पिग्मी ऐजंटावर उपासमारीची वेळ
माडग्याळ/प्रतिनिधी:
कोरोना विषाणु संसर्गामुळे संपुर्ण जग भयभयीत झालेले असुन संपुर्ण जगात खूप मोठे संकट निर्माण झालेले आहे.याच पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाऊन चालू असल्याने सर्व व्यवसाय,व्यवहार बंद आहेत. त्यामुळे दररोज मिळणारी पिग्मी बंद झाली आहे.तसेच पतसंस्थाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पिग्मी एजंटावर उपासमारीची वेळ आली आहे.जगणे अवघड होऊन बसले आहे सर्व व्यवसाय ठप्प बंद आहेत. अशात पिग्मी एजंटाच्या कुटुंबातील मुलांबाळांना जगवताना तारेवरची कसरत करावी लागतेय ''काम नाही दाम नाही खायचे काय" असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
अशा पिग्मी एजंटावर ऊपासमारीची वेळ निर्माण झालेली असताना अशा अवस्थेत असे पिग्मी एजंट जगवणे आवश्यक आहे. पतसंस्था आणि छोटे-मोठे व्यवसाय हे पिग्मी एजंटाच्या विश्वासावर चालतात. असे व्यवसाय टिकवण्यासाठी त्याना आधार देणे आवश्यक आहे.
शासन सर्वच घटकांना प्रामाणीकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करतेय याचा सार्थ आभिमान तर आहेच पण याच पद्धतीने पिग्मी एजंटाना सुद्धा आपण माणूसकीच्या भावनेने बघून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेल्या बांधवाना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा.आणखी लाॅकडाऊन किती दिवस चालेल याचा अंदाज अजून आलेला नाही. त्यामुळे अशा अवस्थेत जगायचे कसे असा प्रश्न या पिग्मी एजंटाना निर्माण झालेला आहे.
अशा बांधवाना शासनाने न्याय देऊन त्यांची होणारी उपासमारी थांबवावी .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा