माडग्याळ करांनी पाहिला वर्दितला देवमाणूस....जत (उमदी) पोलीसांनी केले माडग्याळ मधील गरीब जनतेला जिवनावश्यक वस्तूंचे वाटप


माडग्याळ  येथे पोलिसांनी येथील गरीब कुटूंबाना कुटुंब उपयोगी जिवनावश्यक  साहित्य वाटप केले. यावेळी जत चे डि .वाय. एस .पी. श्री दिलिप जगदाळे ,उमदि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कोळेकर व माडग्याळ ठाणे अंमलदार बसवराज कोष्टि व इतर सहकारी पोलीस व ग्रामपंचायत माडग्याळ चे सरपंच आप्पासाहेब जत्ती इ.उपस्थित राहून प्रत्येक गरीबांच्या घरी जाऊन या वस्तु देण्यात आले.

तत्पूर्वी डि .वाय. एस .पी. श्री दिलिप जगदाळे गावातील काही जबाबदार नागरिक व पत्रकार यांच्याशी बोलताना काही मार्गदर्शन पर सुचना केल्या व घरातुन बिनकामाचे बाहेर न पडुन. पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त केली .

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन झाल्याने जिल्ह्यातील शेतमजुरांना हाताला काम नसल्याने रोजंदारीवर काम करनारे मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे,  शासनाने मोफत व सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्याची घोषणा करूनही अजून रेशन दुकानात धान्य पुरवठा सुरु झालेला नाही ग्रामीण भागात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करनारे शेतमजूर हाताला काम नसल्याने जिवनावश्यक वस्तू विकत घेऊ शकत नाहीत त्यामुळे अनेक घरात चुली पेटत नसल्याची परिस्थिती दिसत आहे. शहरी भागात काही स्वयंसेवी संस्था मोफत जेवण पुरवत आहेत परंतु ग्रामिण भागात गोर गरिबांना एक वेळच्या जेवणाची सोय होत नाही. ही बाब लक्षात घेऊन ता. जत येथील माडग्याळ या गावी पोलिसांनी  गरीब कुटुंबाला धान्य व भाजीपाला ,वाटप करुन माणूसकीचे दर्शन करुन दिले आज माडग्याळ करांनी वर्दी मागच्या प्रेमळ , दयाळू , समाजाचे हित जपणारा समाजशील , आपल्या जनमानसा बद्दल आत्मियता असणाऱ्या चेहऱ्याचे दर्शन पहायला मिळाले ...

 तुमच्या कार्याला मनापासून सलाम..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule