मुंबई ला ..!!
मुंबई ला ..!! बँकेच्या ट्रेनिंग साठी मुंबई ला जात असताना,माझ्या आईला आणि बायकोला सांगून घरातून बाहेर पडलो.. जस जशी बस तालुक्याच्या दिशेने धावु लागली... तेंव्हा...................... मला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहीली हे गाणं आपोआपच माझ्या ओठात घोळु लागलं .. खरंच कवींनी त्या कवितेतील नायकाच्या मनातील खेळ, त्याच्या भावना,त्याची होणारी घालमेल यांच अगदी हृदयस्पर्शी वर्णन केलय... अगदी ... माझ्या मनाची ...... माझी मैना गावावर राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || ओतीव बांधा | रंग गव्हाळ | कोर चंद्राची | उदात्त गुणांची | मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची | हसून बोलायची | मंद चालायची | सुगंध केतकी | सतेज कांती | घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची | काडी दवन्याची | रेखीव भुवया | कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हि-याची | काठी आंधळ्याची | तशी ती माझी गरीबाची | मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण | नसे सुखाला वाण | तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || धन्य ते शाहीर... लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला कोटी कोटी प्...