*शिवनेरी स्टोन क्रशर चे मालक प्रकाश जमदाडे यांनी केले जिवनावश्यक वस्तुंचे वाटप*

प्रतिनिधी माडग्याळ
केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक, तसेच मार्केट कमिटीचे माजी सभापतीप्रकाश जमदाडे यांनी  व्हसपेट ता.जत येथे 140 कुठुंबाना  जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. कोरोणा सारख्या विषाणु मुळे घातलेल्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून प्रकाश जमदाडे यांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये असे जिवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप केले आहे, व्हसपेट ता.जत येथे प्रकाश जमदाडे यांचे शिवनेरी स्टोन क्रशर ची साईट आहे, त्यामुळें व्हसपेट ता जत येथील जनतेशी त्यांचा जास्त संपर्क आहे, तसेच ,सक्रिय राजकारणात ही येथील लोकांशी जास्त संपर्क असतो.त्यामुळे आपले एक कर्तव्य म्हणून या जिवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यात येत आहेत. यावेळी जमदाडे म्हणाले की, कोरोणा  या वायरस ने जगभर थैमान घातले असताना, सामान्य लोकांच्या रोजीरोटीचा खुप मोठा प्रश्न निर्माण झाला असुन , याकाळात या गरीब लोकांना मदत करणे हे आमचे कर्तव्यच असुन ते आम्ही करत आहोत , पुढे म्हणाले की , अशा भयानक महामारीच्या काळात राजकीय हेतु न ठेवता , पुढारी लोकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असुन, एक सामाजिक बांधिलकी म्हणून  या जिवनावश्यक वस्तू वाटप करत असल्याचे सांगितले यावेळी, ग्रामपंचायत व्हसपेट चे सरपंच रामचंद्र साळुंखे, मजिद भाई नदाफ ,ग्रामसेवक हुसेन पटेल आण्णा  ,आर.पी.आय ता.अध्यक्ष श्रीकांत हुवाळे व आपत्ती व्यवस्थापन संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule