जत तालुका सरपंच परिषदे कडून पंचायत समिती व एम.एस.ई.बी. कर्मचाऱ्यांना सॕनिटायजर वाटप ...जत गटविकास अधिकारी यांनी केले सरपंच परिषदेचे अभिनंदन
जत/ 15, एप्रिल 2020
कोरोना जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सरपंच परिषद, ता.जत यांच्या कडुन पंचायत समिती येथील अधिकारी व कर्मचारी यांना सॕनिटायजर, मास्क व वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना सॕनिटायजर वाटप केले.
यावेळी जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, सरपंच परिषदचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील, कुंभारी सरपंच राजाराम जावीर, बसर्गी उपसरपंच किशोर बामणे, विस्तार अधिकारी मनोज जाधव, श्री संकपाळ, वीज मंडळाचे सुनिल माने, सुनिल बंडगर, महेश शिंदे, महालिंग माळी यांच्या सह पंचायत समिती व वीज मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर म्हणाले की, जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करत आहेत, व आपण नक्कीच येत्या काही दिवसात यावर विजय मिळवु असा विश्वास व्यक्त केला, तसेच सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा