पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब साळूंखे यांचा कोविड योद्धा म्हणुन राज्यपालांच्या हस्ते गौरव.

इमेज
प्रतिनिधी माडग्याळ व्हसपेट ता.जत चे सुपुत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक (मुंबई कांदिवली स्टेशन) बाबासाहेब साळूंखे यांचा कोविड योद्धा म्हणुन राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला.व्हसपेट गावचे माजी सरपंच श्री नामदेव तुकाराम साळुंखे यांचे हे चिरंजीव  असुन सन १९९०/९१ बॅच चे पोलिस अधिकारी आहेत,गेली ३० वर्ष पोलीस अधिकारी म्हणुन मुंबई करांची सेवा केली. साळुंखे साहेबांनी ज्या -ज्या पोलीस स्टेशन व विभागात काम केले त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट व जनते मध्ये लोकप्रिय अधिकारी म्हणुन ओळख आहे,  असा हा लोकप्रिय अधिकारी कोविड काळात लोकांना सेवा देत असता कधी स्वत: ला  कोरोणा झाला समजलं पण नाही. पण जनतेचं प्रेम , मुंबई वाशियांना दिलेली सेवा कामी आली , व या कोरोणा सारख्या भयानक परिस्थिती शी दोन हात करत यातुन सुखरूप बरे झाले , कोविड  काळात  स्वत:चा व वेळेचा विचार न करता चोख बंदोबस्त ठेवला, लोकांची , कर्मचारी वर्गाची , अधिकारी यांची काळजी घेतली, कोरोणा रुग्णांना मदत केली, गोर गरीब जनतेला अन्न धान्य वाटप व इतर मदत केली, इतर राज्यातील लोकांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी या लो...

ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या खर्चाची माहिती वेळेत सादर न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.तहसीलदार सचिन पाटील

इमेज
जत / जत तालुक्यातील दि.१५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत झालेल्या खर्चाची माहिती निवडणूक निकाल  लागल्यापासून एक महिन्याच्या आत म्हणजे बुधवार दि.१७ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंतच  उमेदवारानी निवडणूक विभागाकडे सादर करावी वेळेत निवडणूक खर्चाची माहिती सादर  न केल्यास सबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहीती निवडणूक अधिकारी तथा  जतचे तहसिलदार श्री. सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.     त्यानी पत्रकात म्हटले आहे की,जत तालुक्यात दि.१५/१/२०२१ रोजी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत .त्या ग्रामपंचायतीमध्ये ज्यानी उमेदवार म्हणून सहभाग घेतलेले आहेत.त्या सर्व उमेदवारांनी दि.१८ जानेवारी २०२१ निवडणूक निकाल झालेपासून एक महिन्याच्या आत म्हणजेच बुधवार दि.१७ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंतच निवडणूक खर्चाची माहिती  देण्याची आहे.  तसेच शासनाचे ट्रू व्होटर अॅप वर निवडणूक खर्चाची माहिती नमुना नंबर १/२/३/४मध्ये भरून त्याची प्रत आरओ/एआरओ यांच्या मार्फत तपासणी अंती आरओ यांच्...