पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भाजपने निवडणुकीत मित्र पक्षाचा धर्म निभावावा - अजितकुमार पाटील★ विलासराव जगतापावर स्तुतीसुमने तर भाजप पक्ष श्रेष्ठीवर डागली तोफ★ संग्रामसिंह देशमुखाच्या विजयाचा मित्र पक्षाचा निर्धार

इमेज
जत- पदवीधर मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित मित्र पक्ष बैठकीत बोलताना रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील. यावेळी भाजपचे राजाराम गरुड, विलासराव जगताप, संजय कांबळे आदी. जत/प्रतिनिधी:- काम सरो आणि वैद्य मरो ही आजपर्यत जिल्हा भाजपची निवडणूक रणनिती असली तरी जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप हे याला जिल्ह्यात अपवाद आहेत. विलासराव जगताप यांनी आजपर्यत अशी रणनिती कधी आखली नाही त्यांनी कायम मित्र पक्षाला सोबत घेतले पण जिल्ह्यात ही परिस्थिती दिसत नसल्याचा टोला लगावत जगताप यांच्या पाठीशी आम्ही मित्र पक्ष म्हणून खंबीर उभा राहून भाजपसोबत मित्र पक्षाचा धर्म निभावणार यात शंका नाही. रासप स्वाभिमानी आहे व राहणार आहे. तेव्हा भाजपने मित्र पक्षाचा धर्म निभावावा असे आवाहन रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी केले. पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजप व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ जत येथे मित्र पक्ष रासप म, रिपाइं यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी भाजपचे राजाराम गरुड, माजी आमदार विलासराव जगताप, रि...

मानव मित्र संघटना आसंगी तुर्क जळीतग्रस्त कुटुंबियांच्या धावली मदतीला ◆जिवनावश्यक किट व रोख पाच हजार रुपयाची मदत ◆

इमेज
जत/प्रतिनिधी:- आसंगी तुर्क येथील ता जत येथील भौरवा ईश्वर पुजारी यांच्या झोपडीवजा घराला आग लागून गॅसचा स्फोट होवून मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच जळीतग्रस्त कुटूंबियांना श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने तातडीने मदत जिवनावश्यक किट व रोख पाच हजार रुपये देण्यात आले. ही दुर्देवी घटना घडल्यानंतर अवघ्या तासाभरात चिकलगी मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत त्या कुटूंबियांना पोच करण्यात आली हे विशेष. जत तालुक्यात सक्रिय असलेल्या श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम तसेच अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात दिला जातो. उटगी येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत, सनमडी येथील पिंटू धायगुडे हा तरुण पुरात वाहून गेला, अचकनहळळी येथील शेतकरी विनायक शिंदे, प्रतापूर येथील लता गुलाब मोटे यांच्या झोपडीत गॅस सिलेडरचा स्फोट होवून नुकसान झाले. या कुटूंबियांना श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुक...

भाजप युवा मोर्चा जत तालुकाध्यक्षपदी बसवराज पाटील

इमेज
जत/प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी जत तालुका कार्यकारिणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाने जाहीर करण्यात आली. भाजप युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पदी एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील यांची निवड करण्यात आली. पक्षाची पुढील वाटचाल व राजकीय समीकरणे याचा विचार करून अनेक सक्षम व्यक्तींना या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.संघटनेत अनेक वर्ष प्रभावीपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद दिले गेल्याने तालुक्यातील युवकांत अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. बसवराज पाटील म्हणाले, तालुक्यातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काम करू. तालुक्यातील गावागावांत युवा मोर्चाच्या शाखा उघडणार असून या माध्यमातून जनतेचे विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहिल.

दुष्काळाचे नंदनवन करण्यासाठी तरुणांनी एकत्र यावे - तुकाराम बाबा महाराज

इमेज
जत/प्रतिनिधी: तरुण म्हटलं की उत्साह,जोश ,क्रिकेट स्पर्धा असो की कोणताही उत्सव असो तरुण उत्साहाने सहभागी होतात त्याच पद्धतीने जत सारख्या दुष्काळी तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी युवकांनी जलचळवळीसाठी एकत्र येण्याचे आवाहन चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केले. निमित्त होते जत तालुक्यातील अंकलगी येथील मल्लिकार्जुन क्रिकेट क्लबच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मल्लिकार्जुन क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्पर्धेत 38 संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस परमेश्वर मलकाप्पा बिराजदार, द्वितीय बक्षीस शाकीब इंजिनिअरिंग वर्क्स संखचे सिराज मिस्त्री, तर तृतीय बक्षीस रमेश मेत्री यांनी दिले होते.  यातील प्रथम बक्षीस देवर निंबर्गी क्रिकेट क्लब, द्वितीय बक्षीस मल्लिकार्जुन क्रिकेट क्लब अंकलगी तर तृतीय बक्षीस सिध्दनाथ क्रिकेट क्लबने पटकावले बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना तुकाराम बाबा महा...

ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा उद्घाटन सोहळा संपन्न◆पालकाच्या संमतीपत्रासह जुनिअर कॉलेजची आज सुरुवात◆

इमेज
जत/प्रतिनिधी: येळवी ता जत येथील सामाजकार्यात अविरत सेवा करणारी ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था संचलित ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा उद्घाटन सोहळा चिक्कलगी मठाचे मठाधिपती ह भ प तुकाराम महाराज तसेच जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, जत तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजना(नाना) शिंदे ,ज्येष्ठ नागरिक पंचाक्षरी (काका) अंकलगी यांच्या हस्ते पार पडला. उदघाटन प्रसंगी बोलताना, तुकाराम बाबा म्हणाले,ओंकार स्वरूपाचे दीपक अंकालगी व संतोष पाटील यांनी लावलेले वृक्ष भविष्यात मोठी भरारी घेईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यापारी राजाभाऊ अंकलगी, येळवीचे सरपंच कुमार पोरे , उपसरपंच सुनील अंकलगी, रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील, अल्पसंख्यांक अध्यक्ष नजीर भाई शेख,दरयाप्पा (आप्पा) जमदाडे,शिवाजी माने, खैरावचे सरपंच राजू घुटुकडे, रेवेवाडीचे वाडीचे सरपंच ब्रह्मा रेवे, संस्थेचे अध्यक्ष दिपक (आण्णा) अंकलगी,सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील ,सचिन मदने, शंकर (तात्या) आवटे, भाऊसो कदम,मधुकर नरळे,संतोष स्वामी, नवनाथ पवार, तुकारा...

जत-सांगली रस्त्यांची लागली वाट...! त्वरित रस्ता दुरूस्ती करा अन्यथा भाजप युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन -बसवराज पाटील

इमेज
जत/प्रतिनिधी: जत-सांगली रस्त्याची अवस्था सध्या दयनीय बनल्याने जत ते डफळापूर पर्यंतच्या या १७ किलोमीटरच्या खड्डेमय रस्त्यांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना शारीरिक व्याधींचा त्रास वाढला आहे. अनेकांमध्ये पाठीचे व मानेचे दुखणे बळावले आहे. बऱ्याचदा गरोदर माता व वृद्धांसाठी हा रस्ता पार करणे म्हणजे मैलाचा दगड ठरतो. रात्री- अपरात्री हा रस्ता वाहनांसाठी घातक ठरत आहे. शारीरिक व्याधींचे मूळ ठरलेल्या या रस्त्यांची चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.  सध्या कोरोना महामारीच्या काळात काही रूग्णांचे अचानक प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी सांगली मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये रूग्णांना नेण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो पण हा रस्ताच पूर्णपणे उखडून गेल्याने रूग्ण वाटेतच दगावण्याची दाट शक्यता आहे असे असूनही या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे साफ दुर्लक्ष असून हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते कुणाच्या मरणाची वाट पहात आहे का! असा सवालही भाजपा युवा मोर्चाचे तालुका अ...

जागर फाऊंडेशन सामाजिक संस्थेतर्फे दिपावलीचे फराळ वाटप

इमेज
जत/प्रतिनिधी: गोर-गरीब नागरिकांना देखील दिवाळीचा आनंद मिळावा या उद्देशाने जागर फाऊंडेशन मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल गोल्लार समाज्यातील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष परशुराम मोरे हे संस्थेतर्फे मागील सहा वर्षांपासून गोल्लार वस्तीतील नागरिकांना जमा करून त्यांना दिवाळीचे फराळ वाटप करतात. यावेळी बोलताना मोरे म्हणाले की, आज गरीब वस्तीत मिठाई व फराळ वाटप केल्यामुळे गोल्लार वस्तीतील लहान मुलांनी खऱ्या अर्थाने दिपावली साजरी केली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी, युवा नेते योगेश मोटे,ओंकार कांबळे,अविनाश साळे, विजय कांबळे, प्रतीक संकपाळ,सुनील शिंदे, प्रसाद शिंदे,सागर पाथरूट यांचेसह पदाधिकारी व नागरिक उपस्थितीत होते.

जत मध्ये शॉपिंग मॉल व अद्यावत बस स्थानक उभारावे - पापा कुंभार

इमेज
जत/प्रतिनिधी:  जत शहरातून जाणारे विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर तसेच मंगळवेढा ऐगळी या राज्यमार्गावरील मोक्याच्या ठिकाणी जत आगाराची एस.टी. परिवहन विभागाची जागा असून या जागेवर बी.ओ.टी. मधून अद्यावत असे शाॅपिंगमाॅलसह सर्व सोईनेयुक्त बसस्थानक उभे करण्यासाठी जतचे क्रियाशील आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी जत येथिल सामाजिक कार्यकर्ते व शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यानी केली आहे.  कुंभार म्हणाले की,आपल्या शेजारील कर्नाटक राज्यातील आपल्या तालुक्याच्या सिमेलगतची सर्वच परिवहन विभागांतर्गत असलेली बसस्थानके अद्यावत व सर्व सोईनेयुक्त अशी नव्याने उभारली आहेत.  जत बसस्थानकाची अवस्था तर फारच बिकट झाली असून या स्थानकावर प्रवाशांचे सोइपेक्षा गैरसोईच जास्त आहेत. या बसस्थानकाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.  जत तालुक्यातील एकूण गावाचा विचार केला तर जतला सर्व सोईनेयुक्त असे अद्यावत बसस्थानक यापूर्वीच होणे अपेक्षित होते. पण याकडे कोणीही लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे हा बसस्थानकाचा ...

जत तालुक्यातील बेकायदेशिर धान्य वाहतूक करणा-या वाहन मालक व त्या सबंधीत दोषी आढळलेल्या सरकारी धान्य दुकानदारांवर गुन्हे दाखल व कठोर कारवाई - तहसिलदार सचिन पाटील

इमेज
  जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील बिळूर,बनाळी,दरिबडची या ठिकाणी शासकीय धान्य साठा वाहून काळाबाजारात विक्री केला जाणार असलेच्या संशयावरुन पकडणेत आलेल्या वाहनांवर व वाहनाचे चालक-मालकांवर जिवनावश्यक वस्तूची बेकायदेशिर वाहतुक केले जात असलेचे कारणास्तव गुन्हे दाखल करणेत आलेले आहेत. त्याबाबत वाहन चालक दुकानदार व सापडून आलेल्या वाहन परिसरातील रास्त भाव धान्य दुकानदारांची कसून चौकशी व तपासणी करुन संबंधीत दोषींवर कडक कारवाई करणेबाबतची प्रक्रिया महसूल व पुरवठा विभागाकडून करणेत येत असलेचे तहसिलदार सचिन पाटील यांनी या पत्रकाव्दारे कळविले आहे. मागिल पंधरा दिवसात जत तालुकेतील एकूण तीन ठिकाणी बेकायदशिर धान्य वाहतूक करत असलेली वाहने ग्रामस्थांनी पोलीसांकरवी महसूल प्रशासनाला पकड़न दिलेली आहेत. त्यामध्ये आढळून आलेला धान्य साठा शासकीय असलेचा सापडून आलेल्या गोणीवरुन निदर्शनास आलेला आहे. या प्रकरणी तालूकेतील शासकीय धान्य दुकान चालवणारे परवानाधारक व दुकानाशी संबंधीत असणारे लोक पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे वर रितसर फौजदारी गुन्हे दाखल करणेत आले आहेत. शिवाय त्यांची कसून चौकशी चालू असून ता...

योगेश मोटे यांनी सोडविला शहरातील पाणीप्रश्न;गंजीवाले गल्लीत नागरिकात समाधान

इमेज
जत:प्रतिनिधी:जत शहरातील चिनगीबाबा मंदिर परिसरात गंजीवाले गल्ली भागात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचा पाणीप्रश्न भेडसावत होता.नागरिकांनी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात होते.अखेर युवा नेते योगेशबाबा मोटे यांच्या प्रयत्नातुन गंजीवाले गल्ली येथे पाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.        याबाबत माहिती अशी की,जत शहरातील चिनगीबाबा मंदिर परिसरात गंजीवाले गल्ली भागात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचा पाणीप्रश्न भेडसावत होता.नागरिकांनी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात होते.या भागातील नागरिकांनी त्यांची समस्या युवा नेते योगेशबाबा मोटे यांना सांगितली. तात्काळ योगेशबाबा मोटे यांनी स्वखर्चाने पाईपलाईनची व्यवस्था केली.नगरसेवक टीमु भाई एडके यांच्या मदतीने तेथील नागरिकांची पाण्याची व्यवस्था केली. अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या मिटल्याने नागरिकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे. ★चौकट★ गेल्या अनेक वर्षांपासून गंजीवाले गल्ली येथे पाण्याची समस्या युवा नेते योगेशबाबा मोटे व नगरसेवक टीमुभाई एडके यांच्या प्रयत्नाने मिटली.यामुळ...

सांगली शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी मनोज हेगडे

इमेज
जत/प्रतिनिधी: सांगली शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी मनोज हेगडे यांची निवड करण्यात आली. यावेळी निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख,कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. मनोज हेगडे निवड झाल्यावर बोलताना म्हणाले,राष्ट्रवादी पक्षाची तत्वे ध्येये व धोरणे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी मी कार्य करात राहीन. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस बाळासाहेब बापु पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत देशमुख ,वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संग्राम पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहर-जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर , राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष उमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

जत मधील सर्व सी सी टि व्ही कॅमेरे सुरू करा...संजय कांबळे RPI (Athavale)

इमेज
जत/ प्रतिनिधी.             जत नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व भा.ज.प.चे युवा नेते उमेश सावंत व जत व्यापारी बांधवानी पुढाकार घेऊन शहरात चौकाचौकात बसविण्यात आलेले सि.सि.टि.व्ही. कॅमेरे सद्या बंद अवस्थेत असून चार दिवसावर आलेल्या दिपावली सनापुर्वी  हे सर्व सि.सि.टी.व्ही. कॅमेरे प्रशासनाने पूर्ववत सुरू करण्यासाठी सबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष आयु. संजयरावजी कांबळे यांनी केली आहे.     .याबाबत सविस्तर माहिती अशी की जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत वारंवार होणारे चोरीचे प्रकार तसेच वाहतूक कोंडी यावर नियंत्रण रहावे यासाठी जत नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष युवकनेते श्री. उमेश सावंत यांनी जत शहरातील सर्व व्यापारी तसेच दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून निधी जमा करून जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत तसेच चौकाचौकात  २२ सि.सि.टि.व्ही. यंत्रणा बसवून कार्यान्वित केली होती.      सुरुवातीला ही यंत्रणा चांगल्या प्रकारे सुरू होती. ज्या चौकात ही यंत्रणा ...

केंद्रीय रेल्वे बोर्ड सोलापूर विभाग सदस्यपदी प्रकाश जमदाडे

जत/प्रतिनिधी:  सांगली कृषी उत्पन बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांची केंद्रीय रेल्वे बोर्ड सोलापूर विभागाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्याचा सत्कार खा. संजयकाका पाटील यांनी केला. यावेळी पं. स. सदस्य रामान्ना जीवत्रावर व बिळूरचे सरपंच नागनगौड़ा पाटील आदिजण उपस्थित होते. खा. संजयकाका पाटील यांनी खास बाब म्हणून रेल्वे मंत्री कै, सुरेश अंगी यांचेकडे पाठपुरावा केला होता. सदरची निवड ही ३१ डिसेंबर २०२१ पर्वंत आहे वापूर्वी २ वर्ष प्रकाश जमदाडे हे पुणे विभागाचे सदस्य होते. परंतु सलगरे स्थानकापासून कवठेमहांकाळ, डालगाव, जत रोड स्टेशन, सांगोला है सोलापूर विभागाच्या अंतर्गत होते. या आपल्या भागातील रेल्वे च्या प्रवाशांची सोडवणूक करणेसाठी अडवणी येत होत्या म्हणून खा. संजयकाका यांनी खास बाम म्हणून पुणे विभाग बदतून सोलापुर विभागाचे सदस्य केले आहे. हे पद ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे या विभाग अंतर्गत सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीट,विजापूर, गुलबर्गा या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे विभागाचे सदस्य असताना मिरज, जत, विजापूर व विजापूर, उमदी, पंढरपूर या रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्री के. सुरेश अंगड...