कोसारी गावातील माजी सैनिकानी जपली सामाजिक बांधिलकी :कोरोना पार्श्वभूमीवर पोलिस मिञ म्हणुन गेली आठ कार्यरत. जनतेला सरकारी सूचनांचे पालन करण्याचे केले आवाहन.

PSKNEWS NETWORK
कोसारी /प्रतिनिधी . 21
  चीन मध्ये उगम पावुण संपुर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोसारी गावातील माजी सैनिकानी जपली सामाजिक बांधिलकी तसेच गावातील जनतेसाठी आहोराञ प्रयत्न करत आहेत.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर कोसारी गावातील माजी सैनिक पोलिस मिञ म्हणुन गेली आठ दिवस सकाळी 8.00ते 11.00 आणि सायंकाळी 5.00ते 8.00 या वेळेत गावात काम करत आहेत. या कामात गावातील सर्व लोकांना चांगला संदेश मिळत आहे. यापासून लोकांनी सावधानता बागळली आहे. 
   कोरोनावर मात करण्यासाठी कोसारी ग्रामपंचायत तसेच माजी सैनिक आतोनात प्रयत्न करत आहेत. यामध्ये नानाजी संकपाळ (मेजर)टोपाजी तोरवे,वसंत काळे,वसंत सकट,नारायण भोसले,प्रकाश साळे,प्रल्हाद कुंभार,आप्पासो साळे,तानाजी भोसले,हरिदास  सांगोलकर,बाळासाहेब टेगंले,वसंत चव्हाण,तुकाराम माने,भीमराव तोरवे,रत्नापा कुंभार,यशवंत सकट,रघुनाथ  साळे,बाबासाहेब भोसले,मच्छीद्र  भोसले आदी माजी सैनिक गेली काही दिवस जत पोलिस स्टेशन,विक्रम फाऊंडेशन जत आणि कोसारी ग्रामपंचायत कोसारी यांच्यावतीने सर्व माजी सैनिक विनामूल्य कार्यरत आहेत.
      कोसारी तुन त्यांच कार्य कौतुकास्पद मानले जात आहे. त्यांनी कायद्याचा अनुसरून काही अटी लावल्या आहेत. मास्क, सॅनेटायझर,यासारख्या गोष्टी वापरणे बंधनकारक केले  आहे. याची सर्वञ काटेकोरपणे कार्यवाही केली  जात आहे.अशी माहिती माजी सैनिक तसेच ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विवेक टेगंले आणि उपसरपंच बाळासाहेब पवार,किसन टेगंले रासप अध्यक्ष  यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule