पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझ्या बाबासाहेबांना छळले कोणी?

--------------------------------------------- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'पांचजन्य' हे मुखपत्र आता ऑनलाइनही दिसते. या ऑनलाइन पोर्टलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना, नेहमीच खोडसाळपणा केला जातो. बाबासाहेबांना नेहरूंमुळे मंत्रिपदाचा राजीनामा कसा द्यावा लागला? राज्यघटना तयार करताना कॉंग्रेसने आंबेडकरांना कसा त्रास दिला? बाबासाहेबांना गांधी- नेहरूंनी कसे छळले इत्यादी.  मुळात, राज्यघटना तयार करताना गांधी, नेहरू आणि आंबेडकर सोबत होते, हे ऐतिहासिक सत्य आहे. पण, राज्यघटना तयार होत असताना संघ काय करत होता? संघाच्या मुखपत्रात, 'ऑर्गनायझर'मध्ये, तेव्हा कोणते लेख प्रकाशित होत होते? डॉ. रामचंद्र गुहांनी ते विस्ताराने मांडले आहे. संघाचे मुखपत्र काय मांडत होते? - "या देशाची राज्यघटना एकच आहे. मनुस्मृती. आणि, या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत महर्षी मनू. स्वयंघोषित 'ऋषी' आंबेडकर आणि 'महर्षी' नेहरू या देशाची राज्यघटना बदलू पाहाताहेत.", असे 'ऑर्गनायझर'ने तेव्हा म्हटले होते. ३० नोव्हेंबर १९४९ च्या 'ऑर्गनायझर'च्या अंकात तर तसा थेट अग्रलेख आहे....

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे महामानव.* डॉ.श्रीमंत कोकाटे------------

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे महामानव.*                                            ----------------------------- - डॉ.श्रीमंत कोकाटे -----------------------------                      डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे *विद्वान* होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण संपादन केले.  ते अमेरिकेत गेले आणि पीएच.डी. झाले. ते इंग्लंडला गेले *बॅरिस्टर* झाले. त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.                         डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले. त्यांच्या जीवनात अनेक संकटं आली परंतु ते डगमगले नाहीत, निराश झाले नाहीत. त्यांनी हिमतीने संकटावर मात केली. संकटंसमयी ते रडणारे नव्हते, तर लढणारे होते. ते संकटाला...