माडग्याळ ता.जत येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरची गरज... जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी दिली अचानक भेट...वैद्यकीय अधिकारी व प्रभारी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी असे प्रांत अधिकारी जत यांना दिले पत्र
प्रतिनिधी माडग्याळ / माडग्याळ ता.जत येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी दिली अचानक भेट दिली असता रुग्णालयातील अधिकारी व अधिक्षक यांचा मनमानी कारभार निदर्शनास आला. जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील हे सोम. दि.30/03/2020 रोजी दुपारी 12 वाजता पत्रकारां समवेत रूग्णालयात पोहोचले असता , वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य पाटिल व प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. गडदे हे दोघेही गैरहजर होते, डॉ. पाटील यांना फोन केले असता,वाहन उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले व विठा येथे असल्याने येऊ शकत नसल्याचे सांगितले, डॉ. चैतन्य पाटील हे 24 मार्च 2020 रोजी माडग्याळ रुग्णालयात हजर रिपोर्ट देऊन गेले ते आजपर्यंत आले च नसल्याचे समजले, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. एम डी गडदे यांची चौकशी केली असता तेही 15 दिवस आले नसल्याचे कळले, डॉ.गडदे यांना फोन केला असता 'माझ्या कडे दोन ठिकाणी चार्ज असल्याने येणे शक्य नाही असे उत्तर मिळाले. त्यांचा हा बेजबाबदार पणा विचारात घेत जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी संबंधीत वैद्यकीय अधिकारी व प्रभारी अधिक्षक यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन मा.प्रांताधिकारीसो, प्रांत कार्यालय जत यांना दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा