to vishwanath Dr. B.R Ambedkar who is creater of Indian constitution. Jay Bhim🙏...

शासनकर्ती जमात व्हायला आकडेवारी नाही, इच्छाशक्ती लागते.

१९९३ ला जेव्हा सुरुवातीला मुलायम मुख्यमंत्री असलेली सपा बसपा युती तुटली भाजपकडे १७७, सपाकडे १०९ आणि बसपाकडे ६७ जागा होत्या. अटलबिहारीना वाटलं कांशीराम फोन करेल आणि म्हणेल "अटल आप सरकार बनाओ मैं समर्थन देता हूं!" आणि अटलबिहारीचा फोन वाजला. फोन कांशीरामचा होता. अटलबिहारी खुश झाले. कांशीराम म्हणाले," अटल मैं सरकार बना रहा हूं समर्थन दोगे क्या?" अटलबिहारी शॉक मध्ये. भाजपचे १७७ आणि बसपाचे ६७ आमदार आणि हा माणूस बोलतोय,"मैं सरकार बना रहा हूं समर्थन दोगे क्या?" कांशीराम म्हणाले,"पुन्हा निवडणूक व्हाव्या आणि जनतेचा पैसा खर्च व्हावा ही माझी इच्छा नाही, तुम्हाला सरकार बनवायचे असेल तर माझा पाठिंबा लागेल आणि तो मी देणार नाही. जर माझ्या सरकारला तुम्ही पाठिंबा देत असाल तर मला हरकत नाही. हजारो वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या आमच्या समाजाला "हुकमरान" बनवायची ही संधी मी सोडणार नाही." अटलबिहारींनी काही तासांचा वेळ मागितला, आणि बहुजन समाज पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिला. आणि हजारो वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या पुरुषसत्ताक ब्राम्हणवादी व्यवस्थेने उभारले...

मान्यवर कांशीराम ...

इमेज
SUNIL Kyatan BSP: कांशीराम (१५ मार्च १९३४ - ९ ऑक्टोबर २००६), ज्यांना बहुजन नायक किंवा मन्यावर किंवा साहेब म्हणूनही ओळखले जाते ,  एक भारतीय राजकारणी आणि समाजसुधारक होते ज्यांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी आणि राजकीय एकत्रीकरणासाठी काम केले . भारतातील जातिव्यवस्थेच्या तळाशी असलेल्या अस्पृश्य गटांसह मागासलेले किंवा खालच्या जातीचे लोक .  या दिशेने कांशीराम यांनी दलित शोषित समाज संघर्ष समिती (DS-4), अखिल भारतीय मागास (SC/ST/OBC) आणि अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघ ( BAMCEF) ची स्थापना केली.) 1971 मध्ये आणि 1984 मध्ये बहुजन समाज पक्ष (BSP) . 2002 मध्ये, मान्यवर कांशीराम साहेबांनी 14 ऑक्टोबर 2006 रोजी, आंबेडकरांच्या धर्मांतराच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त बौद्ध धर्म स्वीकारण्याचा त्यांचा इरादा जाहीर केला . त्याच्या ५०,०००,००० (पाच कोटी) समर्थकांचे एकाच वेळी धर्मांतर करण्याचा त्यांचा हेतू होता. या योजनेच्या महत्त्वाचा एक भाग असा होता की मान्यावर कांशीराम साहेब यांच्या अनुयायांमध्ये केवळ अस्पृश्यच नाही तर विविध जातींमधील व्यक्तींचा समावेश आहे, जे बौद्ध धर्माचे समर्थन लक्षणीय...