केंद्रीय रेल्वे बोर्ड सोलापूर विभाग सदस्यपदी प्रकाश जमदाडे
जत/प्रतिनिधी:
सांगली कृषी उत्पन बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांची केंद्रीय रेल्वे बोर्ड सोलापूर विभागाच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
त्याचा सत्कार खा. संजयकाका पाटील यांनी केला. यावेळी पं. स. सदस्य रामान्ना जीवत्रावर व बिळूरचे सरपंच नागनगौड़ा पाटील आदिजण उपस्थित होते. खा. संजयकाका पाटील यांनी खास बाब म्हणून रेल्वे मंत्री कै, सुरेश अंगी यांचेकडे पाठपुरावा केला होता.
सदरची निवड ही ३१ डिसेंबर २०२१ पर्वंत आहे वापूर्वी २ वर्ष प्रकाश जमदाडे हे पुणे विभागाचे सदस्य होते. परंतु सलगरे स्थानकापासून कवठेमहांकाळ, डालगाव, जत रोड स्टेशन, सांगोला है सोलापूर विभागाच्या अंतर्गत होते. या आपल्या भागातील रेल्वे च्या प्रवाशांची सोडवणूक करणेसाठी अडवणी येत होत्या म्हणून खा. संजयकाका यांनी खास बाम म्हणून पुणे विभाग बदतून सोलापुर विभागाचे सदस्य केले आहे. हे पद ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे या विभाग अंतर्गत सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीट,विजापूर, गुलबर्गा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
पुणे विभागाचे सदस्य असताना मिरज, जत, विजापूर व विजापूर, उमदी, पंढरपूर या रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्री के. सुरेश अंगडी यांची भेट घेतली होती. अनेक प्रवाशांची सोडवणूक करणेसाठी पाठपुरावा केला होता. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी नूतन केंद्रीय रेल्वे बोर्ड सोलापूर विभागाच्या सदस्य प्रकाश जमदाडे बोलताना म्हणाले की, विजापूर-जत मिरज,विजापूर-उमदी-पंढरपूर या नवीन रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणार व तसेच रांजणी व ढालगाव याठिकाणी उड्डान पूल उभारणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा