पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Please Don't under estimate to Someone...sachin Zende

इमेज
जय भीम मी सचिन झेंडे सेक्टर अध्यक्ष माडग्याळ( BSP )ता.जत, सांगली.....  राजकीय कुरघोडी काय असतात याचा आज मला प्रत्यक्ष आलेला पहिला अनुभव मी आपल्याशी शेअर करतोय.... मी व्हसपेट चा राहिवाशी आहे, गेली अनेक वर्षं मी माझ्या कुटुंबासमवेत व्हसपेट मध्ये आजोळी राहतो पण अचानक एक दिवस असा येतोय कि मला माझ्याच गावातुन हाकलून लावण्याची धमकी माझा सख्खा मामा देतो आणि याला कारण असतंय राजकारण... राजकीय कुरघोडी इतक्या खालच्या थराला जाऊन केल्या जातात याचा प्रत्यय याची देही याची डोळा आला.... प्रसंगवर्णन करण्या अगोदर थोड पाठिमागे जातो... मला अगदी लहानपणापासून स्टेज वरुन बोलायला खूप आवडतं, ती आवड अलीकडच्या काळात सामाजिक व राजकीय क्षेत्रात निर्माण झाली...व स्वतः ला सिद्ध करण्याचा प्रयत्न चालू झाला....मग राजकीय व्यासपीठ बहुजन समाज पार्टी जत च्या माध्यमातून मिळाले 7 ऑगस्ट 2021 रोजी, व त्यानंतर सतत संघटन वाढीचे कार्य करत असताना , साहजिकच अनेकांच्या नजरेत आलो. विशेषकरून गावातील राजकीय पुढारी... आणि इथंच सुरू झाली संघर्षाला सुरुवात... वरचेवर घरातून सूचना मिळू लागल्या, मामांनी एकदा त्यांच्या कार्यक...

मान्यवर कांशीराम साहेबांच्या परिनिर्वाण दिनी माडग्याळ सेक्टरच्या ऑफीसचे उदघाटन करण्यात आहे.

इमेज
जत /प्रशिक न्युज बहुजन समाज पार्टी जत विधानसभा माडग्याळ सेक्टरच्या नविन ऑफीसचे उदघाटन व व्हसपेठ येथील बुथची स्थापना करण्यात आली. यावेळी ऑफीसचे उदघाटन जिल्हा प्रभारी मा. अतुल दादा कांबळे यांनी केले.  यावेळी बोलताना बसपाचे जिल्हा प्रभारी मा. अतुल दादा कांबळे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बहुजन समाज पार्टी ची माहिती दिली व जत तालुक्यातील सर्व सेक्टर कमिटी, बुथ कमिटी बांधण्याच्या सुचना दिली. यावेळी विधानसभा संगठणमंत्री सदाशिव कांबळे, विधानसभा महासचिव शरद शिवशरण विधानसभा कोषाध्यक्ष प्रशांत बाबर, युवा नेते संतोष साबळे, शहराध्यक्ष सुनिल क्यातन, जितेंद्र सुर्वे, माडग्याळ सेक्टर अध्यक्ष सचिन झेंडे, संख सेक्टर अध्यक्ष हणमंत कांबळे, माडग्याळ सेक्टर विधानसभा सचिव अस्लम शेख माडग्याळ सेक्टर सचिव संतोष चौगुले,हणमंत नाटेकर , मनगेनी हुवाळे , पत्रकार केराप्पा हुवाळे , गणेश कांबळे, माडग्याळ सेक्टर मधील सर्व पदाधिकारी तसेच व्हसपेठ बुथचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.