पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पारधी समाजातील चौघांची निर्घुण हत्या : वंचित बहुजन आघाडी ता.जत च्या वतीने निवेदन

इमेज
माडग्याळ प्रतिनिधी दि.27        जमिनीच्या वादातून पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई (केज) तालुक्यातील वडगाव या गावात झाला.त्या घटनेची चौकशी करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी  वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल साबळे यांनी प्रशासकीय कार्यालयास, पोलीस प्रशासनास निवेदन देऊन केली आहे. आहे.          जग एकीकडे कोरोनाशी लढतोय तर भारतात जातीवादी , लोकांनी पुन्हा एकदा क्रूर चेहरा जगासमोर आणला आहे.या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला , तसेच आरोपीं वर  कठोर कारवाई व्हावी यासाठी  जत  वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन दिले. यावेळी ता. अध्यक्ष अमोल साबळे, तायाप्पा वाघमोडे, आकाश साबळे विठ्ठल व्हनखंडे, शरणाप्पा जावीर , राहुल काळे,रमेश कोळेकर, आकाश बनसोडे इ. उपस्थित होते.

अहिल्यादेवी होळकर यांची जयंती प्रत्येक घराघरात उत्साहात साजरी करा:संतोष टेगंले

इमेज
 कोसारी /प्रतिनिधी .दिनांक :27/05/2020.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांची 295 वी जयंती 31 मे 2020 रोजी असुन सध्या संपुर्ण जगावर कोरोना या महाभयानक विषानु व्हायरसचे संकट असताना अशा परिस्थितीमध्ये एक उत्तम प्रशासक असनारी आपल्या सर्व समाज बाधवांचे आराध्य दैवत असलेल्या  लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करणे उचित ठरणार नाही. म्हणुन सर्व अहिल्या भक्तानी आपापल्या घरीच पुरण पोळी बनवून अहिल्या मातेच्या फोटोचे पुजन करून लोकमातेची जयंती उत्साहात साजरी करावी.     जगावर आलेल्या कोरोना संकटाच्या उपाय योजनेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.सर्व सण उत्सव,जयंती घराघरात साजरी करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 31 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सरकारी सुचनांचे पालन करून शासनाच्या आदेशानुसार सहकार्य करीत त्यांच्या विचार सरणीची गरज असल्याने सर्व समाज बांधवांनी आपापल्या परीने कोरोना पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला आधार देत नियमांचे पालण करून सामाजिक उपक्रम राबवित प्रत्येक घराघरात अहिल्याबाई होळकर यांच...

31 मे रोजी चोंडीत अहिल्यादेवींना शासनाच्यावतीने अभिवादन करावे: विक्रम ढोणे

इमेज
                   युवक नेते विक्रम ढोणे सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी चोंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे शासनाच्यावतीने अभिवादन करण्यात यावे, अशी मागणी धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.  यंदा लॉकडाऊनमुळे चोंडीत जयंतीसाठी लोकांना एकत्रित येता येणार नाही. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ किंवा अन्य शासकीय प्रतिनिधीने तिथे जावून अभिवादन करावे, अशी मागणी ढोणे यांनी केली आहे.  ढोणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, अखिल भारतातील आदर्श महिला राज्यकर्त्या, लोककल्याणकारी राज्याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म नगर जिल्ह्यातील चोंडीचा असल्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. 31 मे रोजी त्यांच्या जयंतीसाठी हजारो लोक चोंडीत येत असतात. पण तिथे राज्य शासनाच्यावतीने अभिवादनाचा कार्यक्रम होत नाही, हे महाराष्ट्राला भुषणावह नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजा...

एस टी कर्मचाऱ्याचा ५० लाखाचा विमा संरक्षण द्या -एस टी कामगार सेनेची मागणी

इमेज
  जत/प्रतिनिधी: सध्या जगभरात तसेच देशात कोरोना विषाणूचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत आपल्या सांगली जिल्ह्यात देखील कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चौथ्या संचारबंदीच्या काळात काही प्रमाणात शिथिलता दिली आहे.त्याच अनुशंगाने महाराष्ट्रात रेड झोन व कन्टॅनमेंट झोन वगळून जिल्हा अंतर्गत प्रवाशी वाहतूक करण्यास राज्य शासनाने काही नियम ठरवून २२/०५/२०२० पासून परवानगी दिली आहे सदर निर्णया मधील घालून दिलेल्या नियमांचे पालन तंतोतंत झाले नाही तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कर्मचारी तसेच समाज्यात होऊ शकतो या पार्श्वभूमीवर एस टी कामगार सेना यांच्या वतीने आगार व्यवस्थापक जत व नगरपरिषद जत यांना निवेदन देण्यात आले. निवेदन पत्रकात म्हटले आहे की, आगारात उपस्थित कर्मचारी व प्रवाशी यामध्ये प्रामुख्याने सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी नियोजन करावे. दमा ,आस्थमा,छयरोग, कर्करोग,मधुमेय,फुफुसचे आजार असलेल्या व पाच वर्षे वयाच्या आतील ज्यांची अपत्ये आहेत तसेच ज्या गर्भवती महिला व दिव्यांग कर्मचारी यांना कामावर बोलावू नये. आगारातील विश्रांतीगृह, टॉयलेट, आगार परिसर स्वच्छ ठेऊन दररोज निर्जंतुकीक...

मायक्रो फायनान्स कंपन्याची कर्ज माफ करा - विजय ताड

इमेज
जत/प्रतिनिधी: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश २३ मार्च पासून लॉकडाउन मध्ये आहे.महाराष्ट्रात ही लॉकडाउन चालू आहे सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत.त्यामुळे गोरगरीब व गरजू महिलांनी आपला उद्योग व्यवसाय आणि घर प्रपंच चालवण्यासाठी जत शहरात असणाऱ्या भारत फायनान्स , स्पंदना फायनान्स ,आर बी एल आणि ग्रामीण कोटा व अन्य फायनान्स कंपन्याकाडून छोट्या मोठ्या स्वरूपात कर्जे घेतले आहेत.त्यांचे हप्ते साप्ताहिक,पाक्षिक व मासिक स्वरूपाचे आहेत.ते सर्व कर्जे शासन स्तरावरून माफ करावे अशी मागणी जत नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय ताड यांनी जिल्हाधिकारी यांना पत्रकाद्वारे केली आहे . ताड यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २३ मार्च २०२० पासून सारा देश कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे लॉकडाउन आहे.आशा लॉक डाउन च्या काळात सर्व व्यवसाय व व्यवहार बंद आहेत आशात गरीब व हातावरच्या पोटे असलेल्या महिलांना आपले घर कसे चालवायचे याचा प्रश्न पडलेला आहे.रोजंदारीची कामे, छोटे मोठे उद्योग बंद पडले आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मूळ व्यवहार व व्यवसाय पूर्व पदावर येण्यासाठ...

शेतकऱ्याचे वीजबिल माफ व्हावे - कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांची मागणी

इमेज
जत/27 कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य चे नुतन जत तालुका अध्यक्ष मा.प्रदिप नागणे नूतन जत तालुका कार्यध्यक्ष मा.संग्राम शिंदे यांनी जत चे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली की,कोविड 19 मुळे शेतकरी आणि शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतीपंप वीजबिल माप व्हावे ही विनंती केली,त्यास आमदार साहेबांनी पाठपुरावा करुन योग्य न्याय देण्याचे अश्वासन दिले. निवेदनात सविस्तर म्हंटले आहे की महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत आज वैश्विक महामारीच्या संकटाला तोंड देत आहे.समोर बाजारपेठा खुल्या नसल्या कारणाने असंख्य शेतकऱ्यांना शेतीमाल शेतातच कुजून गेला आहे.शेकऱ्यांचे सर्व आर्थिक मिळकतीचे मार्ग खुंटले आहेत.अश्यातच शेतीपंपाची येणारी मोठ्या रक्कमांची विजबिले गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आर्थिक भुर्दंड ठरत आहे.कोविड 19 च्या या संकटात घरखर्च सांभाळून शेतीपंपाच्या विजबिलाच्या खर्चाचा मेळ घालणं शेतकऱ्यांच्या आर्थिक आवाक्याबाहेर गेलं आहे. अश्या या संकटाच्या काळात लॉकडाऊन च्या कालावधीतिल साधारणतः तीन महिन्यांची शेतीपंपाची विजबिले माफ करणेत यावेत अथवा अर्थ...

*परिस्थिती ची जाणीव ठेवुन घरभाडे गाळाभाडे सह तत्सम जिवनावश्यक वस्तुंवर आकारण्यात येणारे बील माफ करावेत.... . रावसाहेब हेगडे*

इमेज
 रावसाहेब हेगडे अखिल भारतीय होलार  समाज संंघटना  ता.अध्यक्ष  प्रतिनिधी माडग्याळ. कोरोणा पार्श्वभूमीवर घातलेल्या लॉकडाऊन मुळे राज्यातील विविध भागातील नागरिकांना काम नसल्यामुळे उपासमारीने जनता त्रस्त आहे, शहरातून गावाकडे आलेला कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर बेरोजगार झाल्याची परिस्थिती आहे.या कठीण परिस्थितीत गोरगरीब जनता जगण्यासाठी धडपडत आहेत,  हाती काम नाही, पगारही नाही, आणि एकवेळच्या जेवनाची व्यवस्थाही नाही, लॉकडाऊन संपल्यानंतर आणखी बर्याच गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे, त्यात रोजंदारीवर , शेती वर अवलंबून असणारा मजुर हवालदिल झाला आहे. त्यात लघुउद्योग करणारे , यांच्यासमोर गाळाभाडे , लाईटबील, च्या समस्या निर्माण झालेल्या आहेत,  त्यामध्ये प्रामुख्याने घरभाडे, दुकान गाळा भाडे, लाईट बील, मुलांच्या शाळेच्या फी , राशन या समस्या आ वासुन उभ्या राहणार आहेत, या बाबींचा विचार करता प्रशासकीय यंत्रणांनी या सर्व समस्या निस्सारण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे,शाळा , महाविद्यालयांना परिपत्रके काढुन योग्य सुचना द्याव्यात , दुकान गाळे मालकांना भाड्या साठी तगाद...

कोसारी येथे पार पडली शेतीशाळा

इमेज
कोसारी /प्रतिनिधी दिनांक 21/05/2020      *कोसारी ( चव्हाण मळा) येथे कृषी विभाग जत व ग्रामीण विकास संस्था, कोसारी यांच्या वतीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पार पडली शेतीशाळा . यावेळी मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक परशुराम मळळी साहेब यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी शेतातील माती कोणत्या ठिकाणची घ्यायची व कशा पद्धतीने घ्यायची व त्याच बरोबर बाजरी पेरणी या विषयावर बियाणे कोणती पेरावीत व त्याच बरोबर बीज प्रक्रिया कशी करायची खते कोणती व कशा पद्धतीने उपयोग करावे व खताचे प्रमाण कसे ठेवायचे या सर्व विषयावर चांगली माहिती सांगितली त्यावेळी त्यांचे सहयोगी एस. एस. नाटेकर हे ही उपस्थित होते.*                    *कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम पार पडला त्यावेळी 30 शेतकरी उपस्थित होते त्या मध्ये चंद्रकांत चव्हाण साहेब, गोरख खडतरे, तुकाराम नरुटे, पांडुरंग वाघमोडे, योगेश कुंभार, सदाशिव चव्हाण असे प्रमुख शेतकरी उपस्थित होते.   या अगोदर त्यावेळी  ग्राम...

जत तालुक्यातील रावळगुंडवाडीत पावणे चार लाखाचे चंदन जप्त...उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाची कारवाई.

इमेज
जत./दि.19.05.2020, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाने केलेल्या कारवाईत जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथे पावणे चार लाखा रूपयाचे चंदनाचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत. संशयित आरोपी यल्लप्पा माने रा. रावळगुंडवाडी यास पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संशयित  यल्लाप्पा माने याचे रावळगुंडवाडी येथे रहाते घर आहे,  शेळया बांधणेकरीता बनवलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये बेकायदा बिगर परवाना, चोरुन चंदनाचे लाकडाचे चोरुन विक्री करीत असल्याची माहिती जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांना गोपनिय खब-या मार्फत बातमी मिळाली.  या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक सुभाष कांबळे, पोलीस नाईक विजय अकुल, सुनिल व्हनखंडे, वाहीदअली मुल्ला यांनी प्रथम भेट दिली व खात्री करून घेतली. त्यानंतर पथकाने अचानक धाड टाकून संशयित आरोपी यल्लाप्पा लक्ष्मण माने (वउ-४३, रा रावळगुंडवाडी ता.जत) यास ताब्यात घेवुन चौकशी केली. माने याच्या घराजवळ असलेल्या शेळीच्या शेडमध्ये एका प्लास्टिक पोत्यात चंदनाचे एकशे सहा किलो वजनाचे चंदन जप्त केले....

लायन्स क्लब जत, माडग्याळ व उमदी यांच्या वतीने मास्क वाटप

इमेज
जत : अतिभयंकर कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातल्याने सर्वजण त्रस्त आहेत,तसेच कोरोनाचा देशभरात आकडा वाढतच आहे याच पार्श्वभूमीवर जत तालुक्यात खबरदारीचा उपाय म्हणून शासन, प्रशासन व काही सामाजिक संघटना या साठी पुढे सरसावले आहेत. जत तालुक्यातील लायन्स क्लब ही गोरगरीबांच्यासाठी झटत असते. त्याच्यावतीने जत तालुक्यातील माडग्याळ, उमदी उटगी येथे मास्क वाटप करण्यात आले, त्यात त्यांनी गोरगरीब कामगार, शेतकरी व पोलिस बांधवांना याचे वाटप करण्यात आले यावेळी लायन्स क्लब झोन चेअरमन दिनकर पतंगे, लायन्स क्लब कॅबिनेट आॅफिसर राजेन्द्र आरळी, माडग्याळ लायन्स अध्यक्ष सार्थक हीट्टी ,उमदी लायन्स अध्यक्ष धायगुडे साहेब, डॉ हत्तळी व महसुल विभागातील भोसेकर साहेब हे सर्वजण उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष अमोल साबळे यांचा वाढदिवस मास्क व सॅनिटाईझर वाटप करून साजरा

इमेज
प्रतिनिधी माडग्याळ जत तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोल साबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  मास्क व सॅनिटाईझर वाटप करण्यात आले. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर  कोरोनाच्या रूपाने आलेले संकट पाहता  वाढदिवस साजरा करणे टाळत सामाजिक बांधिलकी जपत,   पोलिस अधिकारी  व इतर कर्मचारी यांना मास्क व सॅनिटाईझर वाटप करण्यात आले .यावेळी पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सह इतर पोलीस कर्मचारी,  भारिप तालुका अध्यक्ष संजय कांबळे , शहर अध्यक्ष प्रशांत झेंडे, जाविर सर, दिपक कांबळे, सुरेश कोळी उपस्थित होते.

पारधी समाजातील चौघांची निर्घुण हत्या : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन

रेंदाळ प्रतिनिधी दि.१९        जमिनीच्या वादातून पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई (केज) तालुक्यातील वडगाव या गावात झाला.त्या घटनेची चौकशी करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.          जग एकीकडे कोरोनाशी लढतोय तर भारतात जातीवादी ,धर्मवादी लोकांनी पुन्हा एकदा क्रूर चेहरा जगासमोर आणला आहे.या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.आरोपी विरूद्ध  कठोर कारवाई व्हावी म्हणून म्हणून हुपरी पोलिस ठाण्याला वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन दिले.यावेळी आय.टी प्रमुख सुमित कांबळे , पांडुरंग माणकापूरे , प्रशांत कुरणे , शितल कांबळे , सिध्दार्थ कांबळे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोना या महाभयानक रोगापासुन कोसारीकरांनी सतर्क राहावे:बाळासाहेब पवार

इमेज
  कोसारी /प्रतिनिधी . चीन मध्ये उगम पावुण संपुर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषानु व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण जगात बिकट अवस्था निर्माण झालेली आहे. भारत सरकारने गेल्या काही दोन महिन्यापासून संपुर्ण भारतात लाॅकडाऊन केले असता  मोठमोठे उद्योग धंदे,कंपन्या,शाळा -काॅलेजेस ,छोटी मोठी दुकाने बंद होती.या काळात लोकांच्या मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ लागल्या.रोजगारांना काम मिळेनासे झाले.यातुन लोकांच्या जगण्याचा मोठा गंभीर प्रश्न ऊभा राहीला.अलीकडच्या काळात सरकारने लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आले. यामध्ये शेतीविषयक औषधे, किटकनाशके ,बिबीयाने यासारख्या छोट्या मोठ्या सेवा सुरू केल्या.     लाॅकडाऊन च्या कालावधीत कोसारी ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोसारी गावात दोन ते तीन दिवस संपुर्ण गाव लाॅकडाऊन केले होते.कोसारी ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी बिसले उपसरपंच बाळासाहेब पवार , ग्रामपंचायत सदस्य आणि कोसारी गावातील सर्व माजी सैनिक तसेच ग्रामीण विकास संस्था कोसारी यांचे महत्वाचे योगदान आहे.    कोसारी लाॅकडाऊन केलेल्या नंतरच्या काळात गावात रहदारी वाढलेल...

गोरगरीब कलावंतावर उपासमारीची वेळ... महाराष्ट्र शासनाकडुन मदत अपेक्षित...रावसाहेब हेगडे , जत ता.अध्यक्ष अखिल भारतीय होलार समाज संघटना

इमेज
रावसाहेब हेगडे , जत ता.अध्यक्ष अखिल भारतीय होलार समाज संघटना प्रतिनिधी माडग्याळ महाराष्ट्र राज्यात विविध श्रेत्रातील लोक कलावंताची संख्या खूप मोठया प्रमाणात आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात लाॅकडाऊन असल्यामुळे सुरसनई बॅंन्ड, बॅंजो हालगी ग्रूप, ‘वाघ्यामुरळी, गोंधळी, पोतराज, गायन पार्टी या विविध श्रेत्रात ग्रामीण व शहरी भागात अनेक   लोककलावंत आहेत. संपूर्ण लॉकडाऊन मुळे  सर्वच कार्यक्रम बंद आहेत ,अथवा त्यावर मर्यादा आल्या आहेत , लग्नसराई बंद आहेत. जागरण गोंधळ बंद आहेत. गायन पार्टीचे सर्व व्यवसाय बंद आहेत, यामुळे या सर्व लोककलावंतावर उपासमारीची वेळ आलेचे वास्तव  चित्र आहे. हाताला काम नसल्याने अशा कलावंताना आपली उपजीविका करणे अवघड झालेले आहे. संसाराचा गाडा चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतेय. मुलांच्या शिक्षणासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. पुस्तके, शालेय साहीत्य खरेदी करणे अवघड आहे, अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यां सर्व समस्या घेऊन हा कलाकार, कलावंत वर्ग प्रशासनाने जारी केले ल्या सर्व नियमांचे पालन करत जीवन जगत आहे , घरात राहुन सहकार्...

पत्रकारांना दरमहा मानधन आणि विमा संरक्षण द्या; दिनकर पतंगे

इमेज
दिनकर पतंगे, कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष    जत दि. (वार्ताहर)- लोकशाहीचा चौथा खांब असलेली पत्रकारिता हा समृध्द समाजाचा भक्कम आधार आहे शासन आणि जनतेमधील मुख्यदुवा असणारा शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वच पत्रकारांना दरमहा 3 हजार रुपये मानधन आणि आताच्या घडीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा संरक्षण देऊन त्यांच्या कुटुंबासाठी विशेष आर्थिक पॅकेजची तरतूद करण्याची मागणी  कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी केली आहे.      पत्रकार हा खांब राज्यात कोरोना सारख्या महाविषाणूचा फैलाव जोरात सुरु असतानाही जागृत पत्रकारिता करीत आहे. तसेच कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील जागृत नागरिकही करीत आहेत, केंद्र व महाराष्ट्र शासनाने जनता कर्फ्यू व लॉकडाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले पासुन पोलीस, डॉक्टर व त्यांचा स्टाफ, प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार, प्रेस फोटोग्राफर बांधवही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती व प्रसिद्धि करीत आहेत. डाॅक्टर पोलीस,अथवा,शासकीय अधिकारी यांचे आर्थिक नियोजन विमा संरक्षण शासनाने यापूर्वी काढले आह...

सुकृता रूरल एम्पॉवरमेंट फाऊंडेशन, पुणे व गोल्डन अग्रो इंडस्ट्रीज, बनाळी यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

इमेज
जत/प्रतिनिधी: सध्या कोरोना रोगाने जगभर थैमान घातले आहे.यामुळे सर्वच लोकांचे खुप हाल होत आहे.यामध्ये शेतमजूरही भरडला जात आहे.या पार्श्वभूमीवर कामगार दिनाचे औचित्य साधून सुकृता रूरल एम्पॉवरमेंट फाऊंडेशन पुणे व गोल्डन अग्रो इंडस्ट्रीज,बनाळी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब व्यक्तीना जीवनाश्यक वस्तुच्या 50 कीटचे वाटप करण्यात आले.या जीवनाश्यक वस्तुच्या किटमध्ये 2 किलो साखर, पाव किलो चहापुड,1 किलो पोहे, 1 किलो गोडेतेल,1 किलो शेंगदाणे,खोबरेल तेल,कपड्यांचा साबण,अंघोळीचा साबण,पारले बिस्किट,भांड्याचा साबण अशा वस्तूंचा समावेश होता. सुकृता रूरल एम्पॉवरमेंट फाऊंडेशन,पुणे ही संस्था ग्रामीण भागातील गरजू व होतकरू लोकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन देणारी संस्था आहे.लोकांचे हित साधणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आणि अशा हालाखिच्या परिस्थितीत लोकांच्या मागे उभे राहने गरजेचे आहे आणि हिच परिस्थिती ओळखून बनाळी व परिसरातील गरजू लोकाना या वस्तुचे वाटप करण्यात आले.या जिवनाश्यक वस्तू घेतेवेळी लोकांच्या मनामध्ये समाधानाची भावना दिसून येत होती.यावेळी सुकृ...

श्रीराम लाईफ इन्शुरन्स ,सांगली शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले मुख्यमंत्री सहाय्यता नीधीत 14000रु जमा

इमेज
सांगली/03 कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमी वर संपुर्ण देशात लॉकडाऊन ची परिस्थिती असुन सर्व व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प आहेत, अशावेळी देशात आर्थिक संकट येईल अशी परीस्थीती असुन ,अनेक सामाजिक संस्था, उद्योजक सरकारी, खाजगी नोकरदार आपल्या कमाईतील काही रक्कम प्रधानमंत्री सहाय्यता निधी, मख्यमंत्री सहाय्यता निधी ला फंड देत असल्याचे दिसते आहे.देशात आलेल्या या  संकटाचा सामना करण्यासाठी आपला ही हातभार लागावा या भावनेने प्रेरीत होत , श्रीराम लाईफ इन्शुरन्स ,सांगली शाखेच्या कर्मचाऱ्यांनी  मुख्यमंत्री सहाय्यता नीधीत 14000रु जमा करुन  सामाजिक बांधीलकी जपली. यावेळी दै.जनमत ला माहिती देत असताना    श्रीराम लाईफ इन्सुरन्स चे सांगली जिल्हा अधिकारी . सूरज गायकवाड म्हणाले की, या कोरोणा विषाणू ने जगभर थैमान घातले असुन  , या विषाणू पासुन सुटका हवी असेल तर प्रशासनाने वेळोवेळी घातलेले सोशल डिस्टंसिग चे नियम सर्व देशवासीयांनी काटेकोर पाळणे गरजेचे आहे, तसेच सध्या आम्ही सर्व  कर्मचारी घरी राहुनच काम करत असल्याची माहिती देत , सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी त 14...