29 जुलै : धनगर समाज विश्वासघात दिवसबारामतीत धनगर विवेक जागृतीचे लक्षवेधी धरणे आंदोलन सुरू
जत / PSK NEWS NETWORK बारामती येथील 29 जुलै 2014 ही तारीख धनगर समाज कधीही विसरू शकणार नाही. यादिवशी तत्कालिन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करण्याचा जाहीर शब्द दिला. त्यानंतर तीन महिन्यांत हे फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यात धनगर समाजाच्या मतांचा सर्वाधिक वाटा होता. मात्र बोलतील तसे वागतील ते फडणवीस कसले? त्यांनी पाच वर्षे कावा करून धनगर समाजाची घनघोर फसवणूक केली. धनगर समाजाचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक खच्चीकरण केले. भारत देशाच्या पातळीवर एखाद्या समूहाची एवढी मोठी फसवणूक झाली नसेल. धनगर समाज निद्रिस्त असल्याने आपल्याला काही होणार नाही, या मानसिकतेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टिम आहे. त्यासाठी धनगर समाजातील दलाल आणि गुलाम फडणवीसांनी बरोबर घेतले आहेत, परंतु धनगर समाजातील तरूण भाजपच्या पापाचा घडा फोडल्याशिवाय राहणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे आम्ही धनगर समाज विश्वासघात दिवस, आत्मचिंतन दिवस पाळून प्रबोधन करत आहोत. त्याबरोबर शासन दरबारी निवेदन देत आहोत. आज 29 जुलै 2021 ला त्याच बारामतीच्या मातीत धनगरांच्...