पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोल साबळे यांनी पालकमंत्री व जिल्हाधकारी यांचे मानले आभार

इमेज
      अमोल साबळे , वंचित बहुजन आघाडी जत प्रतिनिधी जत. सध्या देशात व राज्यात कोरोणा हा विषय अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब बनली आहे, सांगली जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी या विषाणुं चा फैलाव अतिवेगाने होत असल्याची परिस्थिती आहे, जत तालुक्यातील सुद्धा कोरोणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने  प्रशासन आणि सामान्य नागरिक हे भीतीच्या छत्र छायेखाली आहेत.याला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव  पर्याय होता आणि आहे, हि दिवसेदिवस वाढत जाणाऱ्या कोरोणा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अमोल साबळे यांनी जत तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन ही मागणी केली होती,पण सांगली जिल्ह्यातील च वाढत जाणारी रुग्ण संख्या लक्षात घेत मा. पालकमंत्री यांनी जिल्हाधिकार्यालयात मिठींग घेऊन आठ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अभिनंदनीय आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने हा मोलाचा निर्णय घेऊन वंचित आघाडी ने दिलेल्या निवेदनाचा विचार करून लॉकडाऊन केल्याने वंचित बहुजन आघाडी जत कडून ,दै.जनमत शी संवाद साधत अमोल साबळे यांनी मा. पालकमंत्री यांचे आभार मानले. यावेळी सा...

*व्हसपेट ता.जत येथील 25वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यु*

इमेज
प्रतिनिधी माडग्याळ व्हसपेट ता.जत येथील 25वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यु झाल्याची दुख:द घडली आहे. अजित भाऊसाहेब कोडग असे या मयत तरुणांचे नाव आहे,  बुधवार दि.22 जुलै 2020 , रोजी रात्री 9.30वाजता च्या सुमारास जत ला जाणाऱ्या व्हसपेट - कोळगेरी  रस्त्यावर हि घटना  घडली. अजित कोडग हा निगडी खुर्द येथील रिजन पॉवर टेक या कंपनीत  सिनिअर टेक्निकल विभागात काम करीत होता. नाईट ड्युटी साठी जात असताना, KA 28 C 0155 या  डंपर ला जोरदार धडक दिल्याने या तरुणांचा जागीच मृत्यु झाला.घटनेने या परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे,  संबंधीत घटना पोलीस ठाणे जत ला कळविले असता ,जत  पोलीस घटनास्थळी हजर राहुन या घटनेचा पंचनामा केला.

***** *एक दडपलेला इतिहास* ****(लेखक : प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर

( *प्रज्ञासुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा एकुलता एक सुपुत्र सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या उपेक्षित जीवनाचा आलेख आणि त्यांचे कतृत्वाचा परिचय करुन देणारा, अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी शब्दबध्द केलेला लेख नक्कीच वाचा*) ***** *एक दडपलेला इतिहास* **** (लेखक : प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर)  महापुरुषाचा मुलगा होणे ही जशी आनंदनीय बाब असते तेवढीच ती कठीणही असते. महापुरुषाच्या घरात जन्म झाला म्हणजे सामान्य जीवन जगणे समाप्त होते. तुम्ही अमुकाचे अमुक आहात अन् तरीही असे का वागता असे ज्याला कळते वा न कळते त्या सगळ्यांकडून ऐकून घ्यावे लागते. त्यांना उत्तर दिले तर तो उध्दटपणा ठरतो. अशाच दुर्बिणीखालील भय्यासाहेबांचे आयुष्य गेले.  लहानपणीच न्यूमॅनिटीक आणि पायाच्या पोलिओ सारख्या आजाराने ग्रासलेल्या भैय्यासाहेबांना त्यांचे मामा धोत्रे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार केले. समुद्राच्या तप्त वाळूमध्ये पाय गाडून उभे राहणे आणि त्यातून पायात ऊर्जा निर्माण करणे हा त्यांचा नित्याचा कार्यक्रम असे. त्याच बरोबर गावठी औषधाच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांना व्य...

जतमधील दडपलेल्या पाच मृत्यूप्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करा : विक्रम ढोणेपोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या कार्यकाळातील प्रकरणे; ढोणेंचे 17 जुलैपासून आमरण उपोषण

इमेज
  जत (सांगली) : लॉकडाऊनच्या काळात जत तालुक्यातील राहूल दत्तात्रय काळे, कस्तुरी लक्ष्मण शिवणकर, म्हाळाप्पा शिवाजी मासाळ, महांतेश रामगोंडा पाटील, तुषार संभाजी शिंदे या पाचजणांच्या संशयित मृत्यूची प्रकरणे पोलिसांनी दडपलेली आहेत. हे सर्व लोक आर्थिक आणि सामाजिकदृष्या दुर्बल असल्याने पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या कार्यकाळात आरोपींना वाचवण्यासाठी तपास केला गेला आहे. त्यामुळे यातील सत्य बाहेर यावे म्हणून याप्रकरणांचा तपास राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) मार्फत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात ढोणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पोलिस दलाने अभिमानास्पद कामगिरी केली आहे, मात्र जत तालुक्यात लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेवून संशयास्पद मृत्यू दडपण्याचे गुन्हेगारी कारस्थान केले गेले आहे. जत तालुका मागास असल्याचा फायदा घेवून संबंधितांनी स्वत:च्या तुंबड्या भरल्या आहेत. पैसे असतील तर केलेले खून पचवता येतात, हा संदेश या प्रकरणांतून गेला आहे. पीडित पाचही कुटुंब...

राजगृह:अत्युच्च ज्ञानकेंद्र

📖 ✍                डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी  जानेवारी 1934 मद्ये, बॅन्केचे कर्ज काढून,  दादरच्या हिंदू काॅलनीमद्ये   ' राजगृह  ' बांधले होते. त्याठिकाणी ते सहकुटुंब रहायला आले. त्यांनी आपली लायब्ररी परेलच्या दामोदर हाॅलमधून हलवून राजगृहात आणली.     डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लायब्ररीचे  वेगवेगळे  खास विभाग केले होते. अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, धर्म, कायदा, संरक्षण, राज्यशास्त्र, चरित्रे व आत्मचरित्रे, परदेश नीती, बालशास्त्र, भूगोल,तत्वज्ञान, युद्ध, राज्यघटना, चलन,मानववंशशास्त्र असे वेगवेगळे विभाग बनविण्यात आले होते. शिवाय विविध अहवाल, नियतकालिके, वृत्तपत्रे इत्यादि साठी स्वतंत्र व खास विभाग लायब्ररी मद्ये करण्यात आले होते. निरनिराळ्या एन्सायक्लोपीडीयांना तर त्यात दर्जेदार स्थान होते. शेल्फवर त्या त्या विषयांची नावे वळणदार अक्षरांनी लिहून चिकटवून ठेवण्यात आली होती.                       खास अभ्यासाची सोय     पहिल्य...

कोसारी येथे आमदार विक्रम (दादा)सावंत यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन :ग्रामपंचायत कोसारी

इमेज
.  कोसारी/ प्रतिनिधी .दिनांक: 06/07/2020.       जत पासुन अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसारी ता जत येथे विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार विक्रम (दादा)सावंत यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.            यामध्ये 14वा वित्त आयोगातुन अनेक विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ग्रामपंचायत कोसारी आणि जत तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रम (दादा)सावंत यांचे  महत्वाचे श्रेय आहे. कोसारी गावच्या विकासात सातत्याने भर घालणार असे त्यांनी सांगितले. युवकांनी माझ्यापर्यंत कोणतेही प्रश्न मांडा मी त्यावर मनापासून प्रयत्न करणार असे ते म्हणाले.          कोसारी ग्रामपंचायतीच्या विकासकामामध्ये 14वा वित्त आयोगातुन कोसारी गावामध्ये 1.रोहिदास नगर बंदिस्त गटार , 2.गावठान अंतर्गत पेव्हींग ब्लाॅक बसवणे, 3.गावठान बंदिस्त गटार, 4.इंदिरानगर रस्ता काँक्रीट करणे, 5.कोसारी गुळवंची रस्ता लगतचा महारनुरवाडी रस्ता मुरमीकरण करणे.इत्यादी विकास कामाचे उद्घाटन समारंभ आमदार विक्रम सावंत यांच्या उपस्थितीत ...

व्हसपेट ता.जत येथे अपघातात एकाचा जागीच म्रुत्यु

इमेज
प्रतिनिधी माडग्याळ  व्हसपेट ता.जत येथिल उतारावर  अपघात होऊन  एकाचा जागीच म्रुत्यु होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदरील मयत इसम हा गारळे वाडी ता.जत चा  असुन त्याचे नाव  म्हाळाप्पा लक्ष्मण गारळे (वय 45) असे आहे, मिळालेल्या माहिती नुसार हा इसम वळसंग येथील नातेवाईकांच्या घरुन येत असताना पहाटे पाच सहा च्या सुमारास व्हसपेट येथील उताराला मोटार सायकल चा वेग सावरता न आल्याने गाडीचा ताबा सुटुन डांबरी सोडुन खाली काही अंतरावर दगडात आदळल्याने या व्यक्ती चा म्रुत्यु झाल्याचे दिसते ,  घटनेची माहिती मिळतात  जत पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी हजर झाले. पुढील तपास जत पोलीस करत आहेत

अमोल साबळे यांनी दिलेल्या जत शहर बंदच्या हाकेला शहरवासीयांनी दिली ओ...

इमेज
प्रतिनिधी जत कोरोणा विषाणू ने जत तालुक्यातील बिळुर गावासह परीसरात थैमान घातलेले असताना, तालुक्यात व जत शहरातील नागरिक भितीच्या छत्रछायेखाली वावरत असल्याची परीस्थिती आहे. बिळुर सह, मेंढेगिरी, तिल्याळ सारख्या ग्रामीण भागात कोरोणा संक्रमित रुग्णांची वाढती संख्या पाहता वाढता धोका लक्षात घेऊन , वंचित बहुजन आघाडी जत तालुका चे ता. अध्यक्ष अमोल साबळे व पदाधिकारी यांनी केलेल्या निवेदनास प्रतिसाद देत,  जत शहरवासीयांनी व व्यापारी वर्गाने 100टक्के शहर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.  जत शहरात कोरोणाची साखळी होऊ नये यासाठी दक्षता म्हणून लॉकडाउन करावे असे निवेदन अमोल साबळे यांनी जत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार,पोलिस प्रशासन व व्यापारी वर्ग यांना निवेदन देऊन विनंती केली होती. या निर्णयाचा विचार करुन व्यापारी बंधुनी सहा जूलै पासुन अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचे अमोल साबळे यांनी कौतुक केले

व्हसपेट येथील बुद्ध विहार पुन्हा एकदा नव्याने सुरू

इमेज
जत, दि.05/2020 गुरुपौर्णिमेचा दिवसी व्हसपेट ता.जत  येथील बंद असलेले  बुद्ध विहार पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आले. व त्यानिमित्ताने बोधि व्रुक्ष (पिपळ)व्रक्षाचे रोपन करण्यात आले. गेली 25 वर्ष बुध्दमंदिर असुनही ते समाजासाठी वापरात न्हवते आणि ज्यावेळेस ते ताब्यात मिळाले या वास्तुची खुप दयणीय अवस्था झालेली होती. आपल्या वास्तुची झालेली हि अवस्था पाहून पुणे ,मुंबई हून आलेले  सूरेश कीर्तीकर ,गणेश कांबळे, मुकेश हुवाळे हे संपूर्ण भारत लॉकडाउन पडल्याने गावी येउन 15 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपवुन या वास्तु दूरुस्तीचा संकल्प हाती घेतला व समाजातील मंडळी ,सरपंच  ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून , हे समाज मंदिर दुरुस्तीचे काम पुर्णत्वास नेले, या कार्यात समाजातील सर्व लोक, शिक्षक मंडळी अधिकारी वर्ग यांनी सढळ हातानी धम्मदान दिले व शेवटी ही वास्तु सजीव बनवली.  त्यानिमित्ताने गुरुपौर्णिमेचा दिवस साधुन हे विचारपीठ, बौद्धमंदिर सर्वांसाठी पून्हा एकदा उघडण्यात आले. सध्या चाललेल्या या भयानक कोरोणा वायरस च्या पार्श्वभूमीवर सामाजिक जागरूकता लक्षात घेत , सोशल डिस्टंसिग, मास्क या सर...

उमदी पोलीस ठाणे हद्दीतील उमदी- संख नाका बंदी करून दुचाकी वाहान व मास्क न वापरणे तसेच धूम्रपान कारवाई ....वाहन कायद्याप्रमाने 94 केसेस करून 18,800/-रू दंड , मास्क न वापरणे 18 खटले,धूम्रपान करणारे 12 केसेस 2,400/- दंड

इमेज
संख प्रतिनिधी -राजेभक्षर जमादार  जत तालूका संख येथे उमदी पोलीसाकडून  दि. 03 रोजी मा. पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिले आदेशाप्रमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांचे मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाणे हद्दीत उमदी व संख या गावी नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये विना मास्क , डबल सीट, तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे इसमाचेवर कारवाई केली आहे.  जत तालूका उमदी ठाणेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मार्गदर्शनखाली उमदी व संख येथे कारवाईमध्ये मोटर वाहन कायद्याप्रमाणे 94  केसेस करून 18800/- रु दंड  केले आहेत, मास्क न वापरणाऱ्या 11 खटले दाखल केले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे  लोकांनवर 12 केसेस करून 2,400/- रु दंड वसूल केला आहे.तसेच दि.03 जुलै  रोजी उमदी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना  बोर्गी बुद्रूक गावी रमजान बंदगीसाब शेख हा त्याचे शेतातील घराचे पाठिमागे मोकळ्या जागेत देशी दारूची विक्री करीत आहे. असे पोलीस नाईक नितीन पलूसकर यांना  गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानंतर सदरची बातमी सपोनि कोळेकर यांना कळवून सपोनि कोळेकर यांच्य...

जत शहर पूर्ण सात दिवस लॉकडाउन करावे यासाठी वंचित बहुजन आघाडी ता.जत कडुन निवेदन

इमेज
जत  जत तालुक्यातील बिळुर येथे आठवडाभरापुर्वी एका इस्त्री व्यवसायिकाला कोरोणाची लागण झाली होती. सदर व्यक्ती कडुन बिळुर गावातील अनेक लोकांना या संसर्गजन्य रोगाची लागण झाली .ता.03जुलै 2020 पर्यंत हा आकडा 46 पर्यंत वाढतच गेला. अशाप्रकारे बिळुर हे गाव कोरोणा विषाणूचे हॉटस्पॉट बनले.बिळुर व परिसरातील लोकांचा वावर खुप मोठ्या प्रमाणात जत शहरात असतो, हि बाब लक्षात घेऊन,प्रशासकीय यंत्रणेने बिळुर व परिसरातील नागरिकांच्या मुक्त संचार वर निर्बंध आणले पाहिजे तसेच पुर्ण सात दिवसांसाठी संपुर्ण जत शहर लॉकडाउन करण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडी जत ता. वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, सदरचे कोरोणा हॉटस्पॉट बनलेले बिळुर मधील लोकांचा वावर जत शहरात जास्त होता,  तसेच या गावातील एक किराणा दुकानदार, दोन आरोग्य सेविका, व एक क्रुषी सेवा केंद्र चालक , व एक शिंदि विक्रेता या सर्व व्यक्तिंसोबत गावतील अनेकांचा संपर्क आला होता, या सदर व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सुमारे 150 नागरिकांना संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच मेंढेगिरी व तिल्याळ या गावातील  2 व...

आम आदमी पार्टीच्या जत तालुका अध्यक्ष पदावर डी.एस चौगुले यांची निवड

इमेज
. कोसारी /प्रतिनिधी .दिनांक 02/07/2020. आम  आदमी पार्टी च्या जत तालुका अध्यक्ष पदावर दरेश्वर शिवाजी चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष राजकुमार राठोड यांच्या संकल्पनेतुन त्याच्या शुभहस्ते डी. एस. चौगुले यांना  आम आदमी पार्टी च्या जत तालुका अध्यक्ष  पदावर कार्य करण्याची संधी दिली.तालुका अध्यक्ष या पदावर निवड करत असताना डी. एस. चौगुले यांचे जत तालुक्यातील सामाजिक तसेच राजकीय वर्चस्व बघुन,जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम,जय तालुक्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,जनतेवर होत असलेला अन्यायाविरूद्ध लढा या सर्व गोष्टीवरील सार्वजनिक काम पाहुन ही निवड करण्यात आली.       सांगली जिल्हा आम आदमी पार्टीचे अध्यक्ष म्हणाले हे काम त्यांनी पुढे चालु ठेवतीलच असा विश्वास ठेवुन आपल्या सामाजिक व राजकीय उपक्रमांमध्ये असलेला सहभाग लक्षात घेऊन त्यांची आम आदमी पार्टी च्या जत तालुका अध्यक्ष नियुक्ती केली.    यावेळी आम आदमी पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजकुमार राठोड,सचिव अश्फाक शेख,चेअरमन नामदेव बिराजदार,मे...

कोसारी येथे आमदार,गोपिचंद पडळकरांच्या प्रतिमेचा दुग्धाअभिषेक सोहळा संपन्न

इमेज
 .  कोसारी /प्रतिनिधी .दिनांक :01/07/2020. शरद पवारांवरील  वादग्रस्त  विधानामुळे चर्चेत असलेले भाजप आमदार गोपिचंद पडळकर जतला आले असताना कोसारी येथील ग्रामीण विकास संस्थेस भेट दिली होती.यावेळी कोसारी येथील त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला असुन त्यांना पाठींबाही दर्शवला आहे. यामध्ये भाजप युवा नेते आणि कोसारी गावचे  माजी विद्यमान  उपसरपंच मधुकर भोसले आणि संस्थेचे अध्यक्ष मा .श्री . विवेक टेगंले यांच्याकडुन ही मोठा सत्कार करण्यात आला. अगदी मतदानाचा हक्क नसताना सुद्धा आमदार गोपिचंद पडळकर यांचे कट्टर समर्थन करणारे सिद्धु महारनुर आणि विशाल महारनुर यांचा सत्कार आ.गोपिचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला.        या सर्व उत्साहाने जत पासुन अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसारी गावामध्ये आमदार गोपिचंद पडळकर यांच्या समर्थकांनी कोसारी ग्रामपंचायत समोर आ.पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक घालुन आजपर्यंतचा सर्व कलंक धुवुन काढुन त्यांना पाठीबांही दर्शवला. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर जो प्रश्न उपस्थित केला होता आजतागायत आरक्षण न मिळा...

वंचित बहुजन आघाडीच्या जत ता. अध्यक्ष पदी अमोल साबळे यांची निवड

इमेज
 जत , वंचित बहुजन आघाडीच्या जत ता. अध्यक्ष पदी अमोल साबळे यांची परत एकदा निवड करण्यात आली. हि निवड वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी च्या बैठकी दरम्यान झाली. यावेळी. सर्वानुमते जत तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी आयु. अमोल भैया साबळे यांच्या कडेच द्यावे असे ठरले. यावेळी उपस्थित अमोल पांढरे  प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी  महाराष्ट्र राज्य , जि. अध्यक्ष डॉ. विवेक गुरव, बापु शेस्वारे , फारुक ककमरी , नानासाहेब वाघमारे, भारीप जि. अध्यक्ष विक्रम कांबळे. आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना अमोल साबळे म्हणाले ,कि हि निवड माझ्या आता पर्यंत केलेल्या सामाजिक तसेच राजकीय कार्याची, व माझ्या पक्षाप्रती दिलेल्या योगदानाची पोहोण असल्याचे म्हणाले,  पुढे बोलताना म्हणालज कि, माझ्या वर वंचित बहुजन आघाडी ने ज्या विश्वासाने  हि  जबाबदारी दिली आहे, तो विश्वास आपल्या कामांतुन दाखवून देवु, आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेत्रुत्वा खाली सर्व बहुजनांना एका झेंड्याखाली आणण्याचे काम अखंड चालू ठेवु . व आमच्या बहुजन बांधवांना न्याय देण्याचे काम करत राहु असे आश्वासन दिले.