विश्वरत्न डॉ.आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी हॅप्पी हेल्प फौंडेशनच्या वतीने मिरज शासकीय रुग्णालयात कंत्राटी कामगारांना रेशन वाटप करण्यात आले ================================



*सांगली :-  कोरोना विषाणूने जगात थैमान घातले असून अखिल मानवजातीलाच आव्हान देणाऱ्या या विषाणूचा सामना करण्यासाठी अजैविक युद्धात कोरोनाला हरविण्यासाठी भारत सरकारने ०३ मे पर्यंत कर्फ्यु लागू केला आहे पण त्यामुळे ज्यांचे हातावरचे पोट आहे अशा गरजू लोकांना तसेच काही पर राज्यातून कामासाठी आलेले लोक बिहार,उत्तर प्रदेश व राजस्थान असेल अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांचे कामबंदी झाल्याने उपासमार होत आहे अशा वंचित लोकांना सगळीकडे संचारबंदी असताना   संस्थेच्या वतीने  संस्थेने मोलाचा वाटा उचलला आहे.*

 *मिरज शासकीय रुग्णालयात साफसफाई कामगार यांना आमच्या संस्थेच्या वतीने फुल ना फुलाची पाकळी म्हणून रेशन वाटप करण्यात आले. कार्यक्रम चे स्वागत व प्रस्थावना संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत कदम यांनी केले*

*यावेळी मिरज शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय चे अधिष्ठाता मा. डॉ. सुधीर,  ननंदकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे मिरज अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर, जिल्हा अध्यक्ष चतुर्थ श्रेणी  महासंघ संजय व्हनमाने, मिरज सिव्हिल च्या अधिसेविका वंदना शहाणे, डॉ.रुपेश शिंदे, हॅप्पी हेल्प फौंडेशनचे अध्यक्ष स्वप्निल जाधव, उपाध्यक्ष, प्रशांत दादा कदम, भारिप सांगली माजी जिल्हाउपाध्यक्ष महावीर तात्या कांबळे. वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा सचिव उमर फारूक ककमरी, दलित सेना तालुका अध्यक्ष राहुल कांबळे, संतोष खंदारे, निखिल (अण्णा)माने , विनायक होमकर, अमित लांडगे, वैभव कांबळे, संजय जंगीड, राहुल जंगीड,संतोष बनसोडे, आकाश मोरे,संतोष कांबळे, संतोष रेठे, हर्षवर्धन कांबळे  उपस्थित होते.*
================================

जत प्रतिनिधी,
अमित तोर्वे. 
सह,
प्रशांत शिंदे.
९६६५३१०३८९

चौदा एप्रिल  दिन उगवला हर्षली धरती
आली भीमबाबाची जयंती !!धृ!!

गुढ्या पताका उभ्या घरोघर 
रांगोळीने सजली दार
लहान बालका हसत-खेळत
 प्रेमाने म्हणती.....!!१!!

मने सजली नवतेजाने
विचारांच्या सुगंधाने 
ध्वज बाबांच्या किर्तीचा 
फडफडतो अखंडपणे !!२!!

भीमबाबांचा आदर्श घेऊन 
देशहितास पहिले स्थान 
करु घरातून अभिवादन 
कोरोनाला टाकू हरवून!!३!!

बाबांचे व्यासंगी वाचन
आदर्श त्यांचा तो घेऊन
हाती घेऊ पुस्तक आपण
बाबांप्रति खरे हे नमन !!४!!

आनंद झाला या जनाला
पाहून हा जयंती सोहळा
कवी दिलीप चे गीत हे सगळे
 प्रेमाने गाती!!5!!

कवि- श्री.दिलीप मारोती वाघमारे 
          मुख्याध्यापक
जि.प.प्राथ. मराठी शाळा बाबरवस्ती
 (पांडोझरी )ता.जत.जि.सांगली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule