पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा 10 जानेवारी पासून बंद - जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

 सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : राज्यात तसेच सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा दि. 10 जानेवारी 2022 पासून ते पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिले आहेत.   सदर बंद ठेवण्यात आलेल्या इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबत जिल्हा परिषद व महानगरपालिकेकडील शिक्षण विभाग यांनी सर्व शाळांना त्यांच्या स्तरावरून कार्यप्रणालीबाबत स्वतंत्र सूचना / निर्देश निर्गमित करावेत. तसेच शासनाने परवानगी दिलेल्या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली व सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांनी आरोग्य विभागाशी समन्वय साधून  योग्य ते नियोजन करावे व लसीकरण पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करावी. जिल्हा परिषद व महानगरपालिका शिक्षण विभाग यांनी जे वर्ग सुरू राहणार आहेत त्या वर्गासाठी आपल्या स्तरावरून कोविड-19 प्रतिबंधात्मक निर्देशांचे पालन करण्याबाबत स्वतंत्र सूचना...

महाराष्ट्राची मदर तेरेसा हरपली,

इमेज
पुणे : महाराष्ट्राची  मदर तेरेसा   अशी ओळख असणाऱ्या  सिंधूताई सपकाळ  यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ७३ वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले, पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन  झाले होते,  त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले 

दिव्यांग बांधवांना अंत्योदय कार्ड द्या - तानाजी व्हनखंडे*

(आयडेंटिटी फोटो-तानाजी व्हनखंडे) शासनाच्या दि. १७ जुलै २०१९ च्या निर्णयानुसार दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे ३५ किलो धान्य आणि अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात. तसेच त्यांची दारिद्र्य रेषेखाली नाव नोंदणी करावी, अशी मागणी जत तालुका बहुजन समाजवादी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष तानाजी व्हनखंडे यांनी केली आहे. जत तालुक्यासह जिल्ह्यातील दिव्यांगाची कोरोना काळानंतर परिस्थिती बिकट झालेली असून,सध्या दिव्यांगाना आपल्या अन्नपुरवठा योजनेतून अंत्योदय शिधापत्रिकाचा लाभ मिळत नाही. तालुक्यातील जवळजवळ सर्वच दिव्यांग बांधव या योजनेपासून वंचित राहत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार, दिव्यांगासह इतर पात्र व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिका कार्ड देताना प्राधान्य देण्यात यावे, असा आदेश आहे. असे असतानाही दिव्यांग कायदा-२०१६च्या दिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न शिधापत्रिका योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे.या शासन निर्णयानुसार दिव्यांग, विधवा, ६० वर्षावरील व्यक्ती, भूमीहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, तसेच कुष्ठरोगी...

सामाजिक घडामोडी

माता रमाई बचत गटाचे संपूर्ण भारतभर जाळे निर्माण करून मीराताई आंबेडकर यांचे संकल्प पूर्ण करूया  एस के भंडारे .. मुंबई- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1954 बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून महिलांची व कुटुंबाची उन्नती व्हावी ह्या हेतूने महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली माता रमाई स्वयंसहायता स्वयंरोजगार केंद्र सन 2001 मध्ये निर्माण करून सरकारच्या महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली 250 माता रमाई बचत गट निर्माण केले, त्यानंतर बचत गटाचा महासंघ नोंदणीकृत करून महिलां च्या बचत गटास कायदेशीर स्वरूप देण्यात आहे, त्या माता रमाई स्वयं सहाय्यता व स्वयंरोजगार संघ (रजि.) अंतर्गत कार्यरत असलेला माता रमाई स्वयंसहाय्यता बचत गटाचा डॉ.आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथील दि.29/12/2021 रोजी च्या माता रमाई बचत गटाच्या 6 व्या वार्षिक लाभांश वाटप कार्यक्रमात माता रमाई संघाचे सल्लागार सदस्य व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव एस के भंडारे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. ते पुढे असे म्हणाले की, रमाई महिलांनी एकत्र हो...