शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आल्याने जतमध्ये शिवसेना वंचित आघाडीने एकच जल्लोष केला.
जत (प्रतिनिधी)-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना व वंचित आघाडीची घोषणा केल्याने जतमध्ये मारुती मंदिर चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गट व वंचित आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत व जिलेबी वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील. शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ मोटे .तालुका संघटक बंटी दुधाळ, वंचित आघाडीचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हुवाळे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी चंदनशिवे, तालुका -अध्यक्ष अमोल साबळे, शिवसेना शहरप्रमुख विजयराजे चव्हाण, उपशहर प्रमुख उत्तम थोरात , गजानन चव्हाण . कामगार सेनेचे अब्बास मुजावर, वंचित आघाडीचे तालुका सरचिटणीस बाबासाहेब कांबळे, सहसचीव हारूण इनामदार, तालुका उपाध्यक्ष दिपक मागाडे .इराप्पा केंगार, संभाजी शिवशरण, बाबासाहेब चंदनशिवे इत्यादी प्रमुख पदाधिकारी, शिवसैनीक तसेच वंचित आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेना उप जिल्हाप्रमुख सागर पाटील व वंचित आघाडीचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हुवा...