आंबेडकरी पक्ष म्हणून निवडून येत नाही
आंबेडकरी पक्ष म्हणून निवडून येत नाही चार राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपने पुन्हा झेंडा रोवला आहे. तर बहुजन, वंचित, पीडित जनतेचा एकेकाळी राजकीय सत्ता भोगणारा एकमेव राष्ट्रीय पक्ष नेस्तनाबुत झाला आहे. नेस्तनाबुत होण्यामागे असे काय कारण असेल की अंग मेहनत करूनही विजयाचा टप्पा गाठणे आंबेडकरी पक्षांसाठी अशक्य झाले आहे? त्यासाठी हिंदीच्या काही ओळी आठवतात ज्या आंबेडकरी पक्षाच्या वर्तमान स्थितीस लागू पडतात. 'कोई भी दुःख मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नही.' खरंच लढले असते तर हरले असते का? हे पक्ष लढले नाहीत म्हणून हरले आहेत. ते कसे? निकाल लागल्यानंतर अनेक जण EVM ला दोष देत बसणार आहेत. मात्र, खरंच यामागे EVM घोळ आहे की आपले पक्ष वारंवार काही चुका करत आहेत. या बाजुने विचार करण्याची आणि तुलना करण्याची आता वेळ आहे. उत्तर प्रदेशातीलच आंबेडकरी पक्ष नाही तर देशभऱ्यातील आंबेडकरी पक्षांजवळ या महत्वाच्या गोष्टीच नाहीत. 1. सेंकड लाईन लिडरशिप - आंबेडकरी पक्षांमध्ये पक्षाचे सर्वेसर्वा सोडले तर असे नेतेच नाही ज्यांच्यावर पक्षाची कमी अधिक धुरा राहू शकते. उलट भाजप जवळ अनेक मोठे नेते आहेत ज...