जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक
संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले. कोणा म्हणावे आपुले.
चेहरे हजार झाले.
तु पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत कारे.
भीमा तुझ्या मताचे माणसं मेलीत कारे ...! महाकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक
यांनी चळवळीतील कार्यकर्त्यां प्रती छान वर्णन केले आहे.
🙏
चालु असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक 2026, (12 जिल्हा परिषद आणि 125पंचायत समिती) संपूर्ण जिल्हा भर पाहीले असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की गेली पाच दहा वर्षे वेगवेगळ्या संघटना पक्ष सामाजिक संस्था या माध्यमातून चळवळीत असणारे कार्यकर्ते प्रामुख्याने यामध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात असणारे, जातीय वादी विखारी संघटना यांच्या विरोधात दंड थोपटुन काम करणारे नेते आणि कार्यकर्ते, आणि स्वतः ला बहुजन चळवळीतील कार्यकर्ता मानणारे नेते आणि पदाधिकारी नेमके या अशा वेळी नेहमी प्रमाणे शांत. पाहुन असा काही फार मोठा धक्का बसला नाही. चळवळीतल्या कार्यकर्त्यां कडुन हे अपेक्षित होतंच.
दुसरी गोष्ट बहुजन चळवळीतील कार्यकर्ते शांत बसले नाहीत ते आपल्याच समुदायातील लोकांना सोबत घेऊन जे लोक इतर वेळी आपला तिरस्कार करतात, सर्व सामान्य बहुजनांवर अन्याय करतात, (वैयक्तिक किंवा जात समुहा कडुन तथा त्यांच्या सामाजिक , राजकीय संघटना कडुन) अशा पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार प्रसारात ही मंडळी गुंतलेली दिसते.आणि ही परिस्थिती पाहता, पुन्हा एकदा वामनदादा कर्डक आठवतात....
*भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते, वाणीत भीम आहे,करणीत भीम असता , वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते....*
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचार करत असताना या गोष्टीची खंत वाटते आहे,की चळवळीत सक्रिय असणाऱ्या एकाही संघटनेला किंवा राजकीय पक्षाला ( *वंचित बहुजन आघाडी* ) सोडता , आपण हि निवडणुक लढवु शकतो किंवा आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला बळ देऊ शकु इतकाही आत्मविश्वास असु नये का ...
वैयक्तिक मी ज्या मतदार संघातुन येतो या मतदारसंघात पाहीले तर *धनशक्ती विरुद्ध धनशक्ती* असा संघर्ष सुरू आहे असे दिसते. जिल्हा परिषदेला व़ंचित आघाडी सोडली तर इतर पर्याय नाही, आणि पंचायत समितीला तिसरा पर्याय नाहीच .
एकुणच काय आत्ताची परिस्थिती पाहता लोकशाही दिवसेंदिवस खिळखिळी होत चालली आहे.पुढील काळात पैशाच्या आणि राजकीय ताकदिच्या जिवावर निवडणूका बिनविरोध झाल्या तर नवल असू नये.
तुर्तास एवढेच....
जय भीम 🙏
सचिन झेंडे ,मतदार,
जाडर बोबलाद मतदार संघ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा