सामाजिक घडामोडी

माता रमाई बचत गटाचे संपूर्ण भारतभर जाळे निर्माण करून मीराताई आंबेडकर यांचे संकल्प पूर्ण करूया
 एस के भंडारे ..

मुंबई- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1954 बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून महिलांची व कुटुंबाची उन्नती व्हावी ह्या हेतूने महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली माता रमाई स्वयंसहायता स्वयंरोजगार केंद्र सन 2001 मध्ये निर्माण करून सरकारच्या महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली 250 माता रमाई बचत गट निर्माण केले, त्यानंतर बचत गटाचा महासंघ नोंदणीकृत करून महिलां च्या बचत गटास कायदेशीर स्वरूप देण्यात आहे, त्या माता रमाई स्वयं सहाय्यता व स्वयंरोजगार संघ (रजि.) अंतर्गत कार्यरत असलेला माता रमाई स्वयंसहाय्यता बचत गटाचा डॉ.आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथील दि.29/12/2021 रोजी च्या माता रमाई बचत गटाच्या 6 व्या वार्षिक लाभांश वाटप कार्यक्रमात माता रमाई संघाचे सल्लागार सदस्य व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव एस के भंडारे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. ते पुढे असे म्हणाले की, रमाई महिलांनी एकत्र होऊन एकत्रित विचारविनिमय करून आपले प्रश्न आपणच सोडविले पाहिजे दुसरा कोणी सोडविणार नाही असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती दहन दिनाच्या निमित्त केलेल्या भाषणाचा दाखला देऊन प्रतिपादन केले. माता रमाई बचत गट केवळ मुंबई पुरता मर्यादित न राहता संपूर्ण भारत, महाराष्ट्रभर झाला पाहिजे अधिकाधिक महिलांनी या गटामध्ये सहभागी होऊन आपले उन्नतीचे मार्ग आपण स्वतः खोलावे व मीराताई यांचे रमाई बँक निर्माण करण्याचा संकल्प आपण सर्वांनी पूर्ण करणे गरजेचे आहे असे असे सागितले. माता रमाई संघाच्या अध्यक्षा व बचत गटाच्या संघटिका रागिनिताई पवार होत्या. त्यांनी माता रमाई बचत गट सर्वत्र निर्माण करून महिलांची प्रगती करू व बचत गटाच्या माध्यमातून समाजात माता रमाईचे चिरंतन स्मारक करणार असे प्रतिपादन केले. या 61 सभासदांना लाभांश वाटप करण्यात येऊन आता पुन्हा घर घंटी तसेच शिलाई मशीन प्रकल्प राबविण्याचे ठरविण्यात आले. या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड, एम डी सरोदे गुरुजी,
 महाराष्ट्र अध्यक्ष भिकाजी कांबळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी त्याग माता रमाई भिमराव आंबेडकर रमाई बचत गट या नावाने संपूर्ण भारतभर महिलांनी बचत गट स्थापन करून भविष्य मध्ये रमाई बचत गटाचे रूपांतर एक बँकेच्या रूपात होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरले. रमाई संघाच्या सचिवा व बचत गटाच्या सहसंघटिका चंदाताई कासले यांनी आभार प्रदर्शन केले.


कोविड विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त निर्बंध लागू
                    - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
 
        सांगली दि. 31 (जि.मा.का.) : सध्या राज्यात कोविड-19 विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार झपाट्याने वाढत असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात होणार प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून त्यांच्याकडील दि. 24 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशामध्ये बदल करून दि. 30 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये प्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 25 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशामध्ये बदल करून सांगली जिल्ह्यात दि. 31 डिसेंबर 2021 रोजीचे 21.00 वाजल्यापासून खालीलप्रमाणे अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत.
            लग्न / विवाह समारंभासाठी बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त 50 व्यक्तीनांच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील बंदिस्त किंवा खुल्या जागेत जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. अंत्यविधी / अंत्ययात्रा बाबतीत उपस्थित व्यक्तींची संख्या 20 पर्यंत मर्यादित असेल. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. या आदेशाचे पालन करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 29 नोव्हेंबर 2021 व दि. 25 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.


कोरोना रुग्णांकडून खाजगी रुग्णालयांनी घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करा: आरोग्य हक्क समितीची मागणी.

सांगली:-- कोरोना रुग्णाकडून खाजगी रुग्णालयांनी घेतलेले, अतिरिक्त शुल्क नियमानुसार परत करण्यासंदर्भात. तक्रारदारांनी संकेतस्थळावर तक्रारी नोंदविले आहेत. नोंदवलेल्या तक्रारीसंदर्भात झालेल्या पाठपुरावा नेमक्या कोणत्या विभागाकडे आहे? अंमलबजावणी अधिकारी कोण आहे? किती तक्रारी दाखल झाल्या ?किती रुग्णालयांनी अतिरिक्त बेकायदेशीर घेतलेले शुल्क परत केले ? खाजगी रुग्णालयांनी घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करण्यासंदर्भात दाखवलेली उदासीनता. याची स्पष्टता होण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ज्या लेखापरीक्षकांची संपर्क साधण्यास सांगितले. त्यांनी कार्यभार सोडल्याचे सांगितले व कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यांनी ही जबाबदारी टाळली आहे. याबाबतीत एकवाक्यता व समन्वय नसल्यामुळे, याविषयी नागरिकांच्या मध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर !आरोग्य हक्क समितीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याकरिता गेल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार घाडगे यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कळविण्यात येईल असे आश्वासन दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व आरोग्य हक्क समितीचे शाहीन शेख, सुहास सावर्डेकर, राजेश साळुंखे, विनायक जाधव व इलियास शेख यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule