पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पांडोझरी येथे गरजू १०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

इमेज
संख प्रतिनिधी  मिलींद टोणे  जत तालुक्यातील पांडोझरी येथे आज मा. श्री. तम्मण्णगौडा रवि पाटील माजी सभापती  जि. प. सांगली, गुरुबसव पाटील( सर) ,चंद्रकांत गुड्डोडगी भाजपा तालुका अध्यक्ष, डॉ. रवींद्र आरळी यांच्या संयुक्त सहकार्याने जत तालुक्यातील पांडोझरी येथे गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे किट वाटप केले .त्यामध्ये तेल, निरमापावडर, तांदूळ, गहू ,साखर, चहापावडार, आशा आनेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.                        कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने गोरगरीब आणि कामगार यांच्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व कामे बंद असल्याने मोल मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरातील लागणारे अन्नधान्य संपत आले आहे.  माणुसकी दाखवत पांडोजरी गावांतील युवा तरूनानी पुढाकार घेत यांनी अन्न धान्यचे किट वाटप केले आहे. यावेळी लोकांच्या गैरसोयीचा विचार करुन पांडोझरी गावात १००गोरगरीब कुटुंबना जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप केले व गरीब लोका...

उद्योगपती चंद्रकांत सांगलीकर यांच्यावतीने जत तालुक्यातील गोरगरिब जनतेची जीवनावश्यक वस्तूंची गरज भागावी यासाठी जत तालुका प्रशासनाला जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले

इमेज
जत: प्रतिनिधी. उद्योगपती चंद्रकांत सांगलीकर यांच्यावतीने जत तालुक्यातील गोरगरिब जनतेची  जीवनावश्यक वस्तूंची गरज भागावी यासाठी जत तालुका प्रशासनाला जीवनावश्यक   वस्तुंच्या  किटचे वाटप करण्यात आले . या बाबत सविस्तर माहिती अशी की जत तालुका हा दुष्काळी तालुका असल्याने व या तालुक्यातील बहुतांशी लोक हे  ऊसतोडीसाठी व अन्य कामासाठी बाहेरच्या राज्यात जात असतात. त्यातच जत तालुक्यात  कोणत्याही प्रकारचे उद्योगधंद्याचे साधन नाही. त्यामुळे या तालुक्यातील बहुतांशी लोक हे बेरोजगार आहेत.  सद्या जगभर फैलावलेल्या कोरोनारूपी महामारीमुळे जगाची व देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. त्याचा देशातील सर्वच राज्यानाही फटका बसला आहे.  जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील गुगवाडचे भूमिपूत्र व उद्योगपती, सी. आर. सांगलीकर ग्रुपचे सर्वेसर्वा चंद्रकांत सांगलीकर यानी जत तालुक्यातील गोरगरिबांना वाटप करण्यासाठी साडेसहाशे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्याचे ठरवून आज जतचे तहसिलदार श्री. सचिन पाटील यांच्याकडे शंभर जीव...

पिग्मी ऐजंटावर उपासमारीची वेळ

माडग्याळ/प्रतिनिधी: कोरोना विषाणु संसर्गामुळे संपुर्ण जग भयभयीत झालेले असुन संपुर्ण जगात खूप मोठे संकट निर्माण झालेले आहे.याच पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाऊन चालू असल्याने सर्व व्यवसाय,व्यवहार बंद आहेत. त्यामुळे दररोज मिळणारी पिग्मी बंद झाली आहे.तसेच पतसंस्थाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पिग्मी एजंटावर उपासमारीची वेळ आली आहे.जगणे अवघड होऊन बसले आहे सर्व व्यवसाय ठप्प बंद आहेत. अशात पिग्मी एजंटाच्या कुटुंबातील मुलांबाळांना जगवताना तारेवरची कसरत करावी लागतेय ''काम नाही दाम नाही खायचे काय" असा प्रश्न निर्माण झालेला आहे.  अशा पिग्मी एजंटावर ऊपासमारीची वेळ निर्माण झालेली असताना अशा अवस्थेत असे पिग्मी एजंट जगवणे आवश्यक आहे. पतसंस्था आणि छोटे-मोठे व्यवसाय हे पिग्मी एजंटाच्या विश्वासावर चालतात. असे व्यवसाय टिकवण्यासाठी त्याना आधार देणे आवश्यक आहे. शासन सर्वच घटकांना प्रामाणीकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करतेय याचा  सार्थ आभिमान तर आहेच पण याच  पद्धतीने पिग्मी एजंटाना सुद्धा आपण माणूसकीच्या भावनेने बघून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेल्या बांधवाना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा....

गटप्रवर्तक महिलांनाही प्रोत्साहन भत्ता द्या - कॉम्रेड हनुमंत कोळी*

 माडग्याळ प्रतिनिधी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिला जीवाची जोखीम पत्करून ऊन,वार तहानभूक विसरून काम करत आहेत. त्यांच्या कामाचे महत्त्व आता शासन प्रशासनाला पटले आहे मात्र त्यांच्या तुटपुंज्या मानधनाकडे लक्ष कधी जाणार गटप्रवर्तक महिला आशांची दुर्दशा कधी थांबणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोना ने डोके वर काढल्यापासून आरोग्य यंत्रणा प्रशासनाची धावपळ सुरू आहे जिल्ह्यात २० मार्चपासून आशा वर्कर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. कोरोनाविरोधातील युद्धात हे सैन्यच सुरुवातीपासून आघाडीवरराहून काम करत आहेत विदेशातून अन्य राज्यातून अन्य जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तिची माहिती घेणे व ती तात्काळ आरोग्य यंत्रणेला कळवणे त्यांना होम क्कारंटाईन करणे रोज घरी भेट देऊन माहिती घेणे स्थानिक लोकापैकी कोण आजारी असतील तर त्यांची माहिती आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याचे काम आशा वर्कर करत आहेत. त्यामध्ये गटप्रवर्तकांचे नियोजन रिर्पोटिग अतिशय महत्त्वाचे ठरत आहे.   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार आशा वर्करना १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळत आहे गटप...

*शिवनेरी स्टोन क्रशर चे मालक प्रकाश जमदाडे यांनी केले जिवनावश्यक वस्तुंचे वाटप*

इमेज
प्रतिनिधी माडग्याळ केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक, तसेच मार्केट कमिटीचे माजी सभापतीप्रकाश जमदाडे यांनी  व्हसपेट ता.जत येथे 140 कुठुंबाना  जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. कोरोणा सारख्या विषाणु मुळे घातलेल्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून प्रकाश जमदाडे यांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये असे जिवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप केले आहे, व्हसपेट ता.जत येथे प्रकाश जमदाडे यांचे शिवनेरी स्टोन क्रशर ची साईट आहे, त्यामुळें व्हसपेट ता जत येथील जनतेशी त्यांचा जास्त संपर्क आहे, तसेच ,सक्रिय राजकारणात ही येथील लोकांशी जास्त संपर्क असतो.त्यामुळे आपले एक कर्तव्य म्हणून या जिवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यात येत आहेत. यावेळी जमदाडे म्हणाले की, कोरोणा  या वायरस ने जगभर थैमान घातले असताना, सामान्य लोकांच्या रोजीरोटीचा खुप मोठा प्रश्न निर्माण झाला असुन , याकाळात या गरीब लोकांना मदत करणे हे आमचे कर्तव्यच असुन ते आम्ही करत आहोत , पुढे म्हणाले की , अशा भयानक महामारीच्या काळात राजकीय हेतु न ठेवता , पुढारी लोकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असुन, एक सामाजिक बांध...

यंदाची महात्मा बसवेश्वर जयंती घरीच होणार...शरण एम.जी.काराजणगी

इमेज
खोजनवाडीत समता मानव विश्वगुरु जग ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती गेल्या 27 वर्षे राष्ट्रीय बसव दल वतीने भव्य दिव्य मेरवनिक यंदा करना मुळे होणे शक्य नाही.  कारण शासनाच्या आदेश पालन करत घरीच बसव जयंती साजरी करणार आहे समाज मध्ये शक्य तेवढे गरजु लोकांना मदत करुन बसव  दासोह तत्व पालन करावे. असे आवाहन अध्यक्ष शरण एम. जि. काराजनगी सांगितले आहे

* एका निर्जीव विषाणूने संपवली माणुसकी....*कर्नाटक मधील ....गावाने हाकलले आपल्याच गावच्या उसतोड मजुरांना..*व्हसपेट ता.जत येथील गावकऱ्यांनी केली...जेवन पाण्याची व्यवस्था*उसतोड मजुरांचे डोळे आले भरुण.

इमेज
प्रतिनिधी माडग्याळ/25(सचिन झेंडे) कोरोणा विषाणू ने घातलेल्या जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील चडचड जवळ असलेल्या बरडोली गावातून 62 उसतोड मजूरांना आपल्याच गावातुन   हाकलून काढले असल्याची, मानवतेचा चक्का चू्र्ररर करणारी घटना गुरुवार ता.23 रोजी घडली.माणसातील माणुसकी नावाची गोष्ट संपल्याचे वास्तव चित्र एकिकडे दिसत असताना त्याचवेळी व्हसपेट ता.जत येथील युवकांनी माणुसकी ह्या शब्दां वरील  विश्वास आणखी द्रढ बनवला.  झाला प्रकार असा की, कर्नाटक राज्यातील उसतोड कामगार हे, शिरोळ कोल्हापूर येथील दत्त साखर कारखान्या साठी उसतोड करत होते,सर्व काही सुरळीत चालू होते, पण  त्यातच कोरोणा सारख्या महाभयानक  राक्षसाने जगभरात थैमान तर घातलेच पण भारतात ही अतिशय वेगाने एंट्री मारत येथील जनजीवन विस्कळीत केल्याची परिस्थिती आपण सर्व जन अनुभव त आहोतच...या विषाणूला रोखण्यासाठी आपल्याकडे लॉकडाऊन हाच पर्याय असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याची परिस्थिती असताना हे उसतोड मजूर जवळपास एक महिना महाराष्ट्रातच कोल्हापूर शिरोळ येथेच थांबणे भाग पडले, त्यात महाराष्ट्र सरकारन...

स्वरा संग्रामे हिचे मंथन राज्यस्तरीय गुणवत्ता परीक्षेत यश

इमेज
सावळज /दि२२  मंथन प्रज्ञाशोध परीक्षा २०२० ची राज्यगुणवत्ता यादी मंथनच्या वेबसाईटवरुन प्रसिद्ध झाली. राज्यातील  विविध केंद्रावरुन घेण्यात आली होती. सावळज शाळा नं.२ ने या वर्षी सुध्दा गुणवत्तेची परंपरा कायम ठेवलेली आहे.   तासगाव तालुक्यातील सावळज शाळा नं.२ जिल्हा परिषद शाळेची इयत्ता दुसरीत शिकणारी कुमारी स्वरा सुधाकर संग्रामे हिने १५० पैकी १४० गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ६ वे स्थान प्राप्त केले आहे. तिने तिच्या यशाचे श्रेय वर्गशिक्षिका वासंती पाटील मॅडम, हसबे मॅडम,आई  ललिता ,वडील  सुधाकर व याआधी शिकविणार्‍या शिक्षकांना दिले आहे. मुख्याध्यापिका  बबुताई भोसले,केंद्रप्रमुख  पांडुरंग शिंदे , प्रकाश कांबळे  शिक्षण विस्तार अधिकारी यांनी मुलीचे अभिनंदन केले.  विविध अधिकारी वर्गाकडून शिक्षकांकडून , मित्रमैत्रीणींकडून व सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ग्रामपंचायत व्हसपेट जपतेय माणुसकीचा वसा

इमेज
  माडग्याळ/22एप्रिल2020 व्हसपेठ ता जत येथे सरपंच ग्रामसेवक व सदस्य  ग्रामपंचायत व्हसपेठ व हनुमान स्टील ट्रेडर्स व पवार ट्रान्स्पोर्ट यांच्या कडून गावातील गरजू व गरीब  दारिद्र्य रेषे खालील कुटुंबाना प्रत्येकी 1 किलो कांदा, बटाटू, टम्यटो, बाजरी 10 किलो तांदूळ 10किलो  वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्तिथ सरपंच राम साळुंखे. सदस्य मजीद नदाफ. अंबाजी वगरे सुरेश सनदी. अशा सेविका शशिकला सुतार, इ. उपस्तित होते.  कोविड 19 या विषाणू ने संपुर्ण देशात जगभरात थैमान घातले असताना, मणूष्य प्राणी मनात नसतात एकमेकांच्या पासुन दुरावले असल्याची परीस्थिती आपण अनुभवत आहोत, पण अशा या भयंकर जागतिक महामारीच्या परिस्थितीत ग्रामपंचायत व्हसपेठ ता जत चे सरपंच राम साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व्हसपेट गावचे, ग्रामसेवक हुसेन पटेल आण्णा यांच्या मार्गदर्शनाने सतत अन्नधान्य, भाजी पाला,माळवं अशा जिवनावश्यक वस्तू या गावातील गोरगरिबांना, तसेच  अनेक नडलेल्या  गावकऱ्यांना या जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गेले महिना भर चालू आहे,      सचिन झेंडे/९५६१६८२१५७ ...

कोसारी गावातील माजी सैनिकानी जपली सामाजिक बांधिलकी :कोरोना पार्श्वभूमीवर पोलिस मिञ म्हणुन गेली आठ कार्यरत. जनतेला सरकारी सूचनांचे पालन करण्याचे केले आवाहन.

इमेज
PSKNEWS NETWORK कोसारी /प्रतिनिधी . 21   चीन मध्ये उगम पावुण संपुर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोसारी गावातील माजी सैनिकानी जपली सामाजिक बांधिलकी तसेच गावातील जनतेसाठी आहोराञ प्रयत्न करत आहेत.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर कोसारी गावातील माजी सैनिक पोलिस मिञ म्हणुन गेली आठ दिवस सकाळी 8.00ते 11.00 आणि सायंकाळी 5.00ते 8.00 या वेळेत गावात काम करत आहेत. या कामात गावातील सर्व लोकांना चांगला संदेश मिळत आहे. यापासून लोकांनी सावधानता बागळली आहे.     कोरोनावर मात करण्यासाठी कोसारी ग्रामपंचायत तसेच माजी सैनिक आतोनात प्रयत्न करत आहेत. यामध्ये नानाजी संकपाळ (मेजर)टोपाजी तोरवे,वसंत काळे,वसंत सकट,नारायण भोसले,प्रकाश साळे,प्रल्हाद कुंभार,आप्पासो साळे,तानाजी भोसले,हरिदास  सांगोलकर,बाळासाहेब टेगंले,वसंत चव्हाण,तुकाराम माने,भीमराव तोरवे,रत्नापा कुंभार,यशवंत सकट,रघुनाथ  साळे,बाबासाहेब भोसले,मच्छीद्र  भोसले आदी माजी सैनिक गेली काही दिवस जत पोलिस स्टेशन,विक्रम फाऊंडेशन जत आणि कोसारी ग्रामपंचायत कोसारी यांच्यावतीने सर्व माजी सैनिक वि...

व्हसपेट ता. जत येथे ग्रामपंचायत कडून सँनिटायझर आणि मास्क वाटप

इमेज
PSKNEWS NETWORK प्रतिनिधी माडग्याळ/21 कोरोणा वायरस ने घातलेल्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील व्हसपेट  ता. जत येथे ग्रामपंचायत कडून सँनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत व्हसपेटचे सरपंच  रामचंद्र साळुंखे , ग्रामसेवक हुसेन पाटील ,सह गावचे सदस्य यांनी मिळुन ग्रामपंचायत समोर सोशल डिस्टंसिग पाळत काही नागरिकांना वाटप केले व नंतर आशा वर्कर यांच्या कडे मास्क व सँनिटायझर च्या घरपोच वाटपाची जबाबदारी देऊन त्यांच्या मार्फत या वस्तू गावातील प्रत्येक कुठुंबापर्यंत पोहच केले. तत्पूर्वी सरपंच राम साळुंखे यांनी गावातील नागरिकांना आवाहन केले कि, अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडु नये, व बाहेर जात असताना, मास्क नियमित मास्कचा वापर करण्यास सांगितले.

तुकाराम बाबा जत तालुक्यातील १५ हजार कुटूंबियांना देणार भाजीपाला

इमेज
 PSKNEWS NETWORK संख प्रतिनिधी/ मिलींद टोणे  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी जत तालुक्यातील गोरगरीब जनतेला मास्क, सॅनिटायझर, जिवणावश्यक किट बरोबरच घरपोच भाजीपाला देण्याचा अभिनव उपक्रम चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी सुरू केला आहे. तालुक्यातील पंधरा हजार कुटूंबियांना भाजीपाला देण्याचे नियोजन तुकाराम बाबा महाराज यांनी केले असून दररोज पाच टन भाजीपाल्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्यासाठी देशात, राज्यात लॉक डाऊन जाहीर केला. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वात प्रथम चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी पुढाकार घेत साडेसात हजाराच्या आसपास मास्कचे वाटप केले. पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यापर्यत थेट कार्यालयात जावून तुकाराम बाबा महाराज यांनी मास्कचे वाटप केले.  मास्क वाटप करताना समाजातील गोरगरीब जनता उपाशी राहणार नाही याची दक्षता घेत शक्य आहे तेवढयांना गहू, तांदूळ, तेल व अन्य किराणा माल असल...

मुंबईतील ५३ पत्रकारांना करोनाची लागण!

इमेज
PSKNEWS NETWORK/ मुंबई,दि २०एप्रिल 2020 मुंबईत करोनाचे विषाणू चे अनेक हॉटस्पॉट तयार होत असून येथील प्रत्येक घडामोडीचे अपडेट्स महाराष्ट्र भर  पोहचवण्यासाठी सतत धडपडत असणाऱ्या विविध  माध्यमांमधील पत्रकार आणि कॅमेरामन्सनाही करोना विषाणू ने गाठले असल्याचे  माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या व्यापक तपासणी त स्पष्ट झाले आहे , मोहिमेनंतर  अहवाल प्राप्त झाले असून त्यात मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन मिळून ५३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध पत्रकार संघटनांच्या विनंतीवरून मुंबई महापालिकेच्या वतीने माध्यम प्रतिनिधींसाठी करोना चाचणी मोहीम घेण्यात आली होती. पालिकेच्या आरोग्य पथकाने एकूण १६८ जणांचे स्वॅब नमुने घेतले होते. यापैकी बहुतांश नमुन्यांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात ५३ जणांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आढळले आहेत तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. करोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर व पत्रकारांचा समावेश आहे. यात ज्यांच्यात तीव्र लक्षणे आहेत त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर सौम्य ...

अखेर सांगली शहरातील रुग्ण कोरोणा बाधित रुग्ण मयत....हॉस्पीटलच्या वैद्यकीय पथकाने केले शर्तीचे प्रयत्न..पण शेवटी सारे व्यर्थ

इमेज
PSKNEWS NETWORK  / April 19, 2020 सां गली :   सिव्हील हॉस्पीटल   मिरज मध्ये  उपचार घेत असणाऱ्या विजयनगर, सांगली येथील कोरोना बाधित  व्यक्ती निधन  पावली असुन , परीसरात भीतिचे वातावरण  पसरले आहे. हि मयत व्यक्ती 17 एप्रिल पासून कोविड हॉस्पीटल मिरज येथे उपचार घेत होती. या व्यक्तीवर उपचारासाठी हॉस्पीटलच्या वैद्यकीय पथकाने शर्तीचे प्रयत्न केले. तथापि आज सायंकाळी नुकतेच या व्यक्तीेचे निधन झाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली झाल्या घटनेेेने परीसरात हळ हळ व्यक्त होत आहे.

सांगली शहरात कोरोना ....विजयनगर येथील बँक कर्मचाऱ्यांस लागण .....सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची माहिती

इमेज
साांगली/दि.19,एप्रिल 2020 सांगली शहरातील  विजयनगर येथे राहणारा 47 वर्षाचा युवकास कोरोणा ची लागण  झाली असुन हा रूग्ण  एका सहकारी बँकेत नोकरी करत असल्याचे समजते या  इसमास निमोनिया चा त्रास जाणवू लागल्याने  १७ एप्रिल रोजी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते , दरम्यान त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे प्रशासनाने आपल्या हालचाली गतिमान करत सदरचा रुग्ण ज्या विजयनगर भागात राहतो तो संपूर्ण भाग सिल केला आहे. इस्लामपूर येथील एकाच कुटुंबाशी संबंधित २६ रुग्ण कोरोना बाधित होते. त्यापैकी २५ रुग्णांची अंतिम चाचणीही निगेटिव्ह आली असल्याने प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला होता , व शहरात  शिथिल वातावरण होईल अशी आशा असतानाच  सांगली शहरांमध्ये नवा कोरोना बाधित  सापडल्याने सांगली शहर वाशिय  तसेच जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे,  संबंधित व्यक्तीच्या घरातील व इतर संपर्कात  आलेल्यांंची  ...

दोन लहान मुलांसह आई ने केली आत्महत्या... जत तालुक्यातील नवाळवाडी येथील घटना

इमेज
  PSKNEWS NETWORK जत :. नवाळवाडी   ता .  जत येथील ,32 वर्षीय महीलेेने लल  आपल्या दोन लहान मुलासह विहरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  गुरुवारी घडली  बेबीजान इब्राहिम नदाफ वय.वर्ष ३२,जोया इब्राहिम नदाफ (वय 5),सलमान इब्राहिम नदाफ (वय 3)असे मुत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.बेबीजान यांचे कर्नाटकातील विजापूर हे माहेर आहे.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. .                                                                           .              Aviva Life

गुगवडमध्ये गरजून जीवनावश्यक वस्तूचे वाटप

इमेज
 माजी सरपंच शमशुद्दीन किरणगी यांचा उपक्रम गुगवड वार्ताहर:-कोरोनामुळे आढचणीत आलेल्या नागरिकांना मदत म्हणून गुगवड ता.जत येतील माजी उपसरपंच शमशुद्दीन मिरसो किरणगी यांच्या कडून सुमारे 100 गरजूंना व विधाव महिलांना एक हजार रुपये किमतीचा जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले नागरिकांना मदतीचा हात दिल्याने समदान व्यक्त होत आहे.यावेळी इकबाल किरणगी गँगप्पा कोंकणी.मल्लिकार्जुन अंदानी. बंदगी मुल्ला.अन्नप्पा अंदानी.सलीम नदाफ. उपस्तीत होते AVIVA LIFE INSURANCE

जे का रंजले गांजले,त़या सि म्हणे जो आपुले,तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा....ह.भ.प तुकाराम महाराज एक समाजसेवक

इमेज
सचिन झेंडे/ 09एप्रिल,2020 जे का रंजले गांजले,त़या सि म्हणे जो आपुले,तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा॥ जगदगुरु तुकोबा रायांच्या या दोह्य प्रमाणे ह.भ.प तुकाराम बाबा महाराज अविरत पणे रंजले गांजलेल्या गोरगरिबांची मदत करत आहेत. अगदि कोणत्याही नैसर्गिक आपत्ति मध्ये तुकाराम महाराज हे त्या ठिकाणी आपला मदतीचा हात पुढे असतो ,त्यांच्या या कृतितुन  मानव समाजवरील अस्सीम प्रेम ,आपुलकी,काळजि यांचे वारंवार दर्शन घडते.त्यांच्या या समाजसेवी स्वभावामुळे हे पुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रशिद्ध व्यक्तिमत्व आहे. दुष्काल परिस्थिति,पुर परिस्थिति,किंवा अन्य कोणतीही नैसर्गिक आपत्ति येवो, त्या ठिकाणी तुकाराम महाराज धाऊन येतात. आणी आता सुध्दा या कोरोणा परीस्थितत तुकाराम बाबा महाराज गावोगावी जावुन गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तु वाटप करत आहेत ,पुर्ण भारत लॉकडाऊन असताना गोरगरीब जनता ,हातावरचे पोट असनारे, गरीब भटक्या जमातीतील लोकांचे एकवेलच्या जेवनाची  झाली असल्याची परीस्थित असताना , परीस्थितचे गांभीर्य  लक्षात घेत  तुकाराम बाबा महाराज यांनि आपले मदत कार्य अविरत चालु ठेवले आहे. या मदती सोबत बंदोबस्त स...

विश्वरत्न डॉ.आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी हॅप्पी हेल्प फौंडेशनच्या वतीने मिरज शासकीय रुग्णालयात कंत्राटी कामगारांना रेशन वाटप करण्यात आले ================================

इमेज
*सांगली :-  कोरोना विषाणूने जगात थैमान घातले असून अखिल मानवजातीलाच आव्हान देणाऱ्या या विषाणूचा सामना करण्यासाठी अजैविक युद्धात कोरोनाला हरविण्यासाठी भारत सरकारने ०३ मे पर्यंत कर्फ्यु लागू केला आहे पण त्यामुळे ज्यांचे हातावरचे पोट आहे अशा गरजू लोकांना तसेच काही पर राज्यातून कामासाठी आलेले लोक बिहार,उत्तर प्रदेश व राजस्थान असेल अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांचे कामबंदी झाल्याने उपासमार होत आहे अशा वंचित लोकांना सगळीकडे संचारबंदी असताना   संस्थेच्या वतीने  संस्थेने मोलाचा वाटा उचलला आहे.*  *मिरज शासकीय रुग्णालयात साफसफाई कामगार यांना आमच्या संस्थेच्या वतीने फुल ना फुलाची पाकळी म्हणून रेशन वाटप करण्यात आले. कार्यक्रम चे स्वागत व प्रस्थावना संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत कदम यांनी केले* *यावेळी मिरज शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय चे अधिष्ठाता मा. डॉ. सुधीर,  ननंदकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे मिरज अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर, जिल्हा अध्यक्ष चतुर्थ श्रेणी  महासंघ संजय व्हनमाने, मिरज सिव्हिल च्या अधिसेविका वंदना शहाणे, डॉ.रुपेश शिंदे, हॅप्पी ह...

जत तालुका सरपंच परिषदे कडून पंचायत समिती व एम.एस.ई.बी. कर्मचाऱ्यांना सॕनिटायजर वाटप ...जत गटविकास अधिकारी यांनी केले सरपंच परिषदेचे अभिनंदन

इमेज
जत/ 15, एप्रिल 2020  कोरोना जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सरपंच परिषद, ता.जत यांच्या कडुन पंचायत समिती येथील अधिकारी व कर्मचारी यांना सॕनिटायजर, मास्क व वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना सॕनिटायजर वाटप केले.  यावेळी जत पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, सरपंच परिषदचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील, कुंभारी सरपंच राजाराम जावीर, बसर्गी उपसरपंच किशोर बामणे, विस्तार अधिकारी मनोज जाधव, श्री संकपाळ, वीज मंडळाचे सुनिल माने, सुनिल बंडगर, महेश शिंदे, महालिंग माळी यांच्या सह पंचायत समिती व वीज मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.  यावेळी बोलताना गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर म्हणाले की, जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करत आहेत, व आपण नक्कीच येत्या काही दिवसात यावर विजय मिळवु असा विश्वास व्यक्त केला, तसेच सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. PSK.BLOGSPOT

सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा , अन्यथा गुन्हा 5000/- रु दंडाची करण्यात येईल

इमेज
प्रेस नोट ता :- 14/04/2020  दिनांक १४/०४/२० रोजी उमदी पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरलेने एकूण 17 लोकावरती 188 प्रमाणे  गुन्हे  दाखल करण्यातआले आहेत तसेच बाहेरून आलेल्या ०७ लोकावरती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51 व कोव्हिडं -19 उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे एकूण गुन्हा दाखल करून त्यांना होंमकॉर्टिन करण्यात आले आहे यापुढेही अश्या प्रकारची करण्यात येईल व कोणीही आवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये व सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा अन्यथा गुन्हा दाखल करून कोर्टात खटला पाठवून 5000/- रु दंडाची करण्यात येईल तरी पोलिसांकडून सर्वांना आवाहन आहे की जिथे असाल तेथेच रहा कोणीही कोठेही फिरू नका व तोंडाला मास्क व हातामध्ये हॅन्डग्लोज वापरा सदर बातमी आपले लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध होण्यास विनंती आहे  API kolekar Umadi PS

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

इमेज
जत /14 एप्रिल 2020 जत शहरात सोशल डिस्टंसिग पाळत , विश्वरतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जत चे तहसीलदार सचिन पाटील ,जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके, वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे,आर पी आय (आ.)जि.अध्यक्ष संजय कांबळे, अशोक नाना कांबळे,हणमंत कांबळे गुरुजी,शरण जाविर ,पदम उमराणी,प्रशांत झेंडे, शिराज शेख,  आदी उपस्थित होते. यावेळी पो.निरिक्षक रामदास शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व या कठीण परिस्थितीत प्रशासनाच्या सर्व सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.   जगभरात कोरोणा विषाणू ने थैमान  घातले असुन , भारतात सुद्धा तितक्याच वेगाने हि साथ पसरत असताना दिसते आहे , कोरोणा विषाणू रोखण्यासाठी संपूर्ण भारतात अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन आहे, त्यामुळे देशातील सण उत्सवावर बंधन आल्यचे दिसते आहे, यातच संपूर्ण जगभरात आनंदाने वाजत गाजत होणारा सण म्हणजे 14 एप्रिल, विश्वरतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , पण यावेळी महाभयानक संकट जगभर पसरल्याने,  देशातील सर्व भीमबांधवानी प्रशासनाने केलेल्या आवाहनास ओ देत महामानव ...

जत तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर येऊन पोहोचला कोरोणा.........विजापुरात सहा जण कोरोना बाधित, सीमेवरील जत पूर्वभागात खळबळ

इमेज
PSKNEWS.BLOGSPOT जत / 13 एप्रिल 2020 जत पासुन जवळपास 50 कि.मी. अंतरावर असणाऱ्या कर्नाटक मधिल विजापूर शहरात एका महिलेसह सहाजणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे , जिल्हाधिकारी एस. वाय. पाटील यांनी जाहीर केले आहे. शहरातील छप्परबंद गल्लीत राहणाऱ्या ६० वर्षांच्या एका महिलेसह सहाजणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर विजापूर सीमेच्या काही अंतरावर असलेल्या जत पूर्वभागात खळबळ उडाली असून आरोग्य आणि पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा बंद करण्यात आले आहेत.  कोरोना बाधित महिला विजापुरातील छप्परबंद गल्लीत  एकत्रित कुटुंबात राहात होती. कुठुंबात एकुण 25 सदस्य असल्याची माहिती मिळते,  त्यामुळे घरातील इतर लोकांनाही कोरोनाची लागण झाली असेल का? असा प्रश्न परीसरातील नागरिकांना पडला आहे. आजवर विजापूर जिल्हयातून पाठविलेल्या ११० जणांपैकी ८१ जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या त्या महिलेस श्वासोच्छश्वास घेण्यास त्रास होत होता. ति...

कोरोना-19: लॉकडाऊन मुळे बांधकाम कामगार व किरकोळ विक्रत्यावर उपासमारीची वेळ

इमेज
कोरोना-19: लॉकडाऊन मुळे बांधकाम कामगार व किरकोळ विक्रत्यावर उपासमारीची वेळ   जत /दि.12.04.2020   *सध्या जत तालुका हा सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात मोठा आहे या जत तालुक्याने देशा मध्ये कोणत्याही संकट समयी भरभरून दानशूर व्यक्तीनी मदत करत असतात पण आज याच जत तालुक्यातील बांधकाम कामगार,किरकोळ विक्रते,हमाल,पानपटी व्यवसायीक,तसेच शेतामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी,न्हावी बांधव,दुकान कामगार,अश्या विविध घटकातील कामगार बंधु व भगिनी या सर्वाच्यावर लॉक डाऊन काळात उपासमारीची वेळ आली आहे* *आपली तुटपुंजी कमाई असलेले बांधव 4 ते 5 दिवस कसेबसे आपला संसार हाकत असतात त्यात या कोरोनो मुळे देशात नव्हे तर जगातच हाहानकार माजलेला असल्याने सर्वच कामगार बंधु ना शासनाने किमान प्रत्येक कामगार च्या नावावर किमना आपला संसार घर गाड़ा चालन्या सारखे अनुदान शासनाने जमा करावी अशी मागणी सर्व सामान्य वर्गातुन होत आहे* *शासनाने जाहीर केलेली मदत ही महिन्याला एक व्यक्ती मागे 5 किलो तांदूळ देण्याची योजना केली आहे परंतु आजअखेर हे तांदूळ सुद्धा अजुन पोहचले नाही तसेच तांदूळ न देता डाळी, तेल,साखर,साबन अ...

सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी--- गृहमंत्री अनिल देशमुख

इमेज
सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी--- गृहमंत्री अनिल देशमुख      मुंबई दि.११- सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेस केले आहे.        कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून आपल्या राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. समाजमाध्यमाद्वारे या संदर्भात चुकीची माहिती, दहशत व भीती पसरविणाऱ्या बातम्या समाजात पसरू नयेत, कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक  पसरविलेल्या  संदेशांद्वारे जातीय तेढ निर्माण होऊ नये याकरिता शासनाने समाजमाध्यमांकरिता विशेष मार्गदर्शिका प्रकाशित केली असून त्याचे सर्वांनी पालन करावे असे श्री देशमुख यांनी म्हटले आहे. *मार्गदर्शिका प्रकाशित* सध्याच्या कोरोना महामारीच्या व संबंधित लॉकडाउनच्या काळात समाजमाध्यमांवर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यात प्रामुख्याने व्हाट्सअँपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज,पोस्ट्स पाठवून व महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्र...

सनमडी ता. जत येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी शिक्षक पोलीसांच्या ताब्यात

इमेज
माडग्याळ/ दि.12.04.2020 सनमडी ता. जत येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार   एका शिक्षकावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद माडग्याळ/वार्ताहर:-सनमडी ता. जत येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार  प्रकरणी एका शिक्षकावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अल्पवयीन मुलीने नराधम शिक्षकाने जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी संशयित शिक्षक सतिश अंकुश कांबळे( वय 38) रा.सनमडी यांच्याविरोधात उमदी पोलीस ठाण्यात  पोक्सो कायद्यानुसार  बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबधीत शिक्षक जत जवळ एका  प्राथमिक मराठी शाळेत शिक्षक असल्याचे समजते.तसेच तो शिक्षक सनमडी गावाचा माजी उपसरपंच होता व सध्या त्याची पत्नी गावाची ग्रामपंचायत सदस्य आहे.      पोलीसांनी दिलेली व घटनास्थळ वरून अधिक माहिती अशी , पीडित मुलगी ही अल्पवयीन असून दिनांक 09 एप्रिल रोजी दुपारी अल्पवयीन मुलीवर घरी कोणी नसल्याचे संधी साधून शिक्षकांने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेतील पिडीत मुलीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून शिक्षक सतिश कांबळे...