अतुल दादा कांबळे जतच्या राजकारणात पून्हा सक्रिय
जत:PSK NEWS NETWORK
अभ्यासू,हुशार आणि शांत संयमी स्वभावामुळे आपल्या कार्याचा ठसा कायम उठवला आहे.
गेल्या काही वर्षापासून राजकीय विजनवासात असलेले जत चे माजी सरपंच तथा बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी अतुल कांबळे हे पुन्हा जत शहराच्या राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. अतुल कांबळे हे २००६ साली ग्रामपंचायतीवर निवडून आले. त्यानंतर २००७ साली जत चे सरपंच पद त्यांनी भूषविले. सरपंच असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. अतुल कांबळे हे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून राजकारणात काम करत आहे. पण राजकीय व्यासपीठ पासून चार हात लांबच राहिले होते. २०१७ सालच्या जत नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये बसपाच्या हत्ती या चिन्हावर स्वबळावर एक नगरसेवक निवडून आणला होता.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
२०२२ जत नगरपरिषद निवडणूक ; बहुजन समाज पार्टीचे स्वतंत्र पॅनल ...
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
२०२२ साली होणाऱ्या जत नगरपरिषद निवडणुकीसाठी त्यांनी आत्तापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली असून प्रभाग क्रमांक १ ते १० मध्ये उमेदवाराची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात दोन बैठका झाल्या असल्याची चर्चा आहे. नगरपालिका निवडणुक बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढणार असून जर वेळ प्रसंगी पडल्यास समविचारी पक्षांबरोबर युती करून नगरपरिषद निवडणूक लढणार असल्याचे चर्चा आहे. अतुल कांबळे यांना जत शहरात मानणारा मोठा वर्ग असून त्यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्यामुळे त्यांच्या समर्थक आनंदाचे वातावरण पसरले आहे. अतुल कांबळे हे राजकारणात सक्रिय होणार आहेत. २०२२ साली होणाऱ्या जत नगरपरिषद निवडणुकीत अतुल कांबळे यांची राजकारणातील एंट्री कोणत्या पक्षाला मारक ठरणार कोणत्या पक्षाला तारणार हे नगरपरिषद निवडणुकीत कळणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा