कोरोना-19: लॉकडाऊन मुळे बांधकाम कामगार व किरकोळ विक्रत्यावर उपासमारीची वेळ
कोरोना-19: लॉकडाऊन मुळे बांधकाम कामगार व किरकोळ विक्रत्यावर उपासमारीची वेळ
जत /दि.12.04.2020
*सध्या जत तालुका हा सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात मोठा आहे या जत तालुक्याने देशा मध्ये कोणत्याही संकट समयी भरभरून दानशूर व्यक्तीनी मदत करत असतात पण आज याच जत तालुक्यातील बांधकाम कामगार,किरकोळ विक्रते,हमाल,पानपटी व्यवसायीक,तसेच शेतामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी,न्हावी बांधव,दुकान कामगार,अश्या विविध घटकातील कामगार बंधु व भगिनी या सर्वाच्यावर लॉक डाऊन काळात उपासमारीची वेळ आली आहे*
*आपली तुटपुंजी कमाई असलेले बांधव 4 ते 5 दिवस कसेबसे आपला संसार हाकत असतात त्यात या कोरोनो मुळे देशात नव्हे तर जगातच हाहानकार माजलेला असल्याने सर्वच कामगार बंधु ना शासनाने किमान प्रत्येक कामगार च्या नावावर किमना आपला संसार घर गाड़ा चालन्या सारखे अनुदान शासनाने जमा करावी अशी मागणी सर्व सामान्य वर्गातुन होत आहे*
*शासनाने जाहीर केलेली मदत ही महिन्याला एक व्यक्ती मागे 5 किलो तांदूळ देण्याची योजना केली आहे परंतु आजअखेर हे तांदूळ सुद्धा अजुन पोहचले नाही तसेच तांदूळ न देता डाळी, तेल,साखर,साबन अश्या वस्तु रेशन मध्ये चालू करण्यात यावी अशी मागणी जनतेतुन होत आहे*
*या कोरोनो च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कामगार ची नोंदणीकृत व अनोंदणीकृत म्हणजे कोणाच्या नोंदी झाल्या नाहीत अश्या च्या नावे नोंदणी करुण किमान प्रत्येक कामगारच्या नावावर 50 लाख रूपयाचा विमा उतरवला जावा ही अशी सुद्धा मागणी होत आहे*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा