पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

युवा नेते डॉ . सार्थक हिट्टी यांची जिल्हा परिषद साठी मोर्चे बांधणी युद्धपातळीवर...

इमेज
जत /PSK NEWS NETWORK   जत तालुका पूर्व भागाचे भाजपाचे युवा नेते व भाजपा वैद्यकीय सेलेचे जिल्हा अध्यक्ष स्त्रीरोग तज्ञ डॉ . सार्थक हिट्टी यांची माडग्याळ जिल्हा परिषद गटासाठी मोर्चा बांधणी  युद्धपातळीवर सुरू आहे.  आईवडिलांचे संस्कार आणि आपली सामाजिक धडपड यातुन  सामाजिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात नाव  अगदी कमी वयात मिळवत आज तालुक्याच्या राजकारणात एक युवा नेतृत्व सार्थक हिट्टी यांच्या रुपाने लाभले आहे. जत  तालुका हा मागास तालुका म्हणून गणला जातो,  दर सहा महिने भीषण पाणी टंचाई असते, अशा दुष्काळी जत तालुक्यात समाजसेवा करणे म्हणजे फारचं जबाबदारीचे काम आहे . मात्र जत तालुक्याच्या या जनतेच्या मदतीला आणि जनसेवा करण्यासाठी धावणारा युवा नेता अशी आपली ओळख निर्माण केली, आपल्या  युवा मंच आणि युथ फाऊंडेशन माध्यमातून या जि.प जाडरबोबलाद मतदार संघात आपल्या समाजसेवेची छाप उमटवली आहे .  गेल्या काही वर्षी पासून डॉ .सार्थक हिट्टी या भागामध्ये अनेक सामाजिक, वैद्यकीय , शैक्षणिक या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे . आणि भागीरथी पतसंस्थाच्या माध्यमा...