युवा नेते डॉ . सार्थक हिट्टी यांची जिल्हा परिषद साठी मोर्चे बांधणी युद्धपातळीवर...
जत /PSK NEWS NETWORK
जत तालुका पूर्व भागाचे भाजपाचे युवा नेते व भाजपा वैद्यकीय सेलेचे जिल्हा अध्यक्ष स्त्रीरोग तज्ञ डॉ . सार्थक हिट्टी यांची माडग्याळ जिल्हा परिषद गटासाठी मोर्चा बांधणी युद्धपातळीवर सुरू आहे.
आईवडिलांचे संस्कार आणि आपली सामाजिक धडपड यातुन सामाजिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात नाव अगदी कमी वयात मिळवत आज तालुक्याच्या राजकारणात एक युवा नेतृत्व सार्थक हिट्टी यांच्या रुपाने लाभले आहे. जत तालुका हा मागास तालुका म्हणून गणला जातो, दर सहा महिने भीषण पाणी टंचाई असते, अशा दुष्काळी जत तालुक्यात समाजसेवा करणे म्हणजे फारचं जबाबदारीचे काम आहे . मात्र जत तालुक्याच्या या जनतेच्या मदतीला आणि जनसेवा करण्यासाठी धावणारा युवा नेता अशी आपली ओळख निर्माण केली, आपल्या युवा मंच आणि युथ फाऊंडेशन माध्यमातून या जि.प जाडरबोबलाद मतदार संघात आपल्या समाजसेवेची छाप उमटवली आहे .
गेल्या काही वर्षी पासून डॉ .सार्थक हिट्टी या भागामध्ये अनेक सामाजिक, वैद्यकीय , शैक्षणिक या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे . आणि भागीरथी पतसंस्थाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे . व तसेच भागीरथी सर्वाजनिक वाचनालय माध्यमातून अनेक युवकांना वाचन्यास प्रोत्साहन दिले आहे . डॉ . सार्थक हिट्टी युथ फाऊंडेशन भागीरथी उद्योग समूह व लायसन्स क्लब च्या माध्यमातून यांनी आज यांनी आजपर्यंत भरपूर काम केले आहे . जैष्ट नागरिक व युवका मधून डॉक्टाराना पसंती मिळत आहे . पाणीपोई , मोफत आरोग्य शिबिरे , यात्रे मध्ये मोफत औषध वाटप अशा विविध प्रकारच्या उपक्रम डॉक्टारानी राबविले आहेत . ग्रामीण भागामध्ये हिट्टी मलटिस्पेशालिटी हॉस्पिटल च्या माध्यमातून डॉ.सार्थक हिट्टींनी अद्ययावत असे तालुक्यातील प्रथम 3d /4d सोनोग्राफी सेंटर चालू केले . अत्यावश्यक रुग्णासाठी ब्लड स्टोरीज सेंटरची उभारणी केली . नवजात बालकासाठी अतिदक्षता विभागाची सुरुवात केली .
तालुक्यातील प्रत्येक सुख दुःख च्या कार्यक्रमा मध्ये आवर्जून उपस्थित राहत आहेत .
डॉ . सार्थक दादा हिट्टी युथ लीडर, डॉ .सार्थक दादांनी 2012 साली युथ फाऊंडेशन सुरू केले आणि 2014 साली युवा मंच स्थापन करून आपल्या सामाजिक कार्याची झालर जत पूर्व भागात पसरवली आहे . त्यामुळे युथ लीडर डॉ . सार्थक दादांनी त्यांच्या कार्याकडे पाहिले तर दुष्काळी भागात झोकून काम करणारा खरा आणि सच्चा युथ लीडर म्हणून संपूर्ण तालुका डॉ . सार्थक हिट्टी यांच्याकडे पाहत आहे. पक्षामधील चांगली पकड व आपल्या प्रभाव मुळे डॉक्टारांच्या मागे मोठी युवकांची ताकद निर्माण झाली आहे . येत्या सांगली जिल्हा परिषदासाठी डॉ . सार्थक हिट्टी यांना सर्व स्थरातून पसंती मिळताना दिसते आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा