*व्हसपेट ता.जत येथील 25वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यु*
प्रतिनिधी माडग्याळ
व्हसपेट ता.जत येथील 25वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यु झाल्याची दुख:द घडली आहे. अजित भाऊसाहेब कोडग असे या मयत तरुणांचे नाव आहे, बुधवार दि.22 जुलै 2020 , रोजी रात्री 9.30वाजता च्या सुमारास जत ला जाणाऱ्या व्हसपेट - कोळगेरी रस्त्यावर हि घटना घडली. अजित कोडग हा निगडी खुर्द येथील रिजन पॉवर टेक या कंपनीत सिनिअर टेक्निकल विभागात काम करीत होता. नाईट ड्युटी साठी जात असताना, KA 28 C 0155 या डंपर ला जोरदार धडक दिल्याने या तरुणांचा जागीच मृत्यु झाला.घटनेने या परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे, संबंधीत घटना पोलीस ठाणे जत ला कळविले असता ,जत पोलीस घटनास्थळी हजर राहुन या घटनेचा पंचनामा केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा