एस टी कर्मचाऱ्याचा ५० लाखाचा विमा संरक्षण द्या -एस टी कामगार सेनेची मागणी
जत/प्रतिनिधी:
सध्या जगभरात तसेच देशात कोरोना विषाणूचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत आपल्या सांगली जिल्ह्यात देखील कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चौथ्या संचारबंदीच्या काळात काही प्रमाणात शिथिलता दिली आहे.त्याच अनुशंगाने महाराष्ट्रात रेड झोन व कन्टॅनमेंट झोन वगळून जिल्हा अंतर्गत प्रवाशी वाहतूक करण्यास राज्य शासनाने काही नियम ठरवून २२/०५/२०२० पासून परवानगी दिली आहे सदर निर्णया मधील घालून दिलेल्या नियमांचे पालन तंतोतंत झाले नाही तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कर्मचारी तसेच समाज्यात होऊ शकतो या पार्श्वभूमीवर एस टी कामगार सेना यांच्या वतीने आगार व्यवस्थापक जत व नगरपरिषद जत यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन पत्रकात म्हटले आहे की, आगारात उपस्थित कर्मचारी व प्रवाशी यामध्ये प्रामुख्याने सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी नियोजन करावे.
दमा ,आस्थमा,छयरोग, कर्करोग,मधुमेय,फुफुसचे आजार असलेल्या व पाच वर्षे वयाच्या आतील ज्यांची अपत्ये आहेत तसेच ज्या गर्भवती महिला व दिव्यांग कर्मचारी यांना कामावर बोलावू नये.
आगारातील विश्रांतीगृह, टॉयलेट, आगार परिसर स्वच्छ ठेऊन दररोज निर्जंतुकीकरण करावे.
सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ऑप चालू असल्याची खात्री करावी.कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर,हँडवास,पीपीई किट पुरवण्यात यावे.
कर्मचारी कामावर येताना व जाताना थर्मल स्कॅन करून त्याच्या नोंदी कराव्यात.प्रत्येक कर्मचारी व प्रवाशी यांचे गेटवरच निर्जंतुकीकरण करूनच स्थानकात प्रवेश द्यावा.
सर्व कर्मचाऱ्यांचे पन्नास लाखाचा विमा उतरविण्यात यावा.
दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा मुंबई , पुणे या सारख्या रेड झोन मधून आलेल्या प्रवाशापासून आगारातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.
शासनाने ठरवून दिलेल्या आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी गाडीत बसणार नाहीत व मार्गावर प्रवाशी व कर्मचारी यांच्यात वाद होणार नाही यावर ठोस निर्णय घ्यावा.
या सर्व नियमांचे पालन व्हावे अशी मागणी महाराष्ट्र एस.टी कामगार सेना जत आगार सचिव पोपट शिंदे यांनी आगार व्यवस्थापक जत आगार यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. याकामी अध्यक्ष यशवंत शिंदे , जेष्ट नेते महेश पाटील,पी.टी.मदने , विलासतात्या शिंदे ,बळी यादव ,प्रदिप खरात यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा