उद्योगपती चंद्रकांत सांगलीकर यांच्यावतीने जत तालुक्यातील गोरगरिब जनतेची जीवनावश्यक वस्तूंची गरज भागावी यासाठी जत तालुका प्रशासनाला जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले
जत: प्रतिनिधी.
उद्योगपती चंद्रकांत सांगलीकर यांच्यावतीने जत तालुक्यातील गोरगरिब जनतेची जीवनावश्यक वस्तूंची गरज भागावी यासाठी जत तालुका प्रशासनाला जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले .
या बाबत सविस्तर माहिती अशी की जत तालुका हा दुष्काळी तालुका असल्याने व या तालुक्यातील बहुतांशी लोक हे ऊसतोडीसाठी व अन्य कामासाठी बाहेरच्या राज्यात जात असतात. त्यातच जत तालुक्यात कोणत्याही प्रकारचे उद्योगधंद्याचे साधन नाही. त्यामुळे या तालुक्यातील बहुतांशी लोक हे बेरोजगार आहेत.
सद्या जगभर फैलावलेल्या कोरोनारूपी महामारीमुळे जगाची व देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. त्याचा देशातील सर्वच राज्यानाही फटका बसला आहे.
जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील गुगवाडचे भूमिपूत्र व उद्योगपती, सी. आर. सांगलीकर ग्रुपचे सर्वेसर्वा चंद्रकांत सांगलीकर यानी जत तालुक्यातील गोरगरिबांना वाटप करण्यासाठी साडेसहाशे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्याचे ठरवून आज जतचे तहसिलदार श्री. सचिन पाटील यांच्याकडे शंभर जीवनावश्यक किट सुपूर्द केले.
यावेळी बोलताना श्री. प्रभाकर सनमडीकर म्हणाले की, सी. आर. सांगलीकर फाऊंडेशनने जत तालुक्यातील गोरगरिबांना कोरोनाचे संकटात मदत व्हावी या साठी जत तालुक्यात साडेसहाशे जिवनापयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार आज या पैकी शंभर किट जतचे तहसिलदार श्री. पाटील साहेब यांच्याकडे आम्ही सुपूर्द करित असून उर्वरीत जिवनापयोगी वस्तूंचे किट आंम्ही तहसीलदार श्री. पाटील साहेब यांची परवानगी घेऊन.तालुक्यातील सेंटरिंग व गवंडी कामगार तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मातंग समाज व ईतर गोरगरिबांना वाटण्यात येणार आहे.
यावेळी जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके यांच्याकडे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अहोरात्र झटत असलेल्या पोलीस बांधव (कोरोना वारियर्स) यांच्यासाठी सी. आर.सांगलीकर फाऊंडेशनच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष आयु संजयरावजी कांबळे ,प्रशांत झेंडे, अशोक कांबळे, ब॔डू कांबळे, शंकर वाघमारे ,गुलाब शिंगे, आनंद कांबळे,रोहन विटेकर,स्वप्निल ऐदाळे, विशाल सनदी, दरिकांत कांबळे, रोहित झेंडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा