माडग्याळ करांनी पाहिला वर्दितला देवमाणूस....जत (उमदी) पोलीसांनी केले माडग्याळ मधील गरीब जनतेला जिवनावश्यक वस्तूंचे वाटप
माडग्याळ येथे पोलिसांनी येथील गरीब कुटूंबाना कुटुंब उपयोगी जिवनावश्यक साहित्य वाटप केले. यावेळी जत चे डि .वाय. एस .पी. श्री दिलिप जगदाळे ,उमदि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कोळेकर व माडग्याळ ठाणे अंमलदार बसवराज कोष्टि व इतर सहकारी पोलीस व ग्रामपंचायत माडग्याळ चे सरपंच आप्पासाहेब जत्ती इ.उपस्थित राहून प्रत्येक गरीबांच्या घरी जाऊन या वस्तु देण्यात आले. तत्पूर्वी डि .वाय. एस .पी. श्री दिलिप जगदाळे गावातील काही जबाबदार नागरिक व पत्रकार यांच्याशी बोलताना काही मार्गदर्शन पर सुचना केल्या व घरातुन बिनकामाचे बाहेर न पडुन. पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त केली . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन झाल्याने जिल्ह्यातील शेतमजुरांना हाताला काम नसल्याने रोजंदारीवर काम करनारे मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, शासनाने मोफत व सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्याची घोषणा करूनही अजून रेशन दुकानात धान्य पुरवठा सुरु झालेला नाही ग्रामीण भागात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करनारे शेतमजूर हाताला काम नसल्याने जिवनावश्यक वस्तू वि...