सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप
जत /14 एप्रिल 2020
जत शहरात सोशल डिस्टंसिग पाळत , विश्वरतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जत चे तहसीलदार सचिन पाटील ,जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके, वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे,आर पी आय (आ.)जि.अध्यक्ष संजय कांबळे, अशोक नाना कांबळे,हणमंत कांबळे गुरुजी,शरण जाविर ,पदम उमराणी,प्रशांत झेंडे, शिराज शेख, आदी उपस्थित होते.
यावेळी पो.निरिक्षक रामदास शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व या कठीण परिस्थितीत प्रशासनाच्या सर्व सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
जगभरात कोरोणा विषाणू ने थैमान घातले असुन , भारतात सुद्धा तितक्याच वेगाने हि साथ पसरत असताना दिसते आहे , कोरोणा विषाणू रोखण्यासाठी संपूर्ण भारतात अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन आहे, त्यामुळे देशातील सण उत्सवावर बंधन आल्यचे दिसते आहे, यातच संपूर्ण जगभरात आनंदाने वाजत गाजत होणारा सण म्हणजे 14 एप्रिल, विश्वरतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , पण यावेळी महाभयानक संकट जगभर पसरल्याने, देशातील सर्व भीमबांधवानी प्रशासनाने केलेल्या आवाहनास ओ देत महामानव , कायदे पंडित , संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी केली.
ता.जत येथे सुद्धा बौध्द बांधवानी घरीच राहुन जयंती साजरी केली,
वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क आणि सँनिटायझर चे केले वाटप
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी कोरोणा पासुन सामान्य नागरिकांना दुर ठेवण्यासाठी जे 24 तास सेवा देत आहेत असे आपले पोलीस बांधव यांना मास्क व सँनिटायझर वाटप करुन त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त केला, तसेच शहरातील गोरगरीब कुठुंबाना धान्य वाटप करून यावर्षी जयंती साजरी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा