जिल्ह्यात मोलमजुरांची उपासमार रेशनिंग चे धान्य १ एप्रिल पासून मिळाले पाहिजे- आरपीआय नेते संदेश भंडारे...... शासनाच्या घोषणांची अमलबजावणी तात्काळ करा


सांगली / प्रतिनिधी दिनांक ३० - जिल्ह्यातील  मोलमजुरांची उपासमार सुरु झाली असुन तत्काळ  रेशनिंग चे धान्य १ एप्रिल पासून मिळालेच पाहिजे अशी मागणी आरपीआयचे लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेश भंडारे यांनी केली. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन झाल्याने जिल्ह्यातील शेतमजुरांना हाताला काम नसल्याने रोजंदारीवर काम करनारे मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, शासनाने मोफत व सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्याची घोषणा करूनही अजून रेशन दुकानात धान्य पुरवठा सुरु झालेला नाही ग्रामीण भागात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करनारे शेतमजूर हाताला काम नसल्याने जिवनावश्यक वस्तू विकत घेऊ शकत नाहीत त्यामुळे अनेक घरात चुली पेटत नसल्याचे उघडकीस आले आहे. शहरी भागात काही स्वयंसेवी संस्था मोफत जेवण पुरवत आहेत परंतु ग्रामिण भागात गोर गरिबांना एक वेळच्या जेवणाची सोय होत नाही. तहसीलदार कार्यालयांमध्ये भाजीपाला विक्री व द्राक्षे फळे वाहतूकीसाठी परवाने देण्यासाठी विलंब लावला जात आहे, भाजी पाला विक्रेत्यांना वेठीस धरले जात आहे. 
तरी प्रशासनाने याबाबत तात्काळ उपाययोजना करून धान्य पुरवठा सुरु करावा अशी मागणी रिपाइंचे लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेश भंडारे यांनी केली.
                  आर.पी.आय नेते संंदेेेश भंंडारे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक