* एका निर्जीव विषाणूने संपवली माणुसकी....*कर्नाटक मधील ....गावाने हाकलले आपल्याच गावच्या उसतोड मजुरांना..*व्हसपेट ता.जत येथील गावकऱ्यांनी केली...जेवन पाण्याची व्यवस्था*उसतोड मजुरांचे डोळे आले भरुण.

प्रतिनिधी माडग्याळ/25(सचिन झेंडे)
कोरोणा विषाणू ने घातलेल्या जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील चडचड जवळ असलेल्या बरडोली गावातून 62 उसतोड मजूरांना आपल्याच गावातुन   हाकलून काढले असल्याची, मानवतेचा चक्का चू्र्ररर करणारी घटना गुरुवार ता.23 रोजी घडली.माणसातील माणुसकी नावाची गोष्ट संपल्याचे वास्तव चित्र एकिकडे दिसत असताना त्याचवेळी व्हसपेट ता.जत येथील युवकांनी माणुसकी ह्या शब्दां वरील  विश्वास आणखी द्रढ बनवला.
 झाला प्रकार असा की, कर्नाटक राज्यातील उसतोड कामगार हे, शिरोळ कोल्हापूर येथील दत्त साखर कारखान्या साठी उसतोड करत होते,सर्व काही सुरळीत चालू होते, पण  त्यातच कोरोणा सारख्या महाभयानक  राक्षसाने जगभरात थैमान तर घातलेच पण भारतात ही अतिशय वेगाने एंट्री मारत येथील जनजीवन विस्कळीत केल्याची परिस्थिती आपण सर्व जन अनुभव त आहोतच...या विषाणूला रोखण्यासाठी आपल्याकडे लॉकडाऊन हाच पर्याय असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याची परिस्थिती असताना हे उसतोड मजूर जवळपास एक महिना महाराष्ट्रातच कोल्हापूर शिरोळ येथेच थांबणे भाग पडले, त्यात महाराष्ट्र सरकारने उसतोड मजूरांना त्यांच्या गावी जाण्याची सोय करण्याची दिलासा दायक माहिती दिल्याने  हे उसतोड मजूर आपल्या गावी पोहोचले खरे , पण या मजूरांना गावात घेतील हे गाववाले  कसले, गावातील सरपंच , सदस्य व तत्सम प्रतिष्टित म्हणवून घेणाऱ्या गावच्या पुढार्यांनी चडचण ता.इंडी चे पी.आय यांना घेऊन अक्षरशः गावातून हाकलून काडले, व जत पोलीस ठाणे हद्यीत व्हसपेट येथील पेट्रोल पंपा वर सोडून निघून गेले, व यावेळी साहजिकच सवयी प्रमाणे पोलिसांनी आपला दिवसभराचा राग यांच्यावर काढला , या उसतोड कामगारांची लहाण मूले घाबरून रडु लागली , त्यापैकी काही लोकांची चौकशी करताना व्हसपेट ता.जत मधील युवकांच्या लक्षात आले की ,हे मजूर दोन दिवसांपासून उपाशीपोटी आहेत,तर यांच्या जेवनाच्या व्यवस्था करण्यासाटी स्वतः च्या , तसेच गावातील प्रत्तेक घरातून भाकरी ,चपाती भाजी, चटणी पाणी,लहान मुलांसाठी बिस्किटे , दुध असे पदार्थ या उसतोड कामगारांना देत मानवतेचा एक संदेश या तरुणांनी किंबहुना गावाने दिला. समोर अन्न पाणी पाहुन सर्व मजुरांच्या चेहऱ्यावर  माणूसकीचा आधार मिळाल्या च्या छटा दिसत होत्या . लहान मुलांच्या चेहर्यावरील आनंदाचे  भाव पाहुन या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या या कामाचे समाधान मिळाले. या सत्कार्यात व्हसपेट चे सरपंच रामचंद्र साळुंखे, मजिद भाई नदाफ,कानिफनाथ केंगार , विनायक. मनिमुले ,जगन्नाथ जाधव सचिन कुंभार ,न्युज रिपोर्टर प्रविण कांबळे, दै.जनमतचे पत्रकार सचिन झेंडे  इत्यादी समाजसेवक तरुण  होते.


 गोरगरीब जनता फक्त राजकीय हेतू साठीच आठवते का?
 गोरगरीब जनता फक्त राजकीय हेतू साठीच आठवते हि सत्य परिस्थिती आहे, आपल्य हे लक्षात आले असेल की काही महिन्यांपूर्वी  किंवा एक वर्षाच्या पाठिमागे हे राजकीय लोक गोर गरीबांच्या पाया वर डोके ठेवायला ही मागे पुढे पाहत न्हवती गरज नसताना मदत देत होती पण आता खरी गरज आहे पण एक हि माय का लाला नेता ना मदत पाटवतोय ना स्वतः विचार पुस करतोय, आणि जै काही नेते मंडळी मदत करतायत ते फक्त जाहिरात बाजी पुरती.लोक प्रतिनिधी नेत मंडळी च्या मदतीची खरी गरज आज आहे.. हिच संधी आहे जनतेच्या ह्रदयात जाग घ्यायची...
खरंच ... कोरोणा वायरष हा महाभयानक विषाणू जरी असला तरी या विषाणू चे आभार मानायला हवेत ,
कारण या विषाणू मुळे माणसाने माणसाला ओळखले परके तर आपले नाहितच पण आपलेही आपले नाहीत याची जाणीव या निर्जीव न दिसणार्या विषाणू मुळे झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule