कोरोना पार्श्वभूमीवर कोसारी ग्रामपंचायतीने जपली सामाजिक बांधिलकी
कोसारी /प्रतिनिधी .दिनांक:30/03/2020.
मौजे कोसारी. ता .जत .येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोसारी ग्रामपंचायतीने जपली सामाजिक बांधिलकी. यामध्ये कोसारी ग्रामपंचायतीचे सरपंच /उपसरपंच /ग्रामसेवक /सदस्य आणि कर्मचारी व तसेच कोसारी सर्व सेवा सोसायटीचे सर्व संचालक मंडळ यांनी संपूर्ण कोसारी गावातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मोफत देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कोसारी व सर्व सेवा सोसायटीने कोरोना या रोगाचा प्रसार पाहुन जोपर्यंत कोरोना विषानुचा प्रादुर्भाव आहे तोपर्यंत संपूर्ण गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मोफत देण्यात आले आहे. तसेच पाणी घेऊन जाण्यासाठी योग्य रित्या काळजी घेऊन सुव्यवस्था जपण्यात आली आहे. संपूर्ण गावातून या आभिनव योजनेचे स्वागत /कौतुक करण्यात येतआहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा आणखी भरपूर काही उपाय योजना आखण्यात आल्या आहेत.गावात जास्त ठिकाणी माणसे बसतात अशा विविध ठिकाणी त्यांचे बंदोबस्त करण्यात आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा