सावित्रीमाई_ फुले
#सावित्रीमाई_पहिली_भारतीय_शिक्षिका झाल्या तेव्हा त्या अवघ्या १७ वर्षांच्या होत्या. सावित्रीबाईंना सर्वप्रथम शिकवण्याचे काम जोतीरावांनी केले. मात्र त्यांचे पुढील शिक्षण सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि केशव शिवराम जोशी {भावाळकर} यांनी केल्याची नोंद "बॉम्बे गार्डीयन ” या वर्तमानपत्राने २२ नोव्हेंबर १८५१ रोजी केलेली आहे. पुराभिलेखागारातील मुंबई इलाख्याच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या १८५२-५३ च्या अहवालात जोतीरांनी स्वत:च्या पत्नीला शिक्षिका म्हणून तयार केल्याची नोंद आढळते. भारतीयांनी सुरू केलेली पुण्यातील पहिली मुलींची शाळा,महार -मांग मुलांसाठी सुरू केलेली पहिली शाळा आणि पहिले वाचनालय यांच्या स्थापनेचे श्रेय त्यांच्याकडे जाते असे या सरकारी अहवालात म्हटलेले आहे. अहमदनगरच्या मिशनरी मिस फरार यांच्या महाविद्यालयातून सावित्रीबाईंनी शिक्षकेचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती गार्डीयनने दिलेली आहे. "शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षणमार्ग हा! शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हाटते पहा" असे एका कवितेत सावित्रीबाईंनी म्हटले होते. त्यांचा "काव्यफुले" हा १८५४ साली प्रकाश...